Site icon InMarathi

सावधान! या “विषारी” गार्डन मधली झाडं तुमचा जीव घेऊ शकतात!

girl in garden feature InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

तुम्ही विषारी साप ऐकले किंवा पाहिले असतील तसेच तत्सम कीटक किंवा आणखीन कोणताही विषारी जीव याबद्दल ऐकून असाल, तुम्ही कधी विषारी गार्डन ऐकलं नसेल!

बाग म्हणजे आपल्या संकल्पनेत लहान मुलांना खेळायला बागडायला तसेच कित्येक वृद्ध लोकांना शांत निवांत त्यांच्या मित्रांबरोबर बसून गप्पा मारता याव्यात, ताजी हवा मिळण्याच एकमेव ठिकाण म्हणजे बाग! ही संकल्पना आपल्या डोक्यात अगदी फिट्ट बसलेली आहे!

 

toplist hub

 

बरं आता तसं बघायला गेलं तर मैदानं बाग आणि तिथे दिसणारी गर्दी या गोष्टी खूप कमी झाल्या आहेत, प्रत्येकाच्या हातात मोबाइल आल्याने बागेत जाऊन खेळणं किंवा मोकळी हवा घ्यायला लॉन वर चप्पल न घालता फिरणं ही सगळं आता फार क्वचित बघायला मिळतं!

 

masterfile

 

पण आज अशाच एका बागेच्या बाबतीत तुम्हाला माहिती देणार आहोत, ही बाग इतर बागेसारखी नसून निसर्गाने केलेला एक विचित्र चमत्कार इथे आपल्याला पाहायला मिळेल!

निसर्ग ही मनुष्यासाठी नेहमीच एक रहस्यमय गोष्ट बनून राहिली आहे. आजही जगातील कित्येक नैसर्गिक आश्चर्ये उलगडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तुम्हाला माहित असलेचं की जगात असंख्य जातीची-रंगाची फुल-फळ-झाडं आढळतात.

पण आपल्याला फक्त आपल्याकडेच आढळणाऱ्या फुल-फळ आणि झाडांबद्दल माहिती आहे बाकी त्यांच्या इतर प्रकारांबद्दल मात्र आपल्याला तसूभरही कल्पना नाही. विशेषकरून विषारी जातींबद्दल तर आपण केवळ ऐकूनच असू!

पण खरंच जर तुम्हाला फुल-फळ आणि झाडांबद्दल जास्त माहिती नसेल तर चुकूनही त्यांच्या वाटेला जाऊ नका, कारण एखादे फुल-फळ आणि झाडं विषारी निघाले तर त्यामुळे जीवाला देखील धोका पोहचू शकतो.

पण समजा ही सगळ्या जातीची विषारी प्रकरण तुम्हाला एकाच गार्डनमध्ये बघायला मिळाली तर तुम्ही त्याला भेट द्याल का? जर तुमचे उत्तर हो असेल तर जगातील सर्वात विषारी गार्डनला आवर्जून भेट द्या!

 

ihorror

 

 इंग्लडच्या नॉथमबेरलँड राज्यात ऐलनविक शहरात ‘ऐलनविक पॉइजन गार्डन’ (Alnwick Poison Garden) नामक हे विषारी गार्डन स्थित आहे.

 

gazabpost.com

 

या गार्डनला जगातील सगळ्यात विषारी गार्डन यासाठी म्हणतात कारण येथे तब्बल १०० जातीची विषारी फुल-फळ आणि झाडं आहेत.

 

gazapost.com

 

१९९५ मध्ये या जागेचा ताबा जेन पर्सी या नॉथमबेरलँडच्या राणीच्या हातात आला होता. तेव्हा काहीतरी हटके करावं या हेतूने तिने इथे वेगळ्या प्रकारचं गार्डन उभारण्याचा निर्णय घेतला.

ही बाग २००५ साली लोकांसाठी खुली करण्यात आली, या बागेत १०० वेगवेगळ्या प्रकारचे प्लांटस आहेत आणि यातल्या कोणत्याही प्लांटला हात लावणे, चव घेऊन बघणे किंवा विकणे याला सक्त मनाई आहे!

 

wikimonks.com

सर्वप्रथम हे गार्डन तिने वैयक्तिक वापरासाठीच बनवले होते, परंतु गार्डनची वाढती प्रसिद्धी लक्षात घेऊन हे गार्डन पर्यटकांसाठी खुलं करण्याचा निर्णय तिने काही वर्षांपूर्वी घेतला होता. या गार्डनमधील प्रत्येक झाडं आणि रोपट काळ्या रंगाच्या गेटने बंदिस्त आहे.

त्यामुळे या गेटच्या अलीकडूनच या विषारी जगाची सफर करावी लागते. मात्र कोणत्याही झाडाला हात लावण्यास आणि  खासकरून कोणत्याही फुलाचा सुगंध घेण्यास  मनाई आहे.

काही लोकांना या गोष्टी धादांत खोट्या वाटतात पण याच काही झाडांच्या सुगंधामुळे २०१४ साली काही पर्यटकांना फिट आली होती त्यामुळेच ही निर्बंध घालायला लागले असे त्या बागेचे मालक म्हणतात!

शिवाय या बागेत पर्यटकांना मोकळेपणाने फिरण्यावर बंदी आहे,  त्यांच्या सुरक्षेसाठी तिथे टुर गाईड ची सोय आहे जेणेकरून कोणतीही वाईट घटना घडणार नाही, याशिवाय तिथली काही झाडं तर इतकी विषारी आहेत की त्यांना एका पिंजऱ्यासारख्या कुंपणात बंदिस्त केलेले आहे, ज्यावर २४ तास नजर ठेवली जाते!

 

smithsonianmag.com

 

हे गार्डन १४ एकर मध्ये पसरलेलं असून वर्षाला जवळपास ६००,००० पर्यटक या गार्डनला भेट देतात.

हे गार्डन उभं करण्यामागचा हेतु हा होता की लोकांना बेकायदेशीर तसेच विषारी आणि अंमली पदार्थांच्या बाबतीत सतर्क करायचे! कोणत्याही विषाची परीक्षा न घेता लोकांना घातक पदार्थांपासून डू ठेवणे हाच उद्देश यातून साध्य झाला!

 

UA flowers.com

 

तर अशा या विषारी बागेला अवश्य भेट द्या पण त्याआधी ही सगळी माहिती नीट वाचा पडताळून पाहा आणि त्यांचे नियम नीट वाचून ठेवा! जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास नको व्हायला!

इतकं भयानक असलं तरी एकदातरी ही गार्डन पाहून यावच कारण इथे लोकांच्या सुरक्षेची उत्तम सोय केलेली आहे त्यामुळे नियम पाळून जर त तुम्ही इथे गेलात तर नक्कीच एक वेगळाच अनुभव तुमच्या गाठीशी बांधला जाईल!

संधी मिळाली तर ही भेट अजिबात चुकवू नका!!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version