' आर्य खरंच बाहेरून आले होते का? संशोधनानंतर शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा – InMarathi

आर्य खरंच बाहेरून आले होते का? संशोधनानंतर शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आर्यन इन्व्हेजन थिअरी नावाची एक संकल्पना आहे ज्यानुसार-

“मध्य आशियातुन फार पूर्वी काही शस्त्र व शास्त्र दोन्हीही गोष्टीत पारंगत असलेल्या लोकांचा समूह भारतात आला. त्या समूहाने स्वतःची एक वेगळी संस्कृती भारतीय भूमीच्या उत्तरेत वसवली.

ते पुढे तिचा विस्तार करत गेले आणि जे या प्रदेशातले मुळनिवासी लोक होते त्यांची संस्कृती यामुळे नष्ट होत गेली व ते दक्षिणेकडे जाऊन स्थित झाले.”

असे सांगण्यात आले आहे. हाच त्या थियरीचा गाभा आहे. त्या उत्तरेकडून आलेल्या स्थलांतरित लोकांनी पुढे जाऊन हडप्पा आणि मोहजोदरोची संस्कृती वसवली होती असा या थियरीचा दावा होता.

 

dasarajna-marathipizza04

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – उत्खननात सापडलेलं, सोबत झोपलेलं जोडपं, आपल्याला काय सांगतंय ते जाणून घ्या

यावर अनेक वाद झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यावर “Who Were Shudra??” नावाचे पुस्तक लिहून ती थियरी खोटी ठरवली होती.

परंतु काही गट मात्र त्या थियरीचा वापर करून समाजाला मुर्ख बनवत आले आहेत. त्यावर भारतात बरंच राजकीय ध्रुवीकरण देखील झालं आहे.

परंतु आता मात्र एका बहुप्रतिक्षित हडप्पा संस्कृतीत मिळालेल्या हाडांच्या सापळ्यांच्या DNA संशोधनाअंती हे सिद्ध झाले आहे की ही थियरी केवळ एक मिथक आहे.

यासाठी हरियाणातील राखीगडी येथील अवशेषांचा आसरा घेण्यात आला आहे. यातून मिळालेल्या माहिती नुसार कुठल्याही मध्य आशियाई वंशाशी साधर्म्य हे जैविक अवशेष दाखवत नाहीत.

यातुन हे सिद्ध झालं आहे की आर्यन इन्व्हेशन थियरी हे फक्त मिथकच आहे आणि वैदिक संस्कृतीची निर्मिती इथल्या मूळ लोकांकडून करण्यात आली आहे.कोणीही बाहेरून येऊन ती वसवली नाही.

 

dasarajna-marathipizza

 

यासाठी वसंत शिंदे आणि नीरज राय हे दोन संशोधक आवश्यक संशोधन करत होते. त्यांच्या मतानुसार ही थियरी संपूर्णपणे भारतीय मूळ असलेल्या लोकांनी, अत्यल्प परकीय मदतीने निर्माण केली आहे.

राखीगडी येथील DNA ने संपूर्णतः भारतीय मूळ असलेले स्ट्रक्चर्स दाखवले आहेत. अत्यल्प प्रमाणात परकीय DNA घटक त्यात आढळले आहेत. ज्याने हे सिद्ध झालं आहे की त्यावेळीची लोकसंख्या संपूर्णतः भारतीय मुळाची होती.

पुरातत्व पुराव्यांचा आधार घेता हे सिद्ध झाले होते की वैदिक संस्कृती ही भारतीय मुळाच्या लोकांनीच वसवली आहे फक्त थोड्याप्रमाणात बाहेरील संस्कृतीशी तिचा संबंध आहे.

शिंदेंनी लावलेल्या शोधानुसार सापडलेले अवशेष जसे वीट, भांडी हे सर्वकाही वैदिक काळाशी साधर्म्य दाखवत आहे. त्याला ऋग्वेद काळ देखील म्हटलं जातं.

त्याकाळच्या लोकांचं आरोग्य सुदृढ होतं असं देखील त्यांनी संशोधन केलेल्या सांगाड्यातून स्पष्ट होत आहे. राखीगडीची संस्कृती पुढे उत्क्रांत होत गेली आणि तिचे रूपांतर पुढे जाऊन एका अभ्यासबद्ध अश्या वैदिक संस्कृतीचा उगम झाला.

