Site icon InMarathi

या देशांमध्ये ‘मरणं’ हा सुध्दा एक गुन्हा आहे, काय आहे रहस्य?

death inmarathi

janamtvnational.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

दोन गोष्टी या मनुष्याच्या हातात नाहीत,आणि त्या म्हणजे जन्म आणि मृत्यू. तुम्हाला जन्म कुणाच्या पोटी मिळेल कोणत्या परिस्थितीत मिळेल कोणत्या ठिकाणी मिळेल ही जसं तुमच्या हातात नसतं तसंच मृत्यूच देखील आहे तो सुद्धा कधी कुठे कसा येऊन ठेपेल ही कुणीच सांगू शकत नाही!

आपल्या देशात कुठल्याही गुन्ह्यासाठी सर्वात मोठी शिक्षा ही फाशी मानली जाते. म्हणजेच मृत्युदंड हा सर्वात मोठा दंड समजला जातो. पण जर मृत्यू हाच गुन्हा ठरला तर त्यावर काय शिक्षा देणार? आता तुम्ही म्हणाल की मृत्यू हा गुन्हा कसा असू शकतो?

 

singularity weblog

 

पण ह्या जगाच्या पाठीवर काहीही घडू शकते. जर इथे सर्वात मोठी शिक्षा ही मृत्यूदंड मानली जाऊ शकते तर मृत्यू होणे हा एक गुन्हा देखील मानला जाऊ शकतो. जगभरात असे अनेक ठिकाणं आहेत जिथे मृत्यू होणे अमान्य आहे.

काही ठिकाणी स्मशानभूमीच्या कमतरतेमुळे मारण्यास अमान्य तर कुठे अवैध ठरविण्यात आले आहे.

 

सेलीया, इटली :

 

alux.com

 

दक्षिण इटलीच्या सेलीया ह्या ठिकाणची एकूण लोकसंख्या ५३७ एवढी आहे. ज्यात जास्तकरून लोक हे ६५ वर्षांहून जास्त वय असलेले आहेत. त्यामुळे इथल्या मेयरला अशी चिंता सतावू लागली की, जर इथल्या लोकांची संख्या आणखी कमी झाली तर ह्या ठिकाणाचे अस्तित्वच संपून जाईल. ह्याचं भीतीपोटी त्यांनी मृत्यू वर निर्बंध लावला.

तसे पाहता हा निर्बंध लोकांनी हेल्दी राहावे तसेच त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी ह्या अनुषंगाने लावण्यात आला होता. तसेच ह्या ठिकाणी कोणीही वार्षिक चेक अप करवत नाही, जर कोणी असे केले तर त्याच्याकडून दंड आकारण्यात येतो.

 

Falciano Del Massico, इटली:

 

alux.com

 

२०१२ साली येथिल लोकसंख्या ३७०० च्या घरात होती. ह्या शहरात त्यांची स्वतःची स्मशानभूमी नव्हती. त्यामुळे येथील लोक मृत व्यक्तींचे शरीर शेजारील शहरात असणाऱ्या स्मशानभूमीत दफन करत असतं.

पण काही काळाने ह्या दोन शहरांमधील हे सामंजस्य तुटले. त्यानंतर जोवर येथे स्वतःची स्मशानभूमी तयार होत नाही तोवर लोकांना मरण्याची परवानगी नव्हती. २०१४ सालापर्यंत हे शहर स्वतःची स्मशानभूमी तयार करण्यासाठी झटत होते.

 

Biritiba Mirim, ब्राझील :

 

pulse.ng

 

२००५ साली ब्राझीलच्या Biritiba Mirim ह्या ठिकाणी स्मशानभूमीची कमतरता भासू लागली. त्यामुळे पर्यावरण वाचविण्याच्या अनुषंगाने इथल्या मेयरने मृत्यू वर प्रतिबंध लावला होता. २०१० सालानंतर ह्या ठिकाणी नव्या स्मशानभूमी तयार करण्यात आल्या.

 

लंजारोन, स्पेन :

 

scoopwhoop.com

 

दक्षिण स्पेन स्थित लंजारोन ह्या ठिकाणच्या मेयरला १९९९ साली एक मोठ्या समस्येचा सामना करावा लागला. जेव्हा इथे मृत लोकांना दफन करण्यासाठी जागा अपुरी पडायला लागली तेव्हा एक विशेष आदेश जारी करण्यात आला.

ह्या आदेशानुसार येथील नागरिक तोवर मरू शकत नाही जोवर इथल्या नगरपालिका अधिकाऱ्यांना नव्या स्मशानभूमीसाठी जागा मिळत नाही.

लंजारोनच्या मेयरच्या ह्या आदेशाचा मुख्य उद्देश लोकांना त्यांच्या प्रकृतीविषयी जागरूक करण्याचा होता. जेणेकरून लोक आपल्या आरोग्याची जस्त काळजी घेतील आणि अचानकपणे मारणाऱ्यांच्या संख्येत घट होईल.

 

Cugnaux, फ्रान्स :

 

theguardian.com

 

२००७ साली फ्रान्सच्या Cugnaux नावाच्या ठिकाणी दोन स्मशानभूमी होत्या जिथे दफन करण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नव्हती. म्हणून येथील मेयर ने येथील त्या लोकांच्या मृत्यूला अवैध घोषित केले ज्यांना दफन करण्यासाठी जागा नव्हती. त्यानंतर मेयरच्या ह्या आदेशाचा निषेध करण्यात आला ज्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.

 

Sarpournext, फ्रान्स :

 

scoopwhoop.com

 

फ्रान्सच्या Sarpournext ह्या ठिकाणी स्मशानभूमीच्या कमतरतेमुळे मरण्यावर निर्बंध लावण्यात आला होता. हा निर्णय २००८ साली इथल्या मेयर कडून घेण्यात आला होता. तर आता हा निर्णय मागे घेण्यात आला असून मरण्यावरील निर्बंध हटविण्यात आला आहे.

 

Longyearbyen, नॉर्वे :

 

scoopwhoop.com

 

नॉर्वेच्या Longyearbyen ह्या ठिकाणी १९५० साली असा एक रिपोर्ट आला की, येथे दफन केलेले मृत शरीर अजूनही डिकंपोज झालेले नाही. त्यामुळे येथे आणखी मृत शरीर दफन करण्यावर निर्बध लावण्यात आला.

जमिनीखालील त्या मृत दफन केलेल्या शरीरांवर तिथल्या वैज्ञानिकांनी रिसर्च देखील केली होती. ह्यात १९१८ साली आलेल्या फ्लू चे वायरस त्या मृत शरीरांत आढळले होते.

तर ही आहेत काही देशांची उदाहरणं जिथे लोकांना मरण्यावर सुद्धा बंदी आहे, ही हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेलच कारण असे कसे असू शकते? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण या जगात काहीही होऊ शकतं यांचे उत्तम उदाहरण आहे म्हणजे ही शहरं आणि तिकडची अजब प्रथा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version