Site icon InMarathi

प्रत्येक विवाहित जोडप्याने आनंदी राहण्यासाठी पाळलीच पाहिजे अशी “सप्तपदी”!

marraige inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लग्न झाल्यावर तुम्ही खूप जणांकडून ऐकलं असेल की लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन असतं. लग्नात वेळेची गुंतवणूक करावी लागते. लग्नात म्हणजे लग्नप्रसंगीच नव्हे, तर लग्नानंतरही एकमेकांसाठी वेळ काढावा लागतो… वगैरे वगैरे…

पण ही वेळेची गुंतवणूक म्हणजे नेमकं काय??

 

 

लग्न किंवा प्रणयसंबंधांमध्ये आपण आपल्या जोडीदाराला परिपूर्ण करत असतो. लग्नानंतरची दोनेक वर्षं मस्त मजेत जातात. एकदम हसत खेळत सगळं चालू असतं.. सगळं आलबेल असतं.

पण त्यानंतरची वर्षं ही तुमची एक टीम म्हणून एकत्र पुढे जाण्याची इच्छाशक्ती तपासून पाहणारी असतात.

तुम्हाला कधी कोणाबद्दल मत्सर वाटतो, असूया वाटते. आपल्याकडे जोडीदाराचं दुर्लक्ष होतंय असं वाटतं.

तुम्हाला वाटणारी असुरक्षितता ही ‘समोरच्याला तुम्ही आवडेनासे झालात तर?’ या भीतीतून येते. आपण आपल्या माणसांच्या प्रेमाला पारखे झालो तर? असं वाटल्यामुळे येते.

पण अशा कचाट्यात सापडण्यापेक्षा दोघांनी एक होऊन अशा गोष्टीवर विचार करायला हवा.

 

 

अशावेळी आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं, की हा संघर्ष ‘तुम्ही विरुद्ध तुमचा जोडीदार’ असा नसून तुम्ही, ‘तुमचा जोडीदार विरुद्ध तुमच्यावर ओढवलेली परिस्थिती’ असा आहे.

आपली व्यक्ती आपल्याविरुद्ध नाही हे मनावर बिंबवलेत तर नातं अधिक दृढ व्हायला मदत होईल.

आपलं नातं दृढ करण्यासाठी काय कराल?

 

१) एकमेकांवर विश्वास ठेवा :

 

 

नातं विश्वासाच्या पायावर भक्कमपणे उभं असतं. हा पाया जपायला हवा. आपला जोडीदार हा आपल्याशी प्रामाणिक असेल हा विश्वास हवा आणि आपणही त्याच्याशी प्रामाणिकपणे वागायला हवं.

एकमेकांवर शंका घेत बसलात तर तुम्हाला स्वतःलाच हरल्यासारखे वाटेल.

“I trust you” is a better compliment than “I love you” because you may not always trust the person you love but you can always love the person you trust…

 

२) स्वतःची किंमत ओळखा :

 

 

कित्येकदा समोरच्याबद्दल वाटणारा मत्सर हा आपण स्वतःला कमी लेखत असल्यामुळे येतो. त्यामुळे स्वतःचा योग्य तो मान राखायला शिका.

स्वतःबद्दल आदर नसेल, तर तुम्ही वाईटात वाईट विचार करून तुमचे नाते ताणत बसाल.

“I think the most important thing in life is self-love, because if you don’t have self-love and respect for everything about your own body, your own soul, your own capsule, then how can you have an authentic relationship with anyone else?”

 

३) स्पष्टपणे बोलून दाखवा :

 

 

जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एखादी गोष्ट खटकत असेल, तर ती शांतपणे त्याला समजावून सांगा. त्या गोष्टीचा अती विचार करत बसून समोरच्याने तुमचे मन वाचावे ही अपेक्षा चुकीची आहे.

तुम्ही जर एकमेकांशी बोललात, तरच तुम्हाला वादाचा नेमका मुद्दा लक्षात येऊन त्यावर एकमताने तोडगा काढता येईल. संवाद हा नात्याच्या प्रत्येक वळणावर गरजेचा ठरतो.

एखाद्या गोष्टीबद्दल न बोलणं किंवा काही गोष्टींची कबुली देण्याचं टाळणं हे आपले प्रश्न उगाचच वाढवतात आणि आपलं नातं आणखीनच नाजूक करतात.