राखीगडीच्या सांगाड्यात सापडलेले DNA अवशेष आज देखील भारतातील आजही असलेल्या लोकांच्या DNA मध्ये आढळले आहेत.

 

harappa-rakhigari-inmarathi

 

शिंदे पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे कुलपती आहेत आणि जेष्ठ पुरातत्व संशोधक देखील आहेत. तर राय हे लखनऊ स्थित बिरबल सहानी इन्स्टिट्यूटच्या प्राचीन DNA प्रयोगशाळेत कार्यरत आहेत. त्यांनीच हे DNA संशोधन केले आहे.

राय यांच्या माहितीनुसार कुठल्याही प्रकारचं परकीय आक्रमण झालं नव्हतं. पुराव्यानिशी हे सिद्ध होतं आहे की अवशेष आणि वैदिक संस्कृती संपूर्णतः भारतीय मुळाची आहे आणि मुक्तपणे तिचा या भूभागावर प्रसार झाला आहे.

ते लोक अत्यंत धष्टपुष्ट तर होतेच शिवाय त्यांची प्रकृती खूप चांगली होती. याची अनुभूती अवशेषांच्या केलेल्या निरीक्षणातून येत असते. त्यांचा दातांच्या अवशेषांवरून याची प्रचिती येते असे राय म्हणतात.

त्यांच्यात युद्ध होत नसत. त्यांचा हाडांवर कुठेही युद्धाच्या खुणा दिसल्या नाहीत. यावरून असं सिद्ध होतं की ते लोक खूप ज्ञानसंपन्न व आरोग्यसंपन्न होते.

ऋग्वेदाची निर्मिती ही अश्याच लोकांनी सातत्याने केली आहे. कुठल्याही बाहेरच्या लोकांनी येऊन ते लिहलं नाही.

राखीगडीच्या अभ्यासावरून त्यांना मध्य आशियाई लोकांचा कुठलाही जेनेटिक साधर्म्य दाखवणारा गुणधर्म हडप्पा संस्कृतीच्या लोकांमध्ये दिसला नाही. फक्त अगदी कमी प्रमाणात इराणी लोकसंख्येशी त्याचं साधर्म्य दिसून येत आहे.

राखीगडी ही सर्वात मोठ्या हडप्पाकालीन संस्कृतींपैकी एक आहे. ती जवळ जवळ ३०० एकर मध्ये पसरली आहे आणि तिचे आयुर्मान ६००० वर्ष जुनं आहे. ती हडप्पा संस्कृतीचा सर्वात विकसित भाग आहे.

 

haryana-inmarathi

 

राय यांनी १४८ सांगाड्यांचा अभ्यास केला. प्रत्येकाची चाचणी हैद्राबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अँड मायक्रो बायोलॉजी येथे केली. त्यापैकी फक्त २ अवशेषांतून त्यांना DNA संकलन शक्य झालं.

त्यांना DNA वेगळा करून त्यातून पुढे संशोधन करायला खूप मेहनत घ्यावी लागली होती. त्यांनी मिळवलेल्या एका DNA सॅम्पलच कंटामिनेशन ह्या अवधीत सेउलला झालं होतं.

त्यांनी सेउल आणि हार्वर्डला चाचणी साठी ते DNA सॅम्पल पाठवले होते. परंतु राय यांच्या म्हणण्यानुसार याचा अभ्यासातून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीवर काहीच परिणाम होणार नाही.

अशाप्रकारे आर्यन इन्व्हेशन थियरीच्या वादग्रस्त दाव्याला आता पुराव्यानिशी खोडण्यात आलं आहे.

अस कुठलंच परकीय आक्रमण झालं नव्हतं आणि कोणताही समूह मुळनिवासी नाही हे सिद्ध झालं आहे. या भूमीवरच्या संस्कृतीचा उगम ही इथलाच आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – उत्खननात सापडलेल्या अवशेषांचे वय निश्चित्त करण्याचे अफलातून तंत्रज्ञान : रेडिओकार्बन डेटिंग

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?