Site icon InMarathi

उष्णतेचा त्रास झाल्यावर तुम्ही काय करता? त्याने चक्क सूर्यदेवावर केस केलीय !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज आम्ही आपल्याला एक विचित्र अशी बातमी देणार आहोत. जी कदाचित तुम्हाला एखाद्या चित्रपटाची कहाणी वाटू शकते. सोशल मिडीयावर वायरल होत असलेल्या एका बातमीनुसार एका व्यक्तीने सूर्याच्या दाहकतेपासून त्रासून डायरेक्ट सूर्य देवावरच केस ठोठावली आहे.

 

 

मिडिया रिपोर्ट्सनुसार ही बातमी मध्यप्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. येथील एका तरुणाने सूर्याच्या दाहकतेला त्रासून सूर्य देवावर केस ठोठावली आहे.

सोशल मिडीयावर ज्याने कोणी ही बातमी वाचली त्याला ही चित्रपटाची कहाणीच वाटली.

काही वर्षांपूर्वी परेश रावल आणि अक्षय कुमार ह्यांचा ‘OMG’ हा चित्रपट आला होता ज्यात परेश रावल ह्यांनी देवावर कोर्ट केस केली होती.

 

 

कदाचित ह्या तरुणाला देखील तेच करायचे असेलं. शाजापूरमध्ये राहणाऱ्या ह्या तरुणाने वाढत्या गर्मीमुळे त्रस्त होऊन सूर्यावर केस केली. एवढ्या उष्णतेचा दोष त्याने सरळ सूर्याला दिला आहे. ह्या तरुणाचे नाव शिवपाल सिंह असल्याचे सांगितल्या जातं आहे.

शिवपाल ह्यांनी शाजापूरच्या पोलीस ठाण्यात सूर्य देवाविरोधात केस दाखल केली आहे.

 

 

सूर्य देवाविरोधात दाखल केलेल्या ह्या तक्रार पत्रात शिवपाल सिंह ह्यांनी सांगितले की, गेल्या एका आठवड्यापासून सूर्याच्या उष्णतेमुळे, दाहकतेमुळे मी खूप मानसिक आणि शारीरिक कष्ट सहन करत आहे. ज्यासाठी मी श्री सुर्यनारायण, रहिवासी ब्रम्हांड ह्यांना दोषी मानतो.

शिवपाल सिंह ह्यांची अशी इच्छा आहे की, शासनाने त्यांच्या तक्रारीवर अॅक्शन घेत भारतीय संविधानाअंतर्गत आवश्यक ती कारवाई केली जावी.

आता ह्यावर शासन काही कारवाई घेणार की नाही हे तर माहित नाही. पण जर शिवपाल सिंह ह्यांची तक्रार मान्य करत ह्यावर कारवाई केली गेली तर आपल्याला परेश रावल्या त्या चित्रपटाचा सिक्वेल नक्कीच बघायला मिळेल.

===

हे ही वाचा – या बाईंनी थेट ‘नासा’ला कोर्टात खेचलं… कारण वाचून हसावं की रडावं कळत नाही!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version