Site icon InMarathi

फोबिया”! तुम्हालाही “या” गोष्टींची भीती सतावून जीवन त्रासदायक होऊन बसलंय का?

fobia-inmarathi07

cfhp.com.au

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती वाटत असते. आपल्या आजूबाजुला अनेक लोक आपल्याला भेटत असतील ज्यांना अंधार, पाल, झुरळ किंवा इतर कुठल्या गोष्टीची भीती वाटत असेल.

भीती ही स्वाभाविक गोष्ट आहे. प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते, पण एखाद्या गोष्टीची भीती वाटणं आणि त्या गोष्टीचा फोबिया असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या गोष्टीचा फोबिया असणारी व्यक्ती ती गोष्ट समोर आल्यानंतर स्वतःला सावरू शकत नाही.

मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर, एखाद्या गोष्टीची अति जास्त भीती वाटणं म्हणजे फोबिया. साधारण फोबियाचे तीन प्रकार असतात. स्पेसिफीक फोबिया, सोशल फोबिया आणि एग्रोफोबिया.

 

thehealthsite.com

 

उंची, कोळी, साप, बंद खोली, रक्त, अपघात हे अगदी सर्वसामान्य लोकांमध्ये आढळणारे फोबिया आहेत, पण या गोष्टींव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टींची मानवी मनाला भीती वाटते. या गोष्टी आपल्या कल्पनेपल्याड आहेत.

काही लोकांना अशाही गोष्टींपासून भीती वाटत असते ज्या आपल्याला खूप विचित्र वाटू शकतात. हे काही असे फोबिया आहेत जे ऐकायला जरी विचित्र वाटत असले तरी अनेकांचं जीवन ह्यामुळे त्रासदायक होऊन बसतं.

या फोबियांनी ग्रस्त असणाऱ्या लोकांनी ताबडतोब योग्य सल्ला घेण्याची गरज आहे. जाणून घेऊया अशाच काही विचित्र फोबियांबद्दल..

 

एगिरोफोबिया म्हणजे रस्ता ओलांडण्याची भीती :

 

nuestropsicologoenmadrid.com

 

तुम्ही कधी मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर गेला आहात का? गेला असाल तर रस्ता क्रॉस करताना भीती वाटणं म्हणजे नेमकं काय याचा अर्थ तुम्हाला समजू शकतो. हायवे वर तर सतत वाहनं वेगाने ये – जा करत असतात. अशात रस्ता क्रॉस क्रॉस करायचं म्हटलं की पोटात गोळा आलाच पाहिजे.

एगिरोफोबिया असलेल्या लोकांना रस्ता किंवा हायवे ओलांडण्याची भीती असते. अशा लोकांना शहरात राहताना खूप समस्या येतात, कारण शहरात खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं जाळं पसरलेलं असतं.

 ह्या फोबियाने ग्रासलेल्या लोकांना शहरात राहायची भीती वाटते कारण त्यांना रस्ते ओलांडण्याची भीती सतावत असते.

 

मॅग्रिकोफोबिया म्हणजे जेवण बनविण्याची भीती :

 

listverse.com

 

कोणालाही आनंदी करण्याचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो असं म्हणतात. “खाद्यजीवन” हा प्रत्येकाचा लाडका विषय आहे. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण सतत किचनमध्ये विविध प्रयोग करत असतो.

“उत्तम स्वयंपाक करता येणं” हे एका कर्तव्यदक्ष गृहिणीचं लक्षण मानलं जातं, पण स्वयंपाक करायला सगळ्यांनाच आवडत असं नाही.

मॅग्रिकोफोबिया ह्या भीतीने ग्रासलेल्या लोकांना जेवण बनविण्यापासून भीती वाटते. एकटे राहणाऱ्या लोकांना हा फोबिया जास्त करून होतो.

