दक्षिण कोरियन नागरिक दरवर्षी “अयोध्येला” येऊन नतमस्तक होतात – वाचून थक्क व्हाल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
अयोध्या हे नाव आपल्या देशातला बच्चा बच्चा जाणतो! पुरणातल्या रामायणात त्या जागेचा उल्लेख तर आपण ऐकत आलेलोच आहोत!
शिवाय आपल्या देशात त्यावरून बरेच राजकीय धार्मिक वाद निर्माण झाले आणि त्या वादांनी खूप हिंस्त्र वळण घेतलं होतं!
आठवतंय का? आयोध्येतल्या बाबरी मशीदची मोडतोड, आणि त्यांनंतर देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात उसळलेल्या धार्मिक दंगली! जागोजागी घडलेले बॉम्बस्फोट!
मुंबईचा सिरियल बॉम्बस्फोट! अशा कित्येक धक्क्यातून आपला देश गेला आहे! तरी आजही तो अत्यंत ज्वलंत विषय म्हणूनच मानला जातो!
शिवाय गेल्यावर्षीच या कित्येक वर्षांपासून चालू असलेल्या वादाला भारतीय न्यायव्यवस्थेने पूर्णविराम दिला, ज्यांनातर देशात अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे!
एका अर्थी योग्य आणि सत्य याचाच विजय झाला आहे असं वाटलं असलं तरी या एका वादाने कित्येक घरं बरबाद केली, कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले!
आजही अयोध्या प्रश्न असा शब्द ऐकू आला तरी प्रत्येक भारतीयाच्या अंगावर काटा येतो!
पण याच आयोध्ये विषयी एक अत्यंत वेगळीच गोष्ट सांगणार आहोत! या पावन भूमीची ख्याती साता समुद्रापार कशी पोहोचली आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करूया!
साउथ कोरिया… या देशाला जग ‘शांत प्रातःकाळची जमीन’ या नावानेदेखील ओळखते.
या देशाने पूर्व एशियामधील कोरियन द्वीपकल्पाचा दक्षिणी अर्धा भाग घेरलेला आहे. भारताबरोबरसुद्धा दक्षिण कोरियाचे व्यापारीक आणि आर्थिक संबंध पूर्वीपासून चांगले आहेत.
पण तुम्हाला हे माहितीये का की भारत आणि दक्षिण कोरिया या दोन देशांमध्ये एक अतूट पारंपरिक, सांस्कृतिक नातं आहे. ज्या नात्याने आजवर दोन्हीही देशांमधील देशवासियांना घट्ट बांधून ठेवलंय?
साउथ कोरियाचे नागरिक या परंपरेचे पालन करण्यासाठी दरवर्षी भारतात येतात.
उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या शहरात दरवर्षी साउथ कोरियाचे देशवासी आपल्या देशातील महाराणी हुर ह्वांग-ओके हिचे स्मरण करण्यास येतात.
विवाहापूर्वी ही राणी अयोध्येची राजकुमारी होती आणि तिचे नाव सुरीरत्ना असे होते. तिचा विवाह करक वंशातील राजा किम सुरो यांच्याबरोबर इसवीसनाच्या ४८व्या शतकाच्या उत्तरार्धात झाला होता.
असं म्हणतात की ती कोरियामध्ये एका जहाजातून गेली आणि गेमग्वान गया येथील सुरो राजाची महाराणी बनली. केवळ १६व्या वर्षी लग्न करून ती गया साम्राज्याची पहिली महाराणी बनली.
करक वंशाची लोकं आजही अयोध्या नगरीला आपल्या महाराणीचं माहेर समजतात आणि म्हणून दरवर्षी महाराणीच्या स्मारकाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला येतात.
असे मानतात की,
महाराणी हुर ह्वांग-ओके यांच्या आईवडिलांच्या स्वप्नात त्यांच्या देवाने दर्शन देऊन त्यांना असे सांगितले की साऊथ कोरियाच्या राजाचा अजून विवाह झालेला नाही. त्यामुळे तुमच्या मुलीला तिथे पाठवून द्या.
ती त्याची राणी होईल. त्या सांगण्याप्रमाणे राजकन्येच्या आईवडिलांनी केले आणि पुढे ते खरे ठरले. ही महाराणी दीर्घायुषी होती.
असे सांगतात की वयाच्या १५७ व्या वर्षी महाराणीचा मृत्यू झाला.
राणीच्या स्मारकाचे उद्घाटन सन २००१ मध्ये झाले. या प्रसंगी इतिहासप्रेमी आणि सरकारी प्रतिनिधी उपस्थित होते. इतकेच नाही तर नोर्थ कोरियाचे राजदूत सुद्धा या कार्यक्रमासाठी खास आमंत्रितांमध्ये होते.
किम्हे किम वंश, हुर वंश आणि इंचेऑन यी या वंशाच्या ७० लाख लोकांनी आपला इतिहास शोधून अयोध्येबरोबर एक नातं जोडलं.
साउथ कोरियामध्ये महाराणीचा मकबरा गिम्हे येथे आहे आणि त्याच्या समोर शिवालायही आहे. असे मानले जाते की महाराणीने हे शिवालय अयोध्येवरून आपल्यासोबत आणले होते.
काही वर्षांपूर्वी भारताचे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी साउथ कोरियाला गेले होते. तेव्हा दोन्ही देशांनी अयोध्येत महाराणी हुर ह्वांग-ओके हिचे मोठे स्मारक बांधण्याच्या प्रस्तावावर सहमती दर्शविली.
हे स्मारक कोरीअन स्थापत्यशास्त्रानुसार बनविण्यात येईल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.