आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आजकाल इंटरनेटची सहज उपलब्धता आपल्यासाठी सर्वसाधारण विषय झाला आहे. परंतु मागील काही वर्षांपूर्वी आपण केवळ दिवसातून काही वेळासाठी इंटरनेट वापरायचो. एक जीबी डेटा आपल्याला तब्बल दोनशे ते तीनशे रूपयांना मिळायचा कॉलिंग रेटही प्रचंड महाग असायचे.
सीमकार्ड पुरवणाऱ्या कंपन्यांची मनमानी, नेटवर्क कंपन्यांची मनमानी, त्यातून बसणारा अतिरिक्त भुर्दंड, कशाचाही नावाखाली खात्यातून वजा केली जाणारी रक्कम कंपन्यांच्या अशा कारनाम्यांनी आपण अगदी हैरान परेशान असायचो.
पंरतु एक दिवस आला आणि या साऱ्या कंपन्यांना धक्का बसला. आणि तो दिवस म्हणजे जिओचा जन्म. जसा कंस साऱ्या जनतेची छळवणूक करायचा परंतु एक दिवस आला श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि कंसाच्या अंताची सुरूवात झाली.
काहीशा तशाच प्रकारे जिओचा देखील जन्म झाला. जिओ बाजारात आलं आणि मनमानी करणाऱ्या कंपन्यांचा जणू अंतच जवळ आला. त्याला कारणही तसंच होतं.
जेव्हा मुकेश अंबानी यांनी जिओ बाजारात आणत असल्याची घोषणा केली तेव्हा त्यांच एक वाक्य मला आजही आठवतंय. ते म्हणजे इथून पुढे इंटरनेट आणि कॉलींगसाठी भारतीय जनतेला वारेमाप पैसा मोजायची गरज नाही.
तसेच ते दिवस गेले जेव्हा आम्ही कॉलिंगसाठी पैसै घालवायचो आणि त्यांनी ते करूनही दाखवलं. जिओ ला ज्यावेळेस लाँच केलं गेलं त्यावेळे त्यांनी तब्बल २.५ लाख कोटींची गुंतवणूक केली. आणि त्याच्यामाध्यमातून सुरूवातीला त्यांनी जवळपास वर्षभर मोफत कॉलींग आणि अमर्याद इंटरनेट सेवा पुरवली.
महिन्याला एक एक जीबी डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हे सगळं कसं स्वप्नवत होतं. रिलायंन्स अशा प्रकारे काही लाँच करणार आहे याची भनक इतर कंपन्यांना लागली असताना देखील, असं काही होणं शक्यच नाही या अविर्भावात त्यांनी जिओ कडे दुर्लक्ष केलं आणि आपली लूट चालूच ठेवली.
अशा लूटीनं त्रस्त झालेला दीड कोटीपेक्षा जास्त ग्राहक वर्ग एका झटक्यात जिओच्या सेवा वापरू लागला.
जिओचं साधं, सरळ आणि सोप्प गणित होतं. ते म्हणजे आधी सर्व ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करणं आणि नंतर त्यांना हळूहळू आपल्या सेवांसाठी काही प्रमाणात का होईना पण पैसे मोजायला लावणं. सुरूवातीला जिओनं फ्री सर्विस दिली नंतर जिओ प्राईम मेंबरशीप योजना आणली आणि त्याच्याद्वारे काही प्रमाणात पैसै आकारायला सुरूवात केली.
जेव्हा दीड कोटीच्या आसपास त्यांचे ग्राहक तयार झाले तेव्हा त्यांनी पैसे आकारण्यासाठी सुरूवात करण्याचं ठरवलं. जिओच्या मते जेव्हा मोफत सर्विस होती तेव्हा दीड कोटी लोक आले आपण जेव्हा काही साधारण रक्कम आकारू तेव्हा किमान पन्नास टक्के तरी ग्राहक आपल्या सोबत राहील.
आणि हीच त्यांची ग्राहक पेठ होती. जिओचं उद्दीष्ट मुळात दीड कोटी किंवा त्यापेक्षा जास्त नव्हतंच त्यांना पन्नास टक्के मार्केटवरच कब्जा करायचा होता पण सुदैव म्हणा किंवा आवडलेली सर्व्हिस, जिओचे अपेक्षेपेक्षा जास्त ग्राहक सोबत राहीले आणि आज जिओचा व्यवसाय उत्तमरित्या चालू आहे.
