Site icon InMarathi

आयपीएल चिअरलीडर्सच्या पडद्यामागील दुनियेचे दाहक वास्तव : सत्य अन आभासाचा निर्दयी खेळ

cheerleaders-inmarathi00

cricrevolution.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आयपीएलचा मोसम सुरू झाला की आपल्या क्रिकेटप्रेमींच्या नजरा वळतात त्या टीव्हीकडे आणि आपण मग फ्रेश होण्यासाठी किंवा आयुष्यात काहीच काम नाही म्हणूनही आयपीएल पाहायला सुरूवात करतो.

काही खरेच क्रिकेट रसीकही असतात जे आतुरतेनं आयपीएलची वाट पाहात असतात. सुर्यवंशम चित्रपटाला प्रदर्शनावेळी जेवढी प्रसिध्दी मिळाली नसेल तेवढी प्रसिध्दी आयपीएल, सेट मॅक्सबरोबर असलेल्या नात्यामुळे आणि त्यांच्यावर होणाऱ्या सोशल मीडियातल्या विनोदांमुळे मिळाली. असो..

 

zeenews.india.com

आज आपण जरा वेगळ्या मुद्द्यावर चर्चा करूयात.

आयपीएल म्हटलं की आपल्याला बऱ्याच गोष्टी आठवतात, षटकारांचा पाऊस, दे दना दन फटकेबाजी, मैदानातली भांडण आणि बरंच काही. या बरंच काही मध्ये एक गोष्ट दडलीय ती म्हणजे सुंदर, सुडौल अशा चिअरलिडर्सचा जलवा.

आजपर्यंत आपण केवळ चिअरलिडर्सचा नृत्याविष्कार पाहिला असेल. परंतु या लवचिक लवचिक ललना कशा प्रकारे स्वत:ला मेन्टेन ठेवतात आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य कशा प्रकारे असतं हा प्रश्न आपल्याला कधीना कधी पडतोच. पण आपण त्याच्या खोलात जाण्याचा कधी प्रयत्न करत नाही.

मृगाचा किडा जसा नक्षत्र जवळ आल्यावर दिसू लागतो आणि नक्षत्र संपताच गायब होतो. काहीसं अशाच प्रकारचं या चिअर लिडर्सचं विश्व असतं.

यावर्षी ८ संघांपैकी ६ संघाच्या चिअरलिडर्स या विदेशी होत्या. तर चैन्नई सुपरकिंग आणि राजस्थान रॉयल्सच्या चिअरलिडर्स ह्या भारतीय होत्या.

या चिअरलिडर्स केवळ आयपीएलच्या मोसमात आपल्याला दिसतात खऱ्या परंतु त्या शिवाय इतर काळात त्या वेगवेगळ्या बारसाठी देखील डान्स करतात.

वेगवेगळ्या कार्यक्रमात आपला नाच दाखवून पैसे कमवण्याचे मार्ग या चिअर लिडर्स चोखाळत असतात. त्यांना न केवळ डान्स करावा लागतो तर आपल्या शरीराला लवचिक ठेवण्यासाठी मेहनत देखील घ्यावी लागते. काही चिअर लिडर्स ह्या पेशाने डान्सरच असल्यामुळे मिळालेली संधी शक्यतो त्या गमावत नाहीत.

 

mensxp.com

डान्ससाठी रोजची प्रॅक्टीस करत असताना बऱ्याच वेळा या चिअर लिडर्सना दुखापती देखील होतात. आणि मग त्यातून सावरण्यासाठी त्यांना बराच वेळ आणि पैसा देखील खर्च करावा लागतो.

एखाद्या खेळाडूला फिटनेससाठी जेवढे कष्ट घ्यावे लागतात, तेवढेच कष्ट या चिअऱ लिडर्सना घ्यावे लागतात. चिअर लिडर्सना त्यांच्या डाएटकडे द्यावं लागणार लक्षं आणि केवळ आयपीएलच नव्हे तर विविध कार्यक्रमांत त्यांना प्रेक्षकांच्या मागणीप्रमानेदेखील नृत्य करावं लागतं.

त्यात त्यांची प्रत्येकवेळी वेगळी वेशभूषा ही देखील त्यांना त्रासदायक ठरते. आणि अशावेळी त्यांच फिट असणं हे किती महत्वाचं आहे याची आपल्याला कल्पना येईलच. सोबतच काही चिअरलिडर्सवर स्वत:च्या परिवाराची देखील जबाबदारी असते अगदी हिंदी सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे.

संपूर्ण कुटूंबाला पोसण्याचं काम काही भारतीय चिअर लिडर्स करतात. त्यामुळे एकाचवेळी अनेक जबाबदाऱ्यांच वहन करणाऱ्या या चिअर लिडर्सबद्दल तुम्हाला थोडासा का होईना पण अभिमान वाटेल.

