Site icon InMarathi

“साला काँग्रेसी” ! इटलीच्या प्रत्येक हॉटेलातील ह्या बोर्डची कथा तुम्हाला माहितीये काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आपल्या देशात सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक राजकीय पक्ष एकमेकांवर टीकास्त्र सोडत असतात. त्यातही भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेस ह्या कामात आघाडीवर आहे. मोदी सरकार आल्यापासून राजकारणात सोशल मिडीयाचा वापर जरा जास्तच वाढला आहे.

ह्यातच ह्या दोन मोठ्या राजकीय पक्षांचे आईटी सेल एकमेकांना ट्रोल करण्याचा कुठलाही चान्स सोडत नाही. जरा कुठे दुसऱ्या पक्षाकडून कुठली चूक झाली तर लगेचच दुसऱ्या पक्षाकडून त्यांची टिंगल उडविण्यास म्हणजे ट्रोल करण्यास सुरवात होते.

 

firkee.in

ह्यासार्वात आता एक साईन बोर्ड सोशल मिडीयावर शेअर केल्या जात आहे. ज्यावर ‘साला कॉंग्रेसी’ असे लिहिलेले आहे. आता हा बोर्ड का वायरल होतो आहे हे तर तुम्हाला कळालेच असेलं. पण ह्यामागे जी कहाणी आहे ती ह्याहून जास्त रंजक आहे.

हा बोर्ड बघून तुमच्या मनात देखील हा विचार आला असेलं की, असा बोर्ड काय म्हणून लावल्या गेला असेल? म्हणजे चक्क एखाद्याला शिव्या देणारा बोर्ड का लावण्यात आला असेल? ही कुठल्या कॉंग्रेस विरोधी पक्षाचे षडयंत्र नसून ह्यामागे काही वेगळंच कारण आहे.

 

‘साला कॉंग्रेसी’ ह्याचा तो अर्थ मुळीच नाही जो तुम्ही समजत आहात. कारण हा शब्द इटली ह्या भाषेतील आहे, ज्याचा अर्थ कॉन्फरन्स हॉल असा होतो. पण आता ट्रोलर्स थोडी न एवढा विचार करतात. त्यांनी तर उचलला फोटो आणि केला शेअर. सोशल मिडीयावर देखील खूप कमी वेळेत हा फोटो वायरल झाला. ट्विटर तर लोकांनी ह्यावर अनेक कमेंट्स देखील केले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version