जरी जिओ काही कमवत असेल तरीही ते सर्वसामान्य ग्राहकांना परवडण्यासारखं आहे हे मात्र नक्की त्यामुळेच जिओचे ग्राहक जिओला सोडून गेले नाहीत तर उलट त्यांच्या ग्राहकांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चाललीय.
जिओचा सर्वसाधारण डाऊनलोडींगचा स्पीड हा जवळपास ६०-७० एमबीपीएस असतो तर अपलोडींगचा स्पीड हा जवळपास ७-८ एमबीपीएस असतो. सोबतच जिओला देशाचा कोणत्याही कोपऱ्यात गेल्यास काहीना काही नेटवर्क नक्की मिळेल हे विशेष.
जिओने मार्केटमध्ये ग्राहकांनातर काबीज केलंच पण जिओनं मोठमोठ्या कार्यक्रमांना प्रायोजकत्व देण्यास सुरूवात केली. फिल्म फेअर अवॉर्ड असेल किंवा कौन बनेगा करोडपती सारख्या कार्यक्रमाचं प्रायोजकत्व जिओनं स्विकारलं परिणाम जिओची जाहीरात आणि विश्वासार्हता प्रचंड प्रमाणात वाढली. जिओनं स्वत:चे काही एप्स मार्केटमध्ये आणले ज्यामध्ये जिओ टीव्ही पासून ते जिओ सिनेमापर्यंत सर्वकाही आहे.
हे अॅप आणत असताना त्याच्यासाठी देखील जिओनं जाहीराती घेण्यास सुरूवात केली आणि या ठिकाणी सुध्दा जिओनं आपलं बस्तान बसवलं. जिओनं एक हँडसेटही बाजारात आणला ज्याची किंमत केवळ १५०० रूपये आहे परंतु त्याचा दर्जा पाहिला असता ग्राहकांनी त्यालाही प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिलाय.
त्यामुळे एखाद्या स्मार्टफोनला लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवण्याचं कामचं जणू जिओनं हातात घेतलंय. भारतीयांचा स्मार्टफोन म्हणजे जिओचं हक्काचं घर झालय.
ड्युएल सिम असणाऱ्या मोबाईलमध्ये एक स्लॉटवर तुम्हाला जिओच दिसणार इतक्या प्रचंड वेगानं या दोन वर्षांत जिओनं मोबाईल नेटवर्कींगमध्ये क्रांती घडवून आणलीय.
जिओचा व्यवसाय काहीही असो पण टेक्नोलॉजी डिजीटलायझेशनपासून मैलो दूर असणारा नागरिक आज जिओमुळे बऱ्याच बाबतीत साक्षर झालाय तो त्यांनी पुरवलेल्या माफक दरातील इंटरनेट सेवेमुळेच.
आजकाल सोशल मीडियावर बरेच तथाकथिक विचारवंत जिओच्या नावानं आणि पर्यायानं सरकारच्या नावानं खडे फोडत असतात. पण सोशल मीडियावर जिओला भांडवलदार म्हणून हिणवणारे हे देखील आपल्या पोस्ट फिरवण्यासाठी जिओचाच वापर करतात हे मात्र ते सोयीस्कर विसरतात.
अनेक वर्षांपासून भारतीयांना लूटणाऱ्या कंपन्या जिओच्या येण्यानं जणू कोमातच गेल्या. आज ह्याच कंपन्या ज्यांनी काहीशा कारणांमुळे ग्राहकांचे कनेक्शन कट केले तेचा आज पुन्हा त्यांची सेवा घ्यावी म्हणून त्याच ग्राहकांसमोर लोटांगण घालताना दिसतायत.
जिओनं व्यवसाय केलाय हे खरंय किंवा अजूनही करावा कारण कुणी जर एखाद्या प्रकारची सेवा ग्राहकांना पुरवत असेल तर ग्राहकांनी ती सेवा घेताना त्याचा मोबदला देण्यासाठी मागे पुढे पाहू नये.
जिओनं व्यवसाय करत असताना सामान्य ग्राहकांच्या खिशाला लागणारी कात्री कमी करून ती जवळपास ८० टक्क्यांवर आणलीय. परदेशी मुजोर कंपन्यांना धडा शिकवणारी जिओ सर्वसामान्यांसाठी वरदान ठरलीय हे मात्र नक्की.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.