आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जेवणाची लज्जत वाढवण्यात लसूण आणि कांदा खूप मोलाची भूमिका बजावतात, हे आपल्याला माहिती आहेच. या दोन्ही भाज्यांमुळे जेवणाला वेगळीच चव येते आणि ते अजून चटकदार बनते, हे मात्र नक्की आहे. पण बऱ्याचदा आपल्याला कानी पडतं की कांदा लसूण खाऊ नये.
मुख्यतः जर आपला मित्र ब्राम्हण किंवा जैन समाजाचा असेल तर त्याचा तोंडून आपण हे नेहमी ऐकत असतो.
“सात्विक भोजन” म्हणजे लसूण कांदा वर्जित भोजन होय. ब्राम्हण, जैन आणि मारवाडी समाजात मुख्यतः अश्याप्रकारचे भोजन तयार केले जाते.
सात्विक भोजन केल्याने “तम” गुण नाहिसे होतात असं देखील म्हटलं जात असतं. कारण लसूण आणि कांदा तामसिक पदार्थ आहेत ज्यामुळे प्रकृतिवर दुष्परिणाम होत असतो – असा समज आहे.
अश्यावेळी आपण विचार करतो की तामसिक भोजन म्हणजे नेमकं काय? लसूण आणि कांद्याचा त्याच्याशी काय संबंध?
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
तर – असं म्हटलं जातं की जेवणाचा मनावर खूप परिणाम होत असतो. जे अन्न आपण खातो, तसेच आपले विचार ही तयार होत जातात. तर आपण या मागील पुराणिक आणि सामाजिक तत्व जाणून घेऊयात.
तर चला जाणून घेऊया लसूण आणि कांद्याने असं नेमकं काय होतं ते !
–
- समुद्रमंथनातून मिळालेला, तुमच्या स्वयंपाकघरात असलेला `हा’ पदार्थ खाल्ल्याने होणारे फायदे वाचाच
- जैन समुदायातील लोकं कांदा लसूण खात नाहीत यामागील कारण तुम्हाला ठाऊक नसेल
–
आयुर्वेदानुसार भोजनाचे तीन प्रकार असतात – सात्विक, राजसिक आणि तामसिक. यापैकी सात्विक भोजन केल्याने शांती, संयम या सारखे गुण विकसित होऊन मनाची पवित्रता वाढत जाते. राजसिक भोजन केल्याने काम करण्याची इच्छा वाढते आणि स्वभाव आनंदी होतो.
परंतु तामसिक भोजन केल्याने अहंकार वाढतो, वाईट कल्पना मनात येतात, मन अशांत होते, लहान लहान गोष्टींवर चिडचिड होते.
दूध, तुप, गव्हाचे पीठ, भात, मुंग, पडवळ, कारलं, मेथी हे खाद्यपदार्थ सात्विक आहेत. तिखट चटपटे खाद्य पदार्थ आणि गोड पदार्थ रजोगुण वाढवतात. कांदा लसूण, मांस-मासे आणि अंड्यासारखे पदार्थ शरीरातले तम गुण वाढवतात.
लसूण आणि कांद्याशी निगडित एक पौराणीक कथासुद्धा आहे…! त्या कथेबद्दलसुद्धा जाणून घेऊयात.
असं म्हटलं जातं की जेव्हा भगवान विष्णु समुद्रमंथनातून निघालेल्या अमृताचे “मोहिनी” रूप धारण करून देवी देवतांमध्ये वाटप करत होते तेव्हा तेथे दोन राक्षस देखील येऊन बसले. त्यांचं नाव होतं राहू आणि केतू, त्यांना अमृताचे काही थेंब हाती लागले.
परंतु जेव्हा भगवान विष्णूंना राक्षसांच्या कपटाबद्दल समजलं तेव्हा त्यांनी त्या दोन्ही राक्षसांचं डोकं धडावेगळ केलं.
मुंडकं धडावेगळं केल्याने ते अमृताचे थेंब जमिनीवर कोसळले आणि त्यातून कांदा व लसूण यांचा जन्म झाला.
एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी –
अमृतापासून तयार झाल्याने रोगांशी लढण्यासाठी आवश्यक गुण या दोघांत अमृतामुळे होते. परंतु राक्षसमुखातून बाहेर पडल्याने अत्यंत उग्र दर्प / वास त्यातून यायचा. त्यामुळेच त्यांना अपवित्र म्हटलं जातं होतं.
शास्त्रीय कारण
लसूण आणि कांदा दोन्ही उष्णतावर्धक पदार्थ आहेत. दोन्ही पदार्थ ग्रहण केल्यावर शरीरात उष्णता वाढते. त्यामुळेच यांना तामसिक भोजन श्रेणीत गणले जाते. ह्या पदार्थांचं सेवन केल्याने काम वासना देखील प्रचंड वाढते.
ज्यामुळे माणसात अपप्रवृत्तीचा संचार होण्याची शक्यता असते. त्याने मनुष्य अध्यात्म, चिंतन या पासून लांब जातो व स्वभाव अतिशय उग्र होतो.
मित्रांनो आता तुम्हाला कळाले असेल की कांदा लसूण खाल्याने शरीरावर काय परिणाम होतात व आहाराचा मनोवृत्तीशी कसा सरळ संबंध असतो.
अर्थात, ह्या धारणा आहेत. ह्या अनेकांसाठी श्रद्धा – विश्वास आहेत तर अनेकांसाठी अंधश्रद्धा!
आता हे सर्वस्वी तुम्ही ठरवायचं की या धारणा आणि मान्यता यांचा स्वीकार कितपत करायचा आहे. लसूण व कांदा यांची जेवणातील मात्रा किती ठेवायची आहे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.