' WhatsApp च्या निर्मात्यांच्या जिद्दीची थक्क करणारी कहाणी! – InMarathi

WhatsApp च्या निर्मात्यांच्या जिद्दीची थक्क करणारी कहाणी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

Whatsapp हे एक असे अप्लिकेशन आहे ज्याने आपल्याला लोकांच्या जवळ आणण्याचे काम केले. आज Whatsapp मुळेच जगाच्या कुठल्याही काना-कोपऱ्यात असणारी माणसं आपल्या लोकांशी संपर्क साधू शकतात, बोलू शकतात एवढंच नाही तर व्हिडीओ कॉलिंग द्वारे एकमेकांना बघूही शकतात.

आपल्या आयुष्यात एवढा अमुलाग्र बदल घडवून आणलेल्या Whatsapp ची निर्मिती कशी झाली आणि ती कोणी केली हे तुम्हाला माहित आहे का?

 

whatsapp-inmarathi05
logomyway.com

२००९ साली सुरु झालेल्या Whatsapp शी आज जगभरातील ६० कोटी लोक जोडले गेले आहेत. सुरवातीच्या पाच वर्षांतच Whatsapp चे ४५ कोटी हून जास्त युझर्स झाले होते. एवढं यश ज्या अप्लिकेशनला मिळालं त्याला बनविणाऱ्या मंडळींबाबत तर जाणून घेतलेच पाहिजे.

Whatsappची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इतर सोशल नेटवर्किंग साईट्स प्रमाणे ह्यावर कुठल्याही प्रकारच्या जाहिराती येत नाहीत. ह्याचा रेव्हेन्यू मॉडल हा पूर्णपणे ‘सब्सक्रिप्शन’ वर आधारित आहे.

ह्याच्या युझर्सना पहिल्या वर्षी हे मोफत वापरता येतं पण त्यानंतर प्रतिवर्ष ०.९९ डॉलर एवढी किंमत द्यावी लागते. पण भारतात हे अजूनही फ्री आहे.

 

whatsapp-inmarathi01
bizna.ir

पण यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अनेक लहान-मोठे डोंगर पार करावे लागतात. प्रत्येक सक्सेस स्टोरीमागे अनेक संघर्षाच्या कहाण्या दडलेल्या असतात. Whatsapp चे संस्थापक Jan Koum आणि Brian Acton ह्यांनी देखील हे दिवस बघितले आहेत.

ज्या फेसबुकने अरबो डॉलर रुपये खर्च करून Whatsapp विकत घेतले त्याच फेसबुकने एकेकाळी ह्या दोघांना नोकरीवर ठेवण्यास नकार दिला होता.

 

whatsapp-inmarathi03
indoworx.com

सोशल नेटवर्किंगच्या दुयिनेत क्रांती घडवून आणणारे Jan Koum ह्यांचा जन्म युक्रेनच्या कीव शहरात २४ फेब्रुवारी १९७६ साली झाला. १६ वर्षांच्या वयात काही कारणास्तव त्यांना त्यांच्या वडिलांना सोडून आई आणि आजी सोबत अमेरिकेला यावं लागलं.

ह्यानंतर सोवियत संघाद्वारे मिळालेल्या नोटबुकचा वापर करत त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण घेतले. घरच्या बिकट परिस्थितीमुळे त्यांनी एका किराण्याच्या दुकानात झाडू मारायचे काम करण्यास सुरवात केली.

 

brian acton InMarathi

 

ह्यादरम्यान Jan Koum ह्यांच्या आईला कॅन्सर ह्या रोगाने ग्रासले. आईला सरकारकडून मिळालेल्या उपचार भत्त्यामधून काही पैश्यांनी त्यांनी स्वतःसाठी एक कॉम्पुटर नेटवर्किंगचे पुस्तक घेत त्यातून ज्ञान मिळविले.

त्यानंतर Jan Koum ह्यांनी सिलिकॉन वॅलीच्या सरकारी विश्वविद्यालयात प्रवेश घेतला आणि सोबतच एका कंपनीत सिक्युरिटी टेस्टर म्हणून काम देखील पाहिले. ह्याच दरम्यान १९९७ साली त्यांना याहू मध्ये काम मिळालं आणि तिथे त्यांची भेट ब्रायन ऐक्टन ह्यांच्याशी झाली.

नऊ वर्षांपर्यंत याहूमध्ये काम केल्यानंतर त्यांनी २५ लाख रुपयांची सेविंग करत आपली नोकरी सोडली.

 

whatsapp-inmarathi06
businessinsider.in

२००९ च्या जानेवारी महिन्यात त्यांनी स्वतःसाठी Apple चा iPhone घेतला. पण त्यांच्या जिम पॉलिसीनुसार ते त्यांच्या फोनचा वापर करू शकत नव्हते. मग त्यांनी Skype वापरण्यास सुरवात केली. पण एक दिवस ते त्यांचा पासवर्ड विसरले. तेव्हा त्यांना एक अशी अप्लिकेशन बनविण्याचं सुचलं ज्यामध्ये अश्या प्रकारच्या कुठल्याही समस्या उद्भवणार नाही.

त्यांना एक असं अप्लिकेशन तयार करायचं होतं ज्याद्वारे केवळ फोन नंबर वरून लोक एकमेकांशी जोडले जातील.

 

brian acton 1 InMarathi

 

त्यांनी ब्रायन ऐक्टन ह्यांना आपली कल्पना सांगितली. आणि त्यानंतर ह्या दोघांनी मिळून Whatsappची रचना केली. सोबतच ते नोकरी देखील शोधत होते. ह्यादरम्यान त्यांनी Facebook आणि Twitter सारख्या सर्व मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला.

पण त्यांना कुठेही नोकरी मिळाली नाही. तरी ह्या दोघांनी आपल्या नव्या प्रोजेक्ट म्हणजेच Whatsapp वर पुरेपूर मेहनत घेतली. आणि याहूच्या काही माजी अधिकाऱ्यांनी त्यांच्या ह्या प्रोजेक्टमध्ये फंडिंग करण्याची इच्छा दर्शविली. त्यानंतर Whatsapp जगासमोर आलं.

 

whatsapp-inmarathi
quora.com

२०१० साली जेव्हा Whatsapp नुकतेच लॉंच झाले होते, पण तरी Whatsapp ने ५००० डॉलर प्रती महिना कमविण्यास सुरवात केली. तर २०११ पर्यंत Whatsapp जगभरात प्रसिद्ध झालं असून हे अप्लिकेशन सर्वांच्याच आवडीचं आणि सोयीचं ठरलं.

 

whatsapp-inmarathi04
wired.com

२०१४ साली Whatsappचे यश बघून फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गने कम ह्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. आणि त्यानंतर फेसबुकने Whatsapp ला विकत घेतले. जेव्हा कम ह्यांनी ही डील केली तेव्हा त्यासाठी त्यांनी तेच ठिकाण निवडले जिथे ते त्यांच्या आईसोबत तासंतास उभं राहून जेवण मिळण्याची वाट बघत होते.

जर तुमच्यात काही करून दाखविण्याची इच्छा आणि जिद्द असेलं तर तुम्हाला ते करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही असे म्हणतात, Jan Koum आणि Brian Acton त्याचच एक जिवंत उदाहरण आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?