Site icon InMarathi

“आयफोन” च्या स्टेटस सिम्बॉल बनण्याचं रहस्य त्याच्या चलाख मार्केटिंगमध्ये दडलंय!

iphon-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे… हे वेगळं सांगायची गरज आता उरली नाहीय. जीवनाच प्रत्येक क्षेत्र आज तंत्रज्ञानाने व्यापलं आहे हे पण आपण पाहतोय. शिवाय आपणही त्याचाच भाग आहोत. तंत्रज्ञानाच्या या प्रगतीला क्रांतीच स्वरूप आलं ते मोबाइल फोनच्या उदयानंतर. त्याला कळत नकळत आपलाही हातभार आहेच. ते म्हणजे स्मार्टफोनच्या रुपात सहज उपलब्ध असलेले हे तंत्रज्ञान.

हे तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहचवण्यात सर्वात मोठा वाटा आहे तो, बदललेल्या जाहिरात तंत्राचा.

आज घडीला बाजारात कित्येक नव-नवे ‘ब्रॅण्ड’ येताहेत. प्रत्येकाला ‘बेस्ट सेलर’ च्या जागी आपण असावे असं वाटत राहतं, पण ती जागा कुणीतरी एकचजण घेऊ शकतो.

त्यामुळे स्पर्धा, जाहिरात, प्रायोजक मार्केटिंग यांचा उत आलेला आपण पाहतो. गल्लीतल्या उत्सवापासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सामान्यांपर्यंत या मोबाईल कंपन्या प्रायोजकत्व करताना दिसतात. त्यावर लाखो डॉलरचा खर्च करतात. जाहिरातीच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवताना दिसतात.

 

amazon.com

मोबाईल फोनचे वेगवेगळे ‘ब्रँड’ आता स्थापित झाले आहेत. परंतु बाजारात टिकून राहण्यासाठी त्यांना नाना कसरती कराव्या लागताहेत हे पण आपण पाहतो.

सिनेकलाकार, प्रसिद्ध खेळाडू यांनी एखाद्या ब्रँडची जाहिरात करण्याचे एवढे कोटी घेतले अशा बातम्या देखील आपण वृत्तपत्रातुन वाचत असतो. अशा या स्पर्धेच्या बाजारात एक नाव मात्र स्वतः कसलीही जाहिरात न करता सतत टिकून आहे…काहींना ते एव्हाना लक्षात ही आलं असेल, हो ‘आयफोन’.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अँपल आपल्या आयफोनची कधीही जाहिरात करत नाही. आता तुम्ही म्हणाल मग बऱ्याच ठिकाणी दिसणारी आयफोनची जाहिरात करतो तरी कोण? स्वतः एकही रुपया खर्च न करता आयफोन ना हे जमत कसं? हाच प्रश्न पडलाय ना तुम्हाला?

 

 

आयफोनच्या प्रसिद्धी धोरणाच हे यश आहे. म्हणजे कस ते पहा, आयफोन निर्मिती करणारी कंपनी अँपलची जाहिरात करतात टेलिफोन कंपन्या….म्हणजे आमच्या नेटवर्क सोबत तुम्ही आयफोन वापरा या अर्थाच्या. अशा जाहिरातींचे टेलिफोन कंपन्यांना आयफोन सोबत करार करावे लागतात.

आयफोन त्यातून ही पैसे कमावते. यात टेलिफोन कंपन्यांचा काय फायदा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल…. तर आयफोन चा एक मोठा जागतिक ग्राहक वर्ग आहे, तो आपल्याकडे वळवणे, या उद्देशाने टेलिफोन कंपन्या आयफोनचा प्रसार करतात.

 

adage.com

पण जाहिरात करणाऱ्या भागीदार कंपन्या बदलल्या तरी आयफोनची जाहिरात मात्र बदलत नाही, हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य. आधी ज्या कराराचा उल्लेख केला त्यातच हे अंतर्भूत असतं की आम्ही ठरवू त्याच पद्धतीची जाहिरात झाली पाहिजे.

अन ती तशीच होते कारण जर जाहिरातीत काही बदल करून कराराचा भंग केला तर अशा भागीदार कंपनीला प्रत्यक्ष आयफोन बाजारात विक्रीसाठी पाठवताना डावलल जात.

आयफोनची प्रसिद्धी यंत्रणा इतरांपेक्षा वेगळी ठरते त्याच हे एक कारण, परंतु हे एकमेव नाही. ‘मर्यादित संधी’ या जाहिरातीतील तंत्राचा ‘आयफोन’ खुबीने उपयोग करत आले आहेत. एखादी गोष्ट मर्यादित केली की तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. सर्वांसाठी नसलेली असा एक शिक्का तिच्यावर नकळत बसतो.

