Site icon InMarathi

तुमच्या कमी झोपेचा परिणाम चक्क तुमच्या देशाच्या आर्थिक परिस्थितीवर कसा होतो ? जाणून घ्या..

sleep less inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आजकाल लोक आपल्या आरोग्याकडे खूप लक्ष द्यायला लागले आहेत. त्यासाठी योग्य तो आहार, व्यायाम, दिनचर्या इत्यादी सर्व ते अवलंबत आहेत.

ह्यासोबतच झोप ही आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाची असते हे देखील आता लोकांच्या लक्षात यायला लागले आहे.

योग्य आणि पूर्ण झोप ही माणसासाठी खूप महत्वाची असते.

झोप पूर्ण न झाल्यास अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. तसेच जर झोप पूर्ण झाली नाही तर त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या संपूर्ण दिवसावर होतो.

पण तुम्हाला माहित आहे का, तुमच्या अपूर्ण झोपेचा परिणाम तुमच्या शरीरावरच नाही तर तुमच्या देशाच्या आर्थिक परिस्थितीवर देखील होतो.

 

timothypope.co.uk

 

हो… हे खरं आहे आणि हे आम्ही नाही तर एका रिसर्चने सिध्द करून दाखवलं आहे.

कमी झोप घेतल्याने तुमच्या देशाचे खूप आर्थिक नुकसान होऊ शकतं. हा रिसर्च ऑस्ट्रेलियात करण्यात आली आहे.

आता तुम्ही म्हणालं की आमची झोपं अन्ही देशाची आर्थिक परिस्थिती ह्यांचा काय संबंध? पण हे खरं आहे.

 

tripurainfoway.com

 

झोपेसंबंधी ही रिसर्च ऑस्ट्रेलियाच्या विक्टोरिया विद्यापीठ आणि यूनिवर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने केली.

एका जर्नल मध्ये छापून आलेल्या ह्या स्टडीमध्ये माणसाच्या कमी झोप घेण्याचे मूल्यांकन करण्यात आले.

ह्या रिसर्चमध्ये एका एखाद्या व्यक्तीच्या कमी झोपण्याचे काय काय आर्थिक दुष्परिणाम होऊ शकतात हे दर्शविण्यात आले आहे.

 

topyaps.com

 

ह्या रिसर्चनुसार जर एखाद्या देशातील नागरिक हे पूर्ण झोपं नसेल घेत, तर ह्यामुळे देशाला अरबो रुपयांचे आर्थिक नुकसान भोगावे लागू शकतात.

रिसर्चनुसार कमी झोप घेतल्याने आरोग्या संबंधी झालेल्या समस्यांवर आरोग्य सुविधेवर खर्च, हेल्थकेअर सेक्टरच्या बाहेर आरोग्यासाठी केलेला खर्च, अपूर्ण झोपेचा कार्यक्षमतेवर झालेला परिणाम, गाड्यांच्या अपघातामुळे होणारा खर्च इत्यादी समाविष्ट आहेत.

 

absfreepic.com

 

ह्या स्टडी नुसार ऑस्ट्रेलियामध्ये नागरिकांनी कमी झोप घेतल्यामुळे जवळपास १७.८८ बिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर एवढे नुकसान होते.

हा खर्च ऑस्ट्रेलियाच्या जीडीपीच्या १.५ टक्के एवढा आहे.

 

nownews.com

 

ह्या रिपोर्टनुसार जगातील प्रत्येक तिसरा व्यक्ती हा पूर्ण झोप घेत नाही. ह्यामुळे त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

वेगवेगळ्या स्लीप सर्वे म्हणजे झोपण्यावर झालेल्या सर्वेमध्ये असे दिसून आले आहे की, ऑस्ट्रेलियात जवळपास ३३ ते ४५ टक्के लोक हे अपूर्ण झोपं घेतात. तर अमेरिकेत ३० टक्के, ब्रिटन मध्ये ३७ टक्के लोक ह्या यादीत मोडतात.

 

indiasinvitation.com

 

स्विस बँक यूबीएसच्या एका रिपोर्टनुसार, जगातील ७७ देशांच्या तुलनेत आपल्या देशातील मुंबई येथील लोक सर्वात जास्त वेळेपर्यंत काम करतात.

मुंबईत राहणारी प्रत्येक व्यक्ती ही वर्षभरात सरासरी ३,३१४.७ तास काम करते. हा आकडा रोम आणि पॅरीस सारख्या प्रमुख युरोपीय देशांच्या तुलनेत दुप्पटीहून जास्त आहे.

 

mumbailocal.net

 

मुंबईतील लोक हे आपला जास्तीत जास्त वेळ हा कामाला देतात. त्यामुळे ह्याचा परिणाम त्यांच्या झोपेवर होतो आणि झोप पूर्ण होत नाही म्हणून त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो.

कामाचे अतिरिक्त तास ही समस्या आहेच, मात्र त्यानंतरही रात्री अपरात्र जागून इंटरनेटवर वेळ घालवणं, अथवा फोनवर गप्पा मारणं यांसारख्या सवयींमुळे झोपेचा अवधी जास्त काम झाल्याचेही अनेकदा शास्त्रज्ञांकडून सांगितले जाते.

मुंबईप्रमाणेच आपल्या इतर शहरांची देखील हीच परिस्थिती आहे. आपल्या देशातील नागरिक आवश्यक तेवढी झोपं घेत नसल्याचा त्याचे आर्थिक नुकसान कदाचित भारतालाही होत असेल.

त्यामुळे कामांत योग्य यश हवे असेल, आणि आपल्यासह देशाची आर्थिक प्रगती व्हावी असे वाटत असेल, तर पुरेशी झोप घेऊ ताजेतवाने होऊन कामात अधिक सक्रीय राहणे गरजेचं आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version