मोकळ्या मनाने संवाद करायला सुरुवात करा आणि आपण बोलताना समोरच्याच्या मताचा योग्य तो मान ठेवायला विसरू नका.

 

४) शारीरिक जवळीक :

 

 

काही जोडप्यांना असं वाटतं, की भावनिक जवळीक असणे नात्यात पुरेसे असते आणि शारीरिक जवळीक ही एका लग्नानंतर विशिष्ट काळापर्यंतच आवश्यक असते. पण हे खरं नाही.

हे अधिक करून ज्यांना मुलं झाली आहेत अशा जोडप्यांबाबत अधिक प्रमाणात घडून येते. त्यांच्या नात्यातून, स्पर्शातून साधली जाणारी जवळीक नाहीशी झालेली असते.

ते एकमेकांचा हात हातात घेणे, खांद्यावर हात टाकणे या गोष्टी क्वचितच करतात. तेव्हा त्यांना स्पर्शामुळे आपल्याला किती आनंद होऊ शकतो याची जाणीव होते.

 

५) माफ करायला शिका :

 

 

“There is no love without forgiveness, and there is no forgiveness without love.”

चुका प्रत्येकाकडून होतात. आपल्या प्रत्येकात काही न काही उणीवा असतात. तशाच तुमच्या जोडीदारामध्येही असतात आणि तुम्ही त्यांच्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करू शकत नाही.

त्यामुळे एकमेकांना थोडं माफ करायला शिका. एक नक्की करा, की तुम्ही एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवू नका आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही दोघे मोकळ्या स्वभावाचे असाल.

जोडीदाराच्या एखाद्या वागण्यावर किंवा त्याने सांगितलेल्या एखाद्या गोष्टीवर आपण कसे react होऊ याची भीती वाटूनच बहुतेक गोष्टी जोडीदारापासून लपवल्या जातात.

यशस्वी जोडप्यांमध्ये त्यांच्या आपल्या जोडीदाराबद्दल काहीच तक्रारी नसतात, ते परफेक्ट असतात असे नसते तर ते एकमेकांना माफ करून आपल्या नात्याचा योग्य तो आदर ठेवतात.

 

६) एकमेकांशी भावनिकरित्या जोडलेले रहा :

 

 

एकमेकांशी भावनिकरित्या जोडलेले असणे म्हणजे एकमेकांना समजून घेता येणे एकमेकांबद्दल सहसंवेदना असणे, एकमेकांच्या भावनिकदृष्ट्या नाजूक गोष्टींबद्दल सहानुभूती असणे.

एकमेकांबद्दलच्या इतरांच्या मतांनी तुम्ही आपल्या जोडीदाराबद्दल निष्कर्षाप्रत येऊ नका. अनेकदा प्रेमाचा अभाव नव्हे तर मैत्रीचा अभाव हे लग्न यशस्वी न होण्याचे कारण असते.

You don’t need someone to complete you. You only need someone to accept you Completely… खरंय ना ?

 

७) कामातून जोडीदारासाठी वेळ काढा :

 

 

जेव्हा तुमचे काम हे खूप वेळ लागणारे असेल, तेव्हा एकमेकांबरोबर वेळ व्यतीत करण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते. अशा वेळी पॉझचं बटन दाबून थोडं थांबा आणि एकमेकांबरोबर कुठेतरी जायचं ठरवा.

अगदी एक दोन दिवसांची एकमेकांबरोबर घालवलेली सुट्टीसुद्धा मरगळलेल्या नात्यात नवीन प्राण फुंकू शकते. तुम्हाला एकमेकांचा नव्याने शोध लागू शकतो.

तुमचं सहजीवन हे तुम्हाला मुलं झाल्यावर मागे पडायला नको. तुम्ही एक जोडपं म्हणून आणि एक कुटुंब म्हणून या दोन्ही गोष्टींचा आनंद घ्यायला हवा.

लग्न हे मनोमिलन असते… हे या हृदयीचे त्या हृदयी असे नाते कायम टिकायचे असेल तर सप्तपदीचा हा आधुनिक अर्थ आपण सर्वांनी समजून घ्यायला हवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version