Site icon InMarathi

त्वचेचं सौंदर्य ते वजनाची समस्या; या एकाच “प्रयोगामुळे” तुम्ही चिरतरुण राहू शकता…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

आपण सर्वांनीच कधी ना कधी हे ऐकल असेल की, एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने त्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. काही जणांच्या मते हे वजन कमी करण्यास सहाय्यकही ठरते.

कोमट पाणी पिण्याचेही खूप फायदे आहेत, त्यातच मग मध आणि लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने ह्या मिश्रणाचा आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदे होतात. तसेच मध हे किती गुणकारी आहे हे देखील आपल्याला माहीत आहे.

त्यामुळे मधाचे सेवन केल्याने आपला अनेक आजारांपासून बचाव होवू शकतो.

आज मधाचे असेच काही गुणकारी फायदे आपण जाणून घेणार आहोत.

 

 

१. पोट साफ होते :

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला योग्य वेळी खायला जमत नाही, कधी मिटींग्स तर कधी काम ह्यामुळे अवेळी जेवण हे आजच्या लाइफस्टाइलचा भाग झाले आहे. पण अश्या अवेळी आणि अयोग्य जेवणाचे आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतात.

त्यामुळे असिडिटी, पोट साफ न होणे, पचन क्रिया मंदावणे त्यातून मग मुळव्याधीचा त्रास उद्भवणे या तक्रारी निर्माण होतात.

 

 

पण जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस मिसळून घेतले तर तुम्ही ह्या व्यांधींपासून दूर राहाल. तुमची, पोट साफ न होण्याची समस्या देखील दूर होईल.

त्यामुळे लिव्हर चांगले राहील आणि अन्न पचण्यास मदत होईल. तसेच मधामुळे पोटामध्ये होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या इन्फेक्शनपासून आपले संरक्षण होते.

हे ही वाचा –

===

 

२. वजन कमी होते :

 

 

मध, लिंबू आणि कोमट पाणी दररोज सकाळी घेतल्यास शरीराचे मेटाबॉलिज्म उत्तम होते. यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते. ज्यामुळे दिवसभर गोड खाण्याची इच्छा होत नाही.

डायटिंग प्रभावी करण्यासाठी ह्या मिश्रणाचे सेवन फायदेशीर ठरते. याचे नियमित सेवन आणि व्यायाम केल्याने वजन लवकर कमी केले जाऊ शकते.

 

३. गर्भावस्थेत मध उपयोगी ठरतो :

 

 

गर्भावस्थेदरम्यान जर गर्भवती स्त्रीने मधाचे नियमित सेवन केले, तर तिचे होणारे बाळ हे निरोगी आणि मानसिकदृष्ट्या चांगले असते. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी आवर्जून मधाचे सेवन करावे.

 

४. तोंडाची दुर्गंधी दूर होते :

लिंबू, मध आणि गरम पाणी तोंडाचा वास दूर करण्यासाठी मदत करते. लिंबूमुळे तोंडातील ग्रंथी सक्रिय होतात आणि बॅक्टीरियाला नष्ट करून तोंडाला शुद्ध करतात. ज्यामुळे तोंडाचा वास येत नाही.

 

 

मध आणि गरम पाण्यामुळे शरीरातील उर्जेचा स्तर वाढतो. शरीरात जास्त ऊर्जा तयार झाल्याने चयापचय क्रिया सुधारते.

हे ही वाचा –

===

 

५. त्वचा सतेज होते :

त्‍वचेला लिंबू खूप फायदेशीर आहे. यातले तत्व रक्ताला शुद्ध करण्यासाठी मदत करतात. नवीन रक्तपेशीच्या निर्मितीसाठी मदत करतात. तसेच मध हे चेहऱ्याला तरुण ठेवण्यास मदत करते.

म्हणून जर तुम्हाला तजेलदार त्वचा हवी असेल तर हे पेय नियमित घ्या.

 

 

६. रोगप्रतिकारक शक्ती वाढते :

 

 

मध, लिंबू आणि गरम पाणी नियमित पिण्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामध्ये एंटीऑक्सिडेंट्स, विटॅमिन्स आणि पोषक तत्व असल्यामुळे बदलत्या मौसमातही तुम्ही आजारी पडत नाही.

 

७. डोळ्यांसाठी गुणकारी :

 

 

मध हे डोळ्यांसाठी देखील खूप फायद्याचे असते. गाजराच्या रसात मध मिसळून ह्या मिश्रणाचे सेवन केल्याने दृष्टी सुधारते. त्यामुळे ज्यांना चष्मा असलेल्यांनी नियमितपणे ह्या मिश्रणाचे सेवन केल्याने त्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होऊ शकते.

 

८. उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो :

 

 

लसूण आणि मध ह्यांचे एकत्र सेवन केल्याने उच्च रक्तदाब सामान्य होण्यास मदत होते. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्यांनी ह्याचे सेवन जरूर करावे.

 

९. घावांवर देखील मध उपयोगी ठरतो :

 

 

जर तुमची त्वचा जळाली असेलं, कापली गेली असेलं किंवा सोलली असेलं तर त्यावर देखील मध हे गुणकारी ठरू शकते. अश्या प्रकारच्या जखमांवर मध लावल्याने लवकर आराम मिळतो.

 

१०. बद्धकोष्ठता दूर होते :

कोमट पाण्यात मध आणि लिंबू घातलेलं मिश्रण प्यायल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. हे आतड्याच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. हे पोटाला हाइड्रेट करते. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.

 

 

त्यामुळे निरोगी आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी नियमितपणे कोमट पाणी, मध आणि लिंबू ह्या मिश्रणाचे सेवन करावे. तसेच मध हा एवढा गुणकारी पदार्थ असल्याने आपल्या नियमित आहारात त्याचा प्रकर्षाने समावेश करावा.

हे ही वाचा –

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version