आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
रक्तदान श्रेष्ठदान असे म्हटल जाते. कारण तुमच्या रक्तदानाने कुठल्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकते. अनेक जण विचार करतात की आम्ही रक्तदान का करावे, त्याने आम्हाला काय फायदा होणार? जे बरोबर देखील आहे.
कारण प्रत्येकालाच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे असं वाटतंच असं नाही, सगळ्यांनाच ते रक्तदान करायलाच आवडतं किंवा पटतं असं नाही! रक्तदान करायला कुणीच कुणावर जबरदस्ती करू शकत नाही!
पण यामुळे प्रचंड फायदे होतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही! रक्तदान तुमच्या शरीरातलं फक्त रक्त काढून न घेता, तुम्हाला बऱ्याच गोष्टी देतं!
म्हणूनच आज माही आपल्याला रक्तदानाचे काही असे फायदे सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला चांगली माहिती देखील मिळेल आणि पुढे रक्तदान करताना तुमच्या मनात एक वेगळी पण चांगली भावना असेल!
१. रक्ताचा प्रवाह सुधारतो आणि हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो :
वयाची ४० शी आली कि ब्लड प्रेशर तसेच कोलेस्ट्रॉल असे त्रास चालू होतात, आणि मग त्याचे भीषण परिणाम म्हणजे त्याचं रूपांतर गंभीर हार्ट अटॅक मध्ये होणे!
शिवाय ज्यांना मधुमेहाचा (डायबिटीसचा) त्रास असतो त्यांना तर हार्ट अटॅक ची लक्षणं सुद्धा जाणवत नाही आणि त्यामुळेच ती व्यक्ती दगावण्याची शक्यता बळावते!
रक्तदान केल्याने रक्ताचा प्रवाह सुधारतो. ह्यामुळे ब्लड वेसल्सच्या लायनिंग डॅमेज होत नाहीत. त्यामुळे शरीरातील आर्टरी ब्लॉकेज कमी होतो. त्यामुळे रक्तदान करणाऱ्यामध्ये हार्ट अटॅकचा धोका ८८ टक्क्यांनी कमी होऊन जातो.
Loyola University Health System Blood Bank चे संचालक Phillip De Christopher ह्यांनी सांगितले की, इतर लोकांच्या तुलनेत नियमित रक्तदान करणारे लोक खूप कमी प्रमाणात दवाखान्यात भर्ती होत असतात.
रक्तदात्याला हार्ट अटॅक, हार्ट स्ट्रोक आणि कॅन्सर सारखे आजार होण्याची शक्यता फार कमी असते.
२. शरीरातील कॅलरीज कमी होतात :
वाढतं वजन किंवा ओबेसिटी ह्या तर सध्याच्या प्रचंड मोठ्या समस्या आहेत, प्रत्येकालाच त्याचे वजन नियमित राखणे हे जमतंच असं नाही, त्यामुळे सुद्धा अनेक आजार उद्भवतात!
त्यातून लोकं चालायला किंवा जिम मध्ये जायला सुरु करतात, पण एकंदरच खाण्याच्या पद्धती आणि लाईफस्टाईल मुळे वजन वाढत राहतं आणि त्याचे परिणाम खूप त्रासदायक ठरतात!
जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर ते तुम्ही रक्तदान करून देखील करू शकता.
रक्तदान हे फिट राहण्यासाठी एक योग्य आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. एका वेळी रक्तदान केल्याने शरीरातील ६५० कॅलरीज कमी होतात, त्यामुळे जर तुम्ही दर तीन महिन्याला रक्तदान केले तर तुमच्या किती कॅलरीज कमी होतील, नाही का?
३. फ्री चेक-अप :
रक्तदानाआधी तुमचे चेक-अप केले जाते. ज्यामध्ये तुमच्या शरीराचे तापमान, पल्स रेत, ब्लड प्रेशर आणि हिमोग्लोबिन इत्यादीची तपासणी केली जाते. त्यानंतर रक्त टेस्ट साठी पाठवले जाते, ज्यामध्ये तुमच्या रक्तावर १३ वेगेवेगळे टेस्ट केले जातात.
त्यामुळे जर तुम्हाला कुठला आजार झाला असेल, किंवा तुमच्या शरीरात कशाची कमी असेल तर ते तुम्हाला लगेचच कळत ई तेही फ्री.
४. शरीरात Iron चे योग्य प्रमाण नियमित राखले जाते :
आपल्या शरीरात ५ ग्राम एवढे Iron असते. Iron जास्तकरून रेड ब्लड सेल्स आणि बोन मॅरोमध्ये असते. जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा १/४ एवढे Iron निघून जाते. पण ह्या Iron ची कमतरता एका आठवड्यात तुमच्या जेवणातून भरून निघते.
त्यामुळे शरीरातील Iron चे संतुलन बनून राहते. तसेही शरीरात जास्त Iron ब्लड वेसल्स साठी हानिकारक असते.
एका व्यक्तीच्या रक्ताने तीन लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. मग आता जर आपले रक्त दान केल्याने इतरांना तसेच आपल्यालाही फायदा होत असेल तर रक्तदान का करू नये?
अर्थात तुम्हाला जर रक्तदान करायचे असल्यास काही गोष्टी ह्या कटाक्षाने पळायला लागतात! जसे कि नियमित मद्यपान किंवा धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीने रक्तदान करणे तितकेसे उपयोगाचे नसते!
शिवाय जर तुम्ही तुमच्या शरीरावर काही नाव किंवा कोणतं चित्र गोंदवुन म्हणजेच टॅटू करून घेतलं असल्यास तुम्ही रक्तदान करू शकत नाही, याबरोबरच जर तुम्ही नाक कां टोचले असेल किंवा पिअर्सिंग केलं असेल तरीही तुम्हाला ठराविक काळासाठी रक्तदान करता येत नाही!
याच कारण असे आहे की या गोष्टी केल्याने ती शाई, किंवा त्या धातू मधले कण तुमच्या रक्तात मिसळतात त्यामुळे शुद्ध रक्त फार कमी प्रमाणात मिळतं, म्हणूनच तुम्ही जर या गोष्टी केल्या असाल तर काळजी घ्या!
पण रक्तदान करणं हे कधीही योग्यच, कारण एखाद्याच्या उपयोगी पडणं हा माणसाचा सर्वात उत्तम गुण आहे!
===
सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.