Site icon InMarathi

मोदींच्या नोटबंदीमुळे गब्बरसिंगची पण झाली होती गोची !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

गब्बर: (त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये) मुहाहाहाहा….मुहाहाहाहा…आक थू…. (सगळे हसतात)

स्रोत

साम्भा: अरे प्रसंग काय, तुम्ही हसता काय?

 

गब्बर: का रे? अजून काय वाईट झालं?

 

साम्भा: आपण लुटलेले सगळे पैसे ब्लॅक मनी आहेत. रामगडचे लोक सुद्धा आता भाव देत नाहीत. आता भीक मागितल्याशिवाय पर्याय नाहीये.

स्रोत

गब्बर: अरे ओ साम्भा, कितना इनाम रक्खे है सरकार हम पर?

 

साम्भा: पुरे पचास हजार.

 

गब्बर: (सद्गदित होऊन) बरंय. बहुजन हिताय, बहुजन सुखाय ! मला सरकारच्या हवाले करा आणि तुमचं पोट भरा.

स्रोत

साम्भा: तुम्हाला डिपॉझिट करून पण काय होणार नाय. कॅश विथड्रॉव्हल लिमिट फकस्त ४००० पर डे आहे. आधीच सांगितलं होतं की प्लास्टिक मनी वापरूया म्हणून, पण तुम्ही मोठे शहाणे, ओल्ड स्कुल वाले, कॅशच हवी. ओह सॉरी हां, कुठल्याही स्कुल मध्ये गेला नाही हा अडाणी माणूस.

 

 

स्रोत

गब्बर: (एक मोठा आवंढा गिळून) कालियाssss

 

कालिया: पण सरदार, मी तुमचं मीठ खाल्लंय.

 

गब्बर: मग आता रांग खा, आय मीन रांगेत जाऊन उभा रहा.

 

(कालिया हात हलवत परत येतो)

 

गब्बर: ह्म्म्म….कितने आदमी थे?

 

कालिया: आम्ही तीनजण गेलो होतो, सरदार

 

गब्बर: फिर भी वापस आ गये….खाली हाथ!!! क्या समझ कर आये थे? सरदार बहुत खुश होगा, साबासी देगा, क्यू?धिक्कार है

स्रोत

कालिया: डुकराच्या पिल्लाची उपमा द्यायच्या आधी ऐकून तरी घ्या. ते फोटो आयडी मागत होते. तुमचं इनामवालं पोस्टरपण घेऊन गेलो, तर त्यांनी टराटरा फाडलंन.

 

गब्बर: (त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये) मुहाहाहाहा….मुहाहाहाहा…आक थू….

 

साम्भा: भैसाटलाय सरदार !

 

गब्बर: ठाकूरची ओळख आहे, एसबीआय ब्यांकेत. नाहीतर कधी कामाला येईल तो. त्याच्या सहीचे आज्ञापत्रक बनवून घे साम्भा आणि जा ब्यांकेत उद्या.

स्रोत

साम्भा: साइन कसा करेल त्यो? त्याचे हात कापायच्या आधी विचार करायला हवा होता.

 

गब्बर गपगार होतो आणि कपाळावर हात मारून घेतो.

स्रोत

भयाण शांतता…..!

तिथून इमाम चाचा शतपावली करत असतात…

इतना सन्नाटा क्यों है भाई…?

 

गब्बर शॉक्स…साम्भा रॉक्स…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version