Site icon InMarathi

तुमच्या आवडत्या ब्रँड्सच्या जन्माच्या काही अफलातून कहाण्या, जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज आपण लोक प्रत्येक गोष्टीत ब्रँड्सच्या शोधात असतो. कारण ब्रँडेड कपडे घालणे, वस्तू वापरणे हा एक स्टेटस सिम्बल झालेलं आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की तुमच्या ह्या आवडत्या ब्रँड्सची सुरवात कशी झाली आणि सुरवातीला हे ब्रँड्स काय विकायचे?

चला तर मग जाणून घेऊया, तुमच्या आवडत्या ब्रँड्स जन्मामागील रंजक कहाणी.

Puma आणि Adidas :

 

praisemag.com

 

Adidasचे फाउंडर Adolf Dassler आणि Pumaचे फाउंडर Rudolf Dassler हे दोघे सख्खे भाऊ होते. हे दोघे मिळून Dassler Brothers नावाने त्यांची एक स्पोर्ट शु कंपनी चालवायचे पण त्या दोघांमध्ये झालेल्या वादानंतर त्यांनी स्वतःच्या स्वतंत्र अश्या कंपन्यांची सुरवात केली.

नोकिया :

 

dominiescommunicate.wordpress.com

 

नोकिया ही फिनलंड ची कंपनी आहे. एक काळ असाही येऊन गेला जेव्हा जवळपास सर्वांकडे नोकियाचे मोबाईल फोन असायचे.
पण या कंपनीची सुरुवात फोन नव्हे तर एका वेगळ्याच क्षेत्रातून झाली हे सांगूनही खरं वाटणार नाही.

जेव्हा नोकिया कंपनीची सुरुवात झाली तेव्हा नोकिया कंपनी मोबाईल फोन्स नाही तर टॉयलेट पेपर्स विकायची.

Marlboro :

 

marketing91.com

 

Marlboro हा सिगरेटचा एक प्रसिद्ध आणि तेवढाच लोकप्रिय ब्रॅन्ड आहे. ह्या ब्रॅन्डची सुरवात ही महिलांच्या दृष्टीने सिगारेट बनविण्यासाठी झाली होती, पण बघता बघता ही सिगारेट पुरुषांच्या देखील पसंतीस पडली.

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानची ही आवडती सिगारेट आहे.

Fanta :

 

myhomeimprovement.org

 

जर्मनी मध्ये नाजीह्यांचे शासन असताना कोका-कोलाचे ट्रान्सपोर्टेशन कठीण झाले होते. त्यामुळे कोका-कोला च्या फाउंडरने Fantaची निर्मिती केली.

Lamborghini :

 

kb4images.com

 

Ferruccio Lamborghini नावाच्या एका व्यक्तीजवळ एक Ferrari होती. एकदा जेव्हा त्यांच्या Ferrari मध्ये काही तांत्रिक बिघाड आला तेव्हा ते त्या गाडीला घेऊन Enzo Ferrari ह्यांच्याकडे गेले. पण Enzo ह्यांनी त्यांचा अपमान करत असे म्हटले की बिघाड हा गाडीत नाहीत गाडी चालविणाऱ्या ड्रायव्हरमध्ये आहे.

ह्यानंतर Ferruccio Lamborghini ह्यांनी आपला स्वतःचा कार ब्रॅन्ड निर्माण केला आणि आज Lamborghini हा ब्रांड Ferrari पेक्षा अधिक प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे.

Kellogg’s कॉर्न फ्लेक्स :

 

kelloggs.com

 

Kellogg’s कॉर्न फ्लेक्सची निर्मिती करणारे John Harvey Kellogg ह्यांच्या मते मांसाहार केल्याने संभोग करण्याची इच्छा बळावते.

म्हणून त्यांनी कॉर्न फ्लेक्सची निर्मिती केली जेणेकरून लोक हेल्दी खातील आणि हस्तमैथुन करण्यापासून दूर राहतील.

Nutella :

 

wipr.pr

 

१९४० साली महायुद्धादरम्यान चॉकलेटचा सप्लाय पूर्ण होऊ शकत नव्हता, तसेच त्याची किंमतही फार वाढली होती. म्हणून ह्या कमतरतेला भरून काढण्यासाठी इटलीच्या Pietro Ferrero ह्यांनी Nutella तयार केला होता.

तर अश्याप्रकारे झाली होती आपल्या आवडत्या ब्रँड्स सुरवात, जी खरच त्यांच्या आजच्या इमेजपेक्षा खुप वेगळी होती.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version