Site icon InMarathi

आजवरचे जगातील टॉप श्रीमंत गँगस्टर

top-richest-gangster-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दरवर्षी आपण ऐकतो की जगभरातील श्रीमंतांची यादी जाहीर झालीये. त्यात अमुक कोणी बाजी मारली, तमुक कोणी या नंबरवर आहे. पण कधी प्रश्न पडलायं का या मेहनतीने पैसा कमवणाऱ्या लोकांचं ठीक आह, परंतु गँगस्टर लोकांच काय?

हे गँगस्टर लोक एवढा पैसा कमावतात, इतकी ऐषोआरामाची लाइफ जगतात, ते देखील श्रीमंत आहेतचं की ! मग त्यांच्याकडे देखील बक्कळ संपत्ती असणारचं ! चित्रपटात वैगैरे देखील गँगस्टर अगदी रुबाबदार दाखवतात.

आता दाऊदचं उदाहरण घ्या ना, तुम्हाला देखील प्रश्न पडत असेल, अख्ख जग ज्या दाउदच्या मागे लागलयं, तो दाउद थोडी ना कुठल्यातरी चाळीतल्या घरात आयुष्य काढतो आहे. तो बरा लक्झरियस लाइफ जगतोय, तर  अश्या या डॉनची संपत्ती किती कोटींच्या घरात असेल?

 

स्रोत

आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येतोय जगातील टॉप श्रीमंत गँगस्टरची यादी. यातील बरेसचे आज हयात नाहीत. पण त्यांची संपत्ती अजूनही हयात आहे म्हटलं!!

१) अमाडो कॅरीलो फ्युन्टेस:

 

स्रोत

जूआरेझ कार्टल या कुप्रसिद्ध मॅक्सीकन गँगचा फ्युन्टेस हा म्होरक्या होता. अमेरिकेमध्ये अवैधरीत्या सर्वाधिक कोकेन आजही याच गँगमार्फत सप्लाय होते. फ्युन्टेसला गुन्हेगारी जगतात ‘गॉड ऑफ द स्काय’ या नावाने ओळखले जायचे.

कारण तो कोकेनची तस्करी सर्वात जास्त विमानाच्या मार्गानेच करायचा. आज फ्युन्टेस हयात नाही. गुन्हेगारी मार्गाने त्याने कमावलेली एकूण संपत्ती अंदाजे २५ बिलियन डॉलरच्या घरात आहे.

 

२) पाब्लो इस्कोबार:

 

स्रोत

पाब्लो इस्कोबार हा देखील सध्या हयात नाही. पण त्याच्या काळातील सर्वात श्रीमंत गुन्हेगारांपैकी एक म्हणून त्याचा नावलौकिक होता. त्याची संपत्ती तेव्हाच्या काळी जवळपास २० बिलियन डॉलर इतकी होती.

ड्रग आणि कोकेन तस्करीच्या दुनियेतील बेताज बादशाह असे त्याचे वर्णन केले जायचे. कोलंबिया मधून तो मेडेलीन कार्टल या गँगच्या नावाखाली ड्रग्जचा धंदा करायचा. आजवरच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली ड्रग्ज डीलिंग गँग म्हणून मेडेलीन कार्टलचे नाव घेतले जाते.

 

३) दाउद इब्राहीम कासकर :

 

स्रोत

सध्याच्या गुन्हेगारी जगतातील आघाडीचे नाव म्हणजे दाउद इब्राहीम! मुंबई मध्ये डी-कंपनीची सुरुवात करून त्याने गुन्हेगारी विश्वात पाउल टाकले.

अमेरिका आणि भारत सरकारने त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले असून मोस्ट वोन्टेडच्या यादीमध्ये तो सर्वोच्च स्थानावर आहे. दाउदची सध्याची संपत्ती आहे जवळपास ७ बिलियन डॉलर्स !

 

४) खून सा:

 

स्रोत

आशियामधील ड्रग्स रॅकेटचा माफिया असणारा खून सा हा देखील आज हयात नाही. म्यानमारचा अघोषित राजा म्हणून तो स्वत:ला वागवायचा. त्याची संपत्ती आहे अंदाजे ५ बिलियन डॉलर्स !

 

५) जोसे गोंझालो रोड्रीगेझ गाचा:

 

स्रोत

या डॉनला एल मॅक्सीकानो या नावाने ओळखले जायचे. हा कोलंबिया मधून ड्रग्जचा अवैध व्यापार करायचा. पाब्लो इस्कोबारच्या मेडेलीन कार्टल या गँगच्या प्रमुख लीडर्सपैकी तो एक होता.

या माणसाने वाम मार्गाने इतका पैसा कमावला होता की स्वत:ला श्रीमंत म्हणवून घेणाऱ्या भल्याभल्या लोकांना त्याची लाइफस्टाइल पाहून लाज वाटावी. एल मॅक्सीकानो स्वत:च्या अंगावर ग्रेनेड फोडून आत्महत्या केली होती. मृत्यूवेळी त्याची संपत्ती ५ बिलियन डॉलर्स इतकी होती.

 

६) कार्लोस इनरीक्यू लेहडेर रीवास:

 

स्रोत

पाब्लो इस्कोबारच्या मेडेलीन कार्टल या गँगच्या कार्लोस सह-संस्थापक होता. ड्रग्जच्या धंद्यातून कार्लोसने बक्कळ पैसा कामावला होता. यंदाचं २०२०मध्ये ३३ वर्षांचा तुरुंगवास भोगून तो बाहेर आला आहे. त्याची संपत्ती २.७ बिलियन डॉलर्सच्या घरात आहे.

 

७) अल- कॅपोने:

 

स्रोत

अल- कॅपोने हा अमेरिकन गँग लीडर होता. त्याच्याजवळ १.३ बिलियन डॉलर्स इतकी संपत्ती असल्याचे आढळून आले. ज्युनियर फोर्टी थीव्हज आणि बॉवरी बॉयस या दोन ग्रुप्सचा लीडर म्हणून काम पाहत त्याने गुन्हेगारी जगतात पाउल टाकले आणि आपला दबदबा निर्माण केला होता. हा देखील आज हयात नाही.

 

८) जोएक्वीन गुझमॅन:

 

स्रोत

इतर ड्रग्ज माफियांप्रमाणे जोएक्वीन प्रसिद्ध नसला तरी त्याने मिळेल त्या मार्गाने पैसा कमावला आहे. एल चापो आणि क्रिस्टल किंग या नावांनी प्रसिद्ध असलेल्या जोएक्वीनकडे १ बिलियन डॉलर्सची संपत्ती आहे.

पण एवढी गडगंज संपत्ती असूनही यातील एकाही माणसाला  सुख  समाधान लाभले नाही, कितीही झालं तरी शेवटी मेहनतीचे फळच गोड लागते

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version