Site icon InMarathi

महिलांनो, घर आणि ऑफिस एकाच वेळी सांभाळताय? या साध्या गोष्टी तुमचं आयुष्य सुकर करतील !

women-inmarathi

officechai.com

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आजकालच्या स्त्रिया ह्या देखील पुरुषांप्रमाणे आपल्या करिअरला खूप महत्व देऊ लागल्या आहेत. त्यासोबतच जर विवाहित स्त्रिया असतील तर त्यांना घर आणि करिअर दोन्ही सांभाळायचं असतं. एवढ्या सार्या जबाबदाऱ्या ह्या स्त्रिया खरंच मोठ्या हिमतीने पार पाडत असतात. पण कधीकधी ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळणे जरा कठीण होऊन जाते.

 

all4women.co.za

पण जर तुम्ही सध्या सोप्या टिप्स वापरल्या तर तुम्हाला दोन्ही मॅनेज करणे नक्कीच सोयीचे आणि सोप्पे होऊन जाईल.

सकाळची तयारी रात्रीच करून ठेवा:

 

theplantain.com

सकाळी उठल्यावर नाश्ता आणि जेवण बनविण्यात बराच वेळ निघून जातो एवढच नाही तर कधीकधी घाईघाईत जे करायचं असतं तेही व्यवस्थितपणे होऊ शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या सकाळच्या वेळेचा योग्य वापर करून घ्यायचा आहे आणि कुठलीही गोष्ट घाईघाईनेन करता व्यवस्थितपणे करायची असेल तर सकाळची तयारी रात्रीच करून ठेवावी. म्हणजे जर भाजी कापायची किंवा तोडायची असेल तर ते रात्रीच करून ठेवावे. ह्याने तुमचा वेळही वाचेल आणि काम व्यवस्थित होईल.

सुट्टीच्या दिवशी आठवडाभराची प्लानिंग करून ठेवा :

 

kristywyatt.com

रोज नाश्ता किंवा स्वयंपाक करायच्या आधी मनात एकच प्रश्न येतो, तो म्हणजे आज काय बनवायचे. ह्याच विचारात आपला बराच वेळ निघून जातो. त्यापेक्षा सुट्टीच्या दिवशी जर संपूर्ण आठवडाभराचा एक मेन्यू तयार करून ठेवला तर जो वेळ तुमचा काय बनवू ह्या विचारात जातो तो वाचेल.

रात्रीच ठरवा की सकाळी काय घालायचे आहे:

 

quora.com

बऱ्याच महिलांना तयार व्हायला ह्यासाठी वेळ लागतो कारण त्या ह्याचा विचार करत बसतात की ऑफिसला काय घालून जाऊ? त्यामुळे कधीकधी ऑफिस ला उशीरही होतो. त्यापेक्षा जर तुम्ही आदल्या रात्रीच हे ठरवलं की, तुम्हाला उद्या ऑफिसला काय घालून जायचे आहे तर तुमचा तेवढा वेळ नक्की वाचेल.

आपल्या Priorities निवडा :

 

thebusinesswomanmedia.com

सुट्टीच्या दिवशी आपल्या आठवडाभराच्या कामाची एक यादी तयार करून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला आठवडाभर काय काय करायचं आहे हे लक्षात राहिलं. आणि कुठलं काम महत्वाच आहे कुठलं नाही तेही ठरवू शकाल. ह्यामुळे तुमचं प्रत्येक काम वेळेत पूर्ण होईल.

वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा :

 

rd.com

जर तुम्हाला वाटत की तुमचे प्रत्येक काम हे वेळेवर झाले पाहिजे तर त्यासाठी तुम्ही वेळेवर उठणे गरजेचे आहे. जर तुमची सकाळ वेळेत होईल तरच दिवस चांगला जाईल आणि सर्व कामे वेळेवर होतील. त्यामुळे रात्री वेळेत झोपा आणि सकाळी लवकर उठा.

कामासाठी घरच्यांची मदत घ्या :

 

themuse.com

जर तुम्ही ऑफिस जात असाल तर तुम्ही देखील दिवसभर काम करून थकता, जसे बाकीचे थकतात, त्यामुळे घरची सर्व कामे एकट्यावर घेऊ नका त्याने तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यापेक्षा काम वाटून घ्या, घरच्या कामात कुटुंबियांची मदत घ्या. ह्याने सर्व कामे तुमच्यावर येणार नाहीत आणि कुटुंबासोबत वेळ घालवायला तुमच्याकडे वेळ असेल.

मल्टी टास्किंग :

 

pgeveryday.com

एकावेळी अनेक छोटी छोटी कामे करण्याचा प्रयत्न करा. जसे की, जेवण बनविताना कपडे धुवायला टाकणे, ऑफिस मेल चेक करणे, कुकर लावला असताना घर आवरून घेणे वगैरे वगैरे. ह्याने तुमचा बराच वेळ वाचेल.

तसेही घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळणे खरंच कठीण असतं, त्यामुळे जेवढ्या स्त्रया ह्या दोन्ही जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेत ह्या जगाशी लढत आहेत, त्या खरंच ग्रेट आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version