तुम्हाला वाचून हसू येईल पण हे सत्य आहे की, सर्वात प्रथम पुरूष मंडळी हे चिअर लिडरचा व्यवसाय करायचे. चिअर लिडर्सचे आद्य जनक म्हणून आपल्याला जॉन कँपबेल यांचं नाव घ्यावं लागेल.

ज्याप्रकारे महिला नाचून चिअर करतात त्याचप्रमाणे पुर्वी पुरूष नाचायचे. चिअर लिडर्स कल्चरची सुरूवात अमेरिकेच्या युनिवर्सिटी ऑफ मिनिसोटामधून प्रामुख्याने झाली तेंव्हा महिला ऐवजी पुरूष नाचायचे. परंतु दुसऱ्या महायुध्दाची सुरूवात झाली आणि सर्व पुरूषांना युध्दासाठी सिमेवर जावे लागले.

त्याच्यातून हे पुरुष चिअर लिडर्सही सुटले नाहीत. जेव्हा या पुरूषांना सिमेवर जावे लागले तेंव्हा महिलांनी चिअर लिडर्स म्हणून नाचायला सुरूवात केली.

 

themarysue.com

आजकाल नाचणाऱ्या चिअर लिडर्स ह्या देश आणि विदेशातल्या विविध संस्थाशी करार करून आयपीएलमध्ये दाखल होतात. यांचं वेतनही जवळपास ८० हजार रूपये ते दीड लाख रूपयांपर्यंत असतं. परंतु भारतीय चिअर लिडर्सच वेतन हे विदेशी चिअर लिडर्सच्या तुलनेत कमी असतं.

कधी कधी इतकी अंगमेहनत या चिअर लिडर्सना घ्यावी लागते की मिळणार वेतन देखील त्यांना कमी असल्याचं जाणवू लागतं. चिअर लिडर्सना कधी कधी यातूनच मोठ्या संधी देखील मिळतात. तर कुणाला जोडीदारही.

एकेकाळी कोलकाता नाईट राईडर्ससाठी चिअर लिडरचं काम करणारी हसीन जहाँ आघाडीचा क्रिकेटपटू मोहम्मद शमीसोबत विवाहबध्द झाली. नंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच विवाद झाले तो भाग वेगळा.

केवळ आयपीएलच नव्हे तर विदेशात बऱ्याच खेळांसाठी चिअर लिडर्स नाचण्याचे काम करतात. सोबतच मॉडेलिंग आणि प्रोफशनल डांन्सर म्हणून देखील त्या काम करतात.

त्यामुळे त्या वर्षभर बेरोजगार असतात की काय असा प्रश्न पडणाऱ्या चिअऱ लिडर्सच्या काळजीवाहू माझ्या मित्रांनी टेन्शन घेण्याचं कारण नाही. गमतीचा भाग सोडला तर चिअर लिडर्सकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन किती वाईट असतो हे त्यांच्याशी बोलल्यानंतरच समजेल.

काही बडे लोक अशा चिअर लिडर्सना संपर्क करण्याचा प्रयत्न देखील करतात. कधी कधी त्यांच्याकडे धनदांडग्या व्यक्तींकडून शरीर सुखाचीदेखील मागणी केली जाते. त्यामुळे न केवळ प्रेक्षकांच्या नजरांचा त्यांना सामना करावा लागतो, तर अश्लिल शेरेबाजी सुध्दा त्यांना नजरेआड करावी लागते.

 

storiesincorporated.com

तसं वेगवेगळ्या कार्यक्रमात महिलांना नाचवणे हा या भूतलावरचा अलिखीत नियमच. मग ते विदेशातले डान्स असोत किंवा भारतीय मुजरा. मानसिकता तीच आहे केवळ बदलतेय ती त्याची पध्दत.

पूर्वी महिला या पुरुषांसाठी खेळणं होत्या आज कदाचित थोडासा काळ बदललाय महिला आपल्या पायावर सक्षमपणे उभे राहातायत. परंतु पुरूष मंडळींच्या नजरांना सुखावण्यासाठी त्यांना आजही नाचगाणी करावी लागतात. कधी पैशांसाठी तर कधी हौसेपोटी. त्यातून आयपीएल तरी कसं सुटणार.

शेवटी आपला संघ हारला तर किमान चिअर लिडर्सवर अश्लिल शेरेबाजी करत त्यांच्या गोऱ्यापान मांड्याना वासनेच्या नजरेत पुरेपुर भरून काही मंडळी आपला पैसा मात्र नक्की वसूल करतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version