 

पीडियोफोबिया म्हणजे बाहुल्यांची भीती :

 

arts.cecil.edu

 

प्रत्येक मुलीसाठी बाहुली ही खूप खास असते. आपल्याकडे खूप बाहुल्या असाव्यात असं लहानपणी प्रत्येकाला वाटत असतं, पण सगळ्यांनाच बाहुल्या आवडतात असं नाही.

गोड, गोंडस दिसणाऱ्या बाहुल्यांची सुद्धा अनेकांना भीती वाटते.

हा फोबिया असणाऱ्या लोकांना बाहुल्यांची भीती वाटत असते. भीतीदायक एनाबेले सारख्या बाहुल्याच नाही तर ह्यांना चांगल्या बाहुल्यांची देखील भीती वाटते.

 

डीपनोफोबिया जेवताना बोलण्याची भीती :

 

incisozluk.com.tr

 

जेवण म्हटलं की गप्पा गोष्टी या आल्याच. ऑफिसमध्ये तर लंच ब्रेक हा जवळपास सगळ्यांनी एकत्र येऊन गप्पा मारण्यासाठीच असतो.

हल्ली कुटुंबातील सगळेच कामावर जातात त्यामुळे रात्री घरी आल्यानंतर, एकमेकांशी बोलण्यासाठी फक्त जेवणाचा वेळ त्यांच्याकडे असतो. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण काही लोकांना जेवताना बोलण्याची पण भीती वाटते.

ह्या फोबियाने ग्रासलेले लोक रात्रीचे जेवण करताना बोलण्याचे टाळतात.

 

इसिप्ट्रोफोबिया म्हणजे आरशाची भीती :

 

healthcaretip.com

 

आरसा कोणाला आवडत नाही? “आपण कसे दिसतो?” ही जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. काहीजण तर दिवसातून अनेकदा आरशात आपलं रूप न्याहाळतात.

मुलींसाठी आरसा हा जास्त खास असतो.

ह्या फोबियाने ग्रासलेल्या लोकांना आरश्यात स्वतःला बघण्याची भीती वाटते. त्यांना भीती असते की, आरशाच्या दुसऱ्या बाजूला एक जग आहे आणि आपण आरशात पाहिले तर कदाचित आपण त्या जगात जाऊ.

 

पेन्थेराफोबिया म्हणजे सासूची भीती :

 

jagran.com

 

सासू- सून हे नातं वेगळंच आहे. टीव्हीवरील मालिका बघितल्या तर जाणवतं की, सासू आणि सून कधी एकत्र राहू शकत नाही. कायम त्यांच्यामध्ये भांडणं होतंच असतात.

लग्न करण्याआधी प्रत्येक मुलीला ही भीती असते की “आपली सासू कशी असेल?” तुम्हाला वाचून थोडंसं हसू येईल, पण सासूची भीती हा सुध्दा एक फोबिया आहे.

हा सर्वात कॉमन असा फोबिया आहे. ह्यात लोकांना स्वतःच्या सासूची भीती वाटते.

 

कॅथिसोफोबिया म्हणजे एका ठिकाणी बसण्याची भीती :

 

forbes.com

 

बऱ्याचदा ऑफीसमध्ये कामाच्या निमित्ताने आपल्याला एकाच ठिकाणी बसावं लागतं. आपल्याला या गोष्टीचा कंटाळा येतो, पण काहीना मात्र एकाच ठिकाणी बसण्याची भयंकर भीती वाटते.

ह्या फोबियाने ग्रासलेली व्यक्ती एका ठिकाणी खूप वेळ बसू शकत नाही.

कोणत्या न कोणत्या फोबिया ने पिडीत जगात आणि भारतात लाखो रुग्ण आहेत यावर योग्य पद्धतीने मानसोपचार तज्ञाकडून इलाज करून घेणे हितावह आहे.

ही उपचार पद्धती, बऱ्याचदा काही आठवडे ते काही महिने चालते. परंतु धीर न सोडता, अशा डॉक्टरांकडे नियमितपणे जाऊन आपल्या भीतीला नियंत्रणात ठेवणे योग्य असणार आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version