आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतीय संस्कृतीत लग्न कार्याला खूप महत्व देण्यात आले आहे. पुरातन काळापासूनच लग्न हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील सर्वात महत्वाचा प्रसंग समजला गेला आहे. ज्याचं लग्न होतं त्यांचं संपूर्ण आयुष्यच ह्या लग्नानंतर बदलून जात असतं.
नवे घर, नवी नाती सर्वकाही नवीन असतं. मग ह्यात स्वतःला सामावून घेणे, त्याचं कुटुंबाला आपले कुटुंब मानावं लागतं. ही परंपराच आहे.
पण आता काळ जरा बदलला आहे. भलेही आजही लग्न ही खूप मोठी जबाबदारी असली तरी त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन जरा बदलत चालला आहे.
आता आधीसारखं घरचे किंवा मोठे जिथे म्हणतील, ज्याच्याशी सांगतील म्हणून त्याच्याशी लग्न करायला मुली किंवा मुलं होकार देत नाही.
तर आपल्याला ज्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य काढायचं आहे त्याबाबत लग्नाआधी त्यांना सर्व जाणून घेण्याची इच्छा असते. जेणेकरून लग्नानंतर कुठली समस्या उद्भवू नये.
अश्यावेळी मुलीच्या मुलाकडून काही अपेक्षा असतात ज्या तिने त्याच्यासमोर बोलून दाखवायलाच हव्यात. अगदी अटी नाहीत पण तुम्हाला नेमक काय वाटतं किंवा तुम्हाला काय हवं आहे ह्याबाबत चर्चा नक्कीच व्हायला हवी.
त्यामुळे लग्नाआधी कुठल्याही मुलीने समोरच्या मुलाला होकार देण्याआधी हे पाच प्रश्न नक्की विचारायला हवे.
१. तुम्ही त्याला आवडता की नाही?
कधी कधी काय होते, आपण आपल्या कुटुंबाच्या दडपणाखाली येऊन लग्नाकरिता होकार देत असतो. कारण आपल्याला तसे करण्यास भाग पाडले जाते. मग अश्यात एकतर मुलीला मुलगा आवडलेला नसतो किंवा मुलाला मुलगी.
पण लग्न झालं म्हणून मन मारून त्यांना निमुटपणे आपला संसार चालवावा लागतो. अश्यात बाकी सर्व कुटुंब तर आनंदी असतं, पण गळचेपी होते ती ज्याचं लग्न झालं त्यांची.
त्यामुळे लग्नाला होकार देण्याधी समोरील व्यक्तीला खरंच आपण आवडतो की, त्याने निव्वळ कुटुंबाच्या दडपणाखाली येऊन होकार दिला आहे हे नक्की तपासून घ्या.
२. नोकरी करण्याचे स्वातंत्र्य असेल की नाही ?
भलेही आपण आज २१ व्या शतकात जगत असलो, आधुनिक गोष्टी वापरत असलो तरी आपल्यापैकी काहींची वृत्ती ही अजूनही पुरातन आहे. आजही अनेक तरुण असे आहेत ज्यांना लग्नानंतर नोकरी न करणारी बायको हवी असते. ह्याची प्रत्येकाची करणे वेगवेगेळी असू शकतात.
पण आज जेव्हा मुलं काय आणि मुली काय दोघेही शिक्षित असतात, स्वतः कमावते असतात, तिथे एकाला त्याच्या करिअरमध्ये पुढे जाण्याची मुभा तर दुसऱ्याला लग्न करण्याची शिक्षा दिली जाते.
अनेक मुली असतात ज्या लग्नाआधी आपल्या पायावर उभ्या असतात, नोकरी करत असतात पण केवळ नवऱ्याला किंवा सासरच्यांना नको आहे म्हणून त्यांना त्यांच करिअर मागे सोडावं लागतं.
जर तुम्हालाही तुमच्या करिअरमध्ये लग्नानंतरही समोर जायचं असेलं तर ह्याबाबत समोरच्या व्यक्तीशी बोला, ह्यावर त्याचं मत जाणून घ्या नंतरच लग्नाला होकार द्या.
३. जबाबदार आहे की नाही ?
लग्नानंतर हा आणखी एक महत्वाचा मुद्दा असतो ज्यामध्ये अनेकजण कमी पडतात. लग्न व्हायच्या आधीपर्यंत मुलांना जबाबदाऱ्यांची जाणीव नसते. पण एकदा लग्न झालं की आपल्या संसाराची जबाबदारी आपल्यालाच घ्यायची आहे एवढी समाज त्यांच्यात असायला हवी.
–
हे ही वाचा – या समाजात लग्नाआधी मुलांना जन्म देऊन मग ठरवलं जातं ‘लग्न करायचं की नाही?’
–
अनेकजणांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव नसते, आणि लग्नानंतर देखील ते त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अपयशी ठरतात. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीशी लग्न करण्याआधी ती ही जबाबदारी घ्यायला किती तयार आहे हे नक्की करून घ्या.
४. भविष्याचे नियोजन ?
संसारात ही सर्वात महत्वाची गोष्ट असते. त्यामुळे लग्नाआधी ती व्यक्ती काय करते, तिचे फ्युचर प्लान्स काय आहेत, तिला समोर काय करायचं आहे हे सर्व आधीच जाणून घ्या. म्हणजे तुम्हाला ती व्यक्ती कशी आहे, किती महत्वाकांशी आहे हे कळेल आणि तुम्ही देखील तिची भविष्यात मदत करू शकाल. म्हणजे तुमचा संसार सुखाचा होईल.
५. कुटुंब नियोजन ?
लग्नानंतर काही दिवस उलटले की सर्वांचा एकच प्रश्न असतो, आणि तो म्हणजे पाळणा कधी हलणार. म्हणजेच मुलं कधी होणारं. तर तुम्ही ज्या व्यक्तीशी लग्न करणार आहात तिचे ह्या विषयावर काय मत आहे हे जाणून घेणे देखील गरजेचे आहे.
म्हणजे समोरच्या व्यक्तीला मुलं हवी आहेत की नाही, त्यासाठी ती तयार आहे की नाही, त्यांची जबाबदारी घ्यायला तयार आहे की नाही, वगैरे.
तसेच समोरची व्यक्ती मुलगा किंवा मुलीमध्ये फरक करते का हे जाणून घेणे देखील महत्वाचे ठरते.
त्यामुळे लग्न करण्याअगोदर ज्याच्याशी लग्न करणार आहात त्याच्याशी हे सर्व बोलणे, ह्यावर चर्चा करणे, त्याची मते जाणून घेणे महत्वाचे आहे. ह्यामुळे तुमची जोडी एक आयडियल कपल होऊ शकेल की नाही, तुमचा संसार योग्य राहिलं की नाही, तुम्ही एकमेकांसाठी योग्य आहात की नाही हे ठरविण्यात मदत होईल.
–
हे ही वाचा – या ‘हटके’ लग्नसोहळ्यात ‘ती’ वरात घेऊन आली आणि ‘त्याने’ मांडवात वाट पाहिली!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.