 

 

ज्या अर्थी ती सर्वांसाठी नाही त्या अर्थी ती फक्त काही लोकांसाठी आहे हेही ध्वनित होत, केलं जातं. यातून ग्राहकच्या मनात आपण विशेष आहोत ही भावना निर्माण करण्यात जाहिरातदार यशस्वी होतो.

थोडक्यात हे झालं ‘मर्यादित संधीच’ स्वरूप. आज बाजारात हे वेगवेगळ्या प्रकारे वापरलं जातं. कधी काही मोफत देऊन, कधी एखाद्या विशिष्ट वयोगटाला सवलत देऊन तर कधी भावनांना हात घालून हे काम चालत राहतं.

पण यात देखील आयफोनच वेगळे पण अस की त्यांनी कुठलाही एक गट अथवा समूह मर्यादित न करता आपलं उत्पादनच मर्यादित केलं. म्हणजे आम्ही यावर्षी जो नवीन आयफोन बाजारात आणतोय त्याचे ठराविकच संच असतील.

 

 

यामुळे काय होतं, एखादी वस्तू मर्यादित आहे म्हणजे ती संपण्याच्या आधी आपल्याला ती मिळायला हवी म्हणून त्यावर उड्या पडायला लागतात. बाजारात तिची मागणी वाढते. अशी वाढलेली मागणी त्या उत्पादनाचे बाजारातील मूल्य तर वाढवतेच पण त्याची जाहिरात पण करून देते.

सुरवातीला आयफोन एस आला, त्याच्या विक्रीचे अधिकार एकाच विक्रेत्याकडे ठेवण्यात आले, ज्यामुळे विक्रीची एकाधिकारशाही निर्माण झाली. हळूहळू विक्रेते वाढवण्यात आले पण हे देखील मर्यादित स्वरूपातच.

आत्तापर्यंत आयफोनला एक सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली होती. दुर्मिळ असलेली गोष्ट आपल्याकडे असावी ही जी मानवी भावना असते, तिचाच खुबीने वापर करण्यात आला.

सोबतच जो आधी येईल त्यालाच आयफोन मिळेल हा नियम पाळण्यात आला. आता आयफोन विकणाऱ्या दुकानांसमोर विक्री सुरू होण्याच्या आधीच रांगा लागू लागल्या. लोक कसे फोन घेण्यासाठी रांगा लावून उभे होते याच्या बातम्या वृत्तपत्रे देऊ लागली. आयफोनला नवा जाहिरातदार मिळाला.

आपण आयफोनची जाहिरात कशी केली गेली हे पाहिलं, पण कुणी म्हणले त्यांचं उत्पादन इतरांपेक्षा सरस होत म्हणून ते इतकं लोकप्रिय ठरलं. तर हे तितकस खर नाही. आज बाजारात आयफोन पेक्षा सरस तंत्रज्ञान उपलब्ध आहे. परंतु मर्यादित संधीच्या तत्वाने सुरवात करून आज आयफोनने आपली अन आपल्या वापरकर्त्याची एक वेगळी जागा निर्माण केली आहे.

 

slashgear.com

आयफोन प्रतिष्ठा ही कशी आभासी आहे यावर आपल्याकडेच नव्हे जगभर चर्चा होते. बरेच जण या आभासी असण्यावर भर देऊन भरपूर टीकाही करतात. बऱ्याचदा हे लोक ते असतात ज्यांची काही ना काही कारणाने आयफोन घ्यायची संधी गेलेली असते. हे लोक सुद्धा सतत चर्चेत ठेवून आयफोनच्या प्रसिद्धीला मदतच करत असतात.

आता आयफोन विविध रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात येतोय. प्रत्येक रंगाच्या संचाची संख्या आणि किंमत वेगवेगळी आहे. त्यामूळे काही रंग हे अजून मागणी वाढवत आहेत.

सोनेरी रंग हे आपण याच उदाहरण म्हणून पाहू शकतो.

आपलं उत्पादन विकण्यासाठी त्याच्या प्रसिद्धी साठी अशा प्रकारे सतत नाविन्याचा शोध घेत राहणं हेच आयफोनच्या यशाचं कारण आहे. बाकी त्यातील आभासी प्रतिष्ठा, भावनांचा बाजार अन त्यातच अडकलेला एक मोठा वर्ग यावर नंतर कधी.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version