Site icon InMarathi

“ती खरंच प्रेमात पडलीये ना?” परफेक्ट उत्तर मानसशास्त्रात आहे, नक्की वाचा!

Mukta Swapnil im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं” ही कविता आपण ऐकली असेलच, प्रेम ही खूप युनिव्हर्सल गोष्ट आहे! एखादा देश, राज्य किंवा एखादी व्यक्ती एवढंच प्रेम कधीच मर्यादित नसतं!

सजीव निर्जीव, प्राणी पक्षी, निसर्ग, मनुष्य अशा प्रत्येकात प्रेम ही भावना असतेच, फक्त प्रत्येकाची प्रेम व्यक्त करायची पद्धत ही प्रचंड वेगळी असते!

आणि त्यातूनही पाहिलं प्रेम म्हणजे काही औरच असतं, त्या पहिल्या प्रेमाची आठवण सहसा कुणीच विसरत नाही!

 

 

तुम्हाला आठवते आहे का तुमची पहिली क्रश? तुम्हाला जर आठवत असेल तर चला आठवूया तो काळ जेव्हा आपण आपल्या क्रशला बघायचो आणि आपल्या वर्तनात अचानक काही बदल व्हायचा.

मुलगा असो वा मुलगी क्रशला बघितल्यावर एक वेगळाच चेंज आपल्यात व्हायचा. एक वेगळीच फिलिंग मनातून यायची, भान एकदम हरपून जायचं!

आठवतोय ना तो काळ, नेमकं अस काय व्हायचं तेव्हा तेच आपण जाणून घेणार आहोत की मुलांना त्यांच्या प्रेयसीला बघितल्यावर काय होतं..

 

 

तिला बघितल्यावर सिनेमातल्या हिरोच्या भवती अचानक व्हायोलिन वादक संगीत वाजवू लागतात. अथवा हिरोईनला अचानक चंद्राचा आकार नेहमीपेक्षा जास्त मोठा वाटू लागतो. अचानक कुठूनतरी वाऱ्याची मंद झुळूक येऊ लागते. जणू ऋतू बदलतो आणि वसंत ऋतू आवतरतो.

अगदी आपण DDLJ मधले शाहरुख खान आणि समोरची मुलगी म्हणजे काजोल अगदी असाच फील येतो की नाही?

 

 

पण हे सर्व काल्पनिक असतं. खऱ्या आयुष्यात अस काही घडतं का? तर याचं स्पष्ट उत्तर आहे- ‘नाही’. तर मग नेमकं काय घडतं ते बघुयात.

जेव्हा मुलाला एखादी मुलगी आवडू लागते तेव्हा त्याचात खूप जास्त बदल होतो. त्याचा आत्मविश्वास बळावतो. तो तिच्यासाठी पुर्णपणे वेडा होतो. त्या मुलीची प्रत्येक गोष्ट त्या मुलाला जाणून घ्यायची असते. मुलगा त्या मुलीसाठी ड्रिंक्स घेण सुद्धा थांबवतो. त्याला असलेली सर्व व्यसनं आपोआप नाहीशी होतात.

 

 

मुलगा घरी लवकर यायला लागतो कारण त्याला बाहेर मुलांसोबत हिंड्ण्यापेक्षा तिच्यासोबत मोबईलवर तासनतास गप्पा मारायच्या असतात.

मुलं प्रसन्न होतात. ते खूप टापटीप राहू लागतात. त्यांचा रुममध्ये महागडे स्प्रे, परफ्युम यांची रेलचेल होत असते. मुलगा त्याचा भविष्याचा विचार करू लागतो. तिला बघितल्यावर याचा अंगावर शाहारे येऊ लागतात. मुलीचा क्लास बघून मुलगा स्वतःमध्ये बदल करतो.

 

 

जेव्हा आपण प्रेमात असतो, तेव्हा आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती विशेष असल्याची भावना हळूहळू जोर धरू लागते.

ही भावना माणसाच्या मेंदूत असलेल्या ‘डोपामाईन’ नावाच्या एका विशिष्ट रसायनामुळे आकार घेत असते. आणि विशेष म्हणजे असं मुलगा आणि मुलगी, दोन्हींच्या बाबतीत होत असतं.

एक हमखास जाणवणारी गोष्ट म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीच्या सकारात्मक बाजू आपल्याला जास्त ठळकपणे दिसत असतात. नकारात्मक गोष्टी दिसत नाहीत, किंबहुना त्या आपल्याला पहायच्या नसतात. त्या व्यक्तीशी संबंधित असणाऱ्या वस्तू, प्रसंग, ठिकाण यांपासून दूर जायला आपण कचरू लागतो.

 

 

नवीन व्यक्ती आयुष्यात आल्यानंतर आणि ती आपल्याला प्रिय असेल तर तिच्याबद्दलच्या सर्व गोष्टी लक्षात ठेवणे, वारंवार आठवणे हे सगळं नियंत्रित करणारे ‘नोरेपिनेफ्राईन’ नावाचे एक रसायन हे काम व्यवस्थित पार पडत असते.

जेव्हा मुलीला एखादा मुलगा आवडू लागतो तेव्हा तिच्या स्वभावता पण खूप बदल होतो.

मुलगी मुलगा जवळ येऊन बोलू लागला तर त्याचाशी लाजून बोलते. मुलीला त्याचाशी संवाद हवाहवासा वाटतो. ती धाडस करू लागते. रात्री त्याचसोबत बिनधास्त राहू लागते.

===

त्याचा समोर आउटडेटेड नको वाटायला म्हणून क्वचित ड्रिंक्स पण घेऊ लागते. तिला सतत भीती वाटते की हा आपल्याला सोडून जाणार नाही ना, आपलं रिलेशन टिकेल ना?

 

 

उत्तरोतर हि असुरक्षितता वाढत जाते. पण मुलगी प्रेमात समजूतदार होते. तिला नवीन काही ट्राय करायला आवडायला लागतं.

त्याच्या वेळेनुसार स्वतची वेळ ठरवते. त्याच्या वेळेअनुरूप स्वताची दिनचर्या बनवते. ती तो काळ खऱ्या अर्थाने जगू लागते.

अशा प्रकारे प्रेमात पडल्यावर मुलगा आणि मुलगी एका वेगळ्याच दुनियेची अनुभूती करत असतात.

ते शरीराने जरी वेगळे असले तरी मनाने नेहमी एकत्र असतात. तरुणाईतलं प्रेम आयुष्याचा एक सुंदर भाग असतं. त्याची शाश्वती नसते पण ते आयुष्याला एक वेगळाच रंग देऊन जात असतं. म्हणूनच हे प्रेम प्रत्येकाला नेहमीच हवंहवसं वाटत असतं!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version