' ईदचा रोजा सोडण्याची ही अफलातून पद्धत पाहून तुम्हीही थक्क व्हाल ! – InMarathi

ईदचा रोजा सोडण्याची ही अफलातून पद्धत पाहून तुम्हीही थक्क व्हाल !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आपले मुस्लीम बांधव ईद ह्या सणाची खूप आतुरतेने वाट बघत असतात. आपल्याला रोजा सोडण्याची कदाचित एकच पद्धत माहित असावी, पण आज आम्ही आपल्याला रोजा सोडण्याची एक वेगळी पद्धत सांगणार आहोत.

आज आम्ही आपल्याला एका अश्या ठिकाणाबाबत सांगणार आहोत जिथे तोफेच्या स्फोटाने रोजा सोडला जातो.

 

raisen-cannon-for-ramzan-inmarathi05
chroniclelive.co.uk

मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यात रमजानच्या महिन्यात एक अनोखी परंपरा निभावली जाते. येथे रमजान दरम्यान इफ्तारी आणि सेहरी हे दोन्ही तोफेच्या स्फोटाने सुरु होतात आणि त्यानेच संपतेही.

रायसेन च्या ४५ किलोमीटर दूर असणाऱ्या भोपाळ आणि सिहोर येथे देखील रमजानमध्ये तोफ चालविली जायची पण काही काळाने वेळेसोबत ही परंपरा संपुष्टात आली.

 

raisen-cannon-for-ramzan-inmarathi02
twitter.com

आधी ही तोफ मोठी असायची, पण आता ह्यासाठी लहान तोफ वापरली जाते. येथील लोक सांगतात की, आधी ह्यासाठी मोठ्या तोफेचा वापर केला जायचा. पण त्यामुळे किल्ल्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून आता लहान तोफ वापरली जाते.

ह्या परंपरेची सुरवात भोपाळ येथील बेगमांनी १८ व्या शतकात केली होती. त्यावेळी आर्मी तोफने गोळा चालवला जायचा. शहर काजी ह्याची देखरेख करायचे.

 

raisen-cannon-for-ramzan-inmarathi
hindustantimes.com

आजही ही परंपरा सुरु आहे. रायसेनमध्ये रमजान दरम्यान चालवण्यात येणाऱ्या तोफेसाठी स्पेशल लायसन्स जारी केल्या जाते. येथील कलेक्टर तोफ आणि दारूगोळ्यासाठी एका महिल्याच लायसन्स जारी करतात.

ह्याला चालविण्यासाठी एका महिन्याचा खर्च हा जवळपास ४० हजार रुपये एवढा असतो. ह्यात ५ हजार रुपये हे नगर निगम देतात. इतर खर्च हा लोकांनी दिलेल्या पैश्यातून होतो.

 

raisen-cannon-for-ramzan-inmarathi04raisen-cannon-for-ramzan-inmarathi04
amarujala.com

ह्या तोफेला एका महिन्यापर्यंत रोज चालविण्याची जबाबदारी ही सखावत उल्लाह ह्यांच्यावर असते. ते रोज इफ्तरी आणि सेहरी संपायच्या आधी त्या टेकडीवर पोहोचतात जिथे ही तोफ ठेवली असायची.

त्यानंतर त्यात दारुगोळा भरतात. सखावत उल्लाह ह्यांना खालून मशिदी मधून इशारा मिळाला तसे ते तोफ चालवतात.

सखावत उल्लाह ह्या कामाला खूप महत्व देतात. त्यांच्या मते, “लोक माझ्या तोफ चालविण्याची वाट बघत असतात.” आधी ह्या तोफेचा आवाज दूरपर्यंत ऐकू यायचा, पण आता लोकांच्या आणि गाड्या-घोड्यांच्या कल्लोळात तो आवाज कुठेतरी कमी पडत जातो आहे.

तरी देखील ह्या शहरातील आणि जवळपासच्या गावातील लोकांना ह्या तोफेच्या आवाजची आतुरतेने वाट बघत असतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?