Site icon InMarathi

हे दहा उपाय तुम्हाला गरोदरपणात होणाऱ्या उच्च रक्तदाबाच्या त्रासापासून वाचवतील

pregnancy im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गरोदरपणात उच्च रक्तदाबाचा होणारा त्रास हा खूप जणींमध्ये दिसून येतो. पण हा आटोक्यात कसा ठेवायचा हा बहुतांश स्त्रियांना प्रश्नच पडतो. आजकाल बाजारात यावर औषधे उपलब्ध आहेत. पण त्यामधील रासायनिक घटक आणि घातक द्रव्ये ही गरोदर बाईसाठी अपायकारक ठरू शकतात.

त्यामुळे नैसर्गिक उपाय करणं आणि काही गोष्टींबद्दल आधीच काळजी घेणं हे अधिक फायद्याचं ठरतं. आयुर्वेद, होमिओपॅथी, चायनीज उपचार किंवा तिबेटन औषधे या काही नैसर्गिक उपचारपद्धती आहेत. पण या पद्धतीने केले जाणारे उपाय प्रत्येकीलाच सूट होतील असं नाही.

त्यासाठीच तुम्हाला काय पद्धती लाभदायक ठरू शकतात याचा विचार तुमची मेडिकल हिस्टरी पाहून करायला हवा; विशेषतः जेव्हा तुम्ही गरोदर आहात.

 

 

पुढे दहा घरगुती पद्धती सांगितल्या आहेत ज्यांनी गरोदरपणात तुम्ही तुमचा उच्च रक्तदाब आटोक्यात ठेऊ शकता. मात्र असे करत असताना आपण आपल्या प्रकृतीचा विचार करून मगच ते उपचार करायला हवेत.

कोणताही उपाय करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा. कारण यातल्या काही पद्धती या इतरांसाठी योग्य पण तुमच्या तब्येतीला घातक ठरू शकतात. तसेच हे घरगुती उपचार, त्याला पर्याय म्हणून न घेता त्याला पूरक असे उपाय आहेत.

१. नियमित व्यायाम :

 

remediesexchange.com

व्यायाम हा तुमचा रक्तदाब योग्य राखण्यासाठी असलेल्या उपायांपैकी एक अत्यंत चांगला उपाय आहे. हा व्यायाम खूप जास्त तणावपूर्ण असायला नको. मात्र तीस मिनिटांपर्यंत व्यायाम जरूर करावा. व्यायाम तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यात तुमची मदत करतो. तसेच तुमची पचनशक्ती सुधारते. मात्र कोणते व्यायामप्रकार हे गरोदरपणात चालू शकतात याचे डॉक्टरांकडून मार्गदर्शन घ्यावे. शिवाय व्यायामामुळे सांधे शिथिल होतात. तुमचा रक्तप्रवाह सुरळीत चालू राहतो. नियमित व्यायाम ही रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राखण्याची गुरुकिल्ली आहे. ही म्हटली तर उपचारपद्धती आहे, म्हटली तर जीवनपद्धती आहे. शिवाय गरोदरपणात व्यायाम केला तर प्रसूती सहज होते असे मानतात.

२. सोडियमचे प्रमाण योग्य ते राखणे :

 

lietuve.lt

 

रक्तदाब योग्य ते राखण्याचा आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे मीठ कमी खाणे. उच्च रक्तदाब असल्यास मीठ वगळणेच उत्तम. गरोदर असताना तुमचे हार्मोन्स हे अत्यंत असंतुलित असतात. त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते आणि शरीराच्या नैसर्गिक क्रियांचा वेग मंदावलेला असतो.

यामुळे मीठ किंवा मीठाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाणे अधिक कठीण होते. कारण जर शरीरात अधिक मीठ गेले तर उच्च रक्तदाब टोक गाठू शकतो.

मीठाचे आहारातील प्रमाण कमी केले तर आपली प्रतिकारशक्ती वाढते,आणि एनर्जीची पातळी सुद्धा वाढते. डॉक्टरांनी मीठ सोडायला सांगितल्याशिवाय ते सोडायची गरज नाही कारण त्यातून आवश्यक ती खनिजे शरीर घेत असते. पण अतिरेक टाळावा आणि मीठाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ टाळावेत.

3. केळी खाणे :

 

 

गरोदरपणात रोज १-२ केळी खाणे हे अत्यंत फायद्याचे असते. यामुळे फक्त पचनशक्ती सुधारते किंवा ते लक्झेटिव्ह म्हणून काम करते असे नाही, तर यातून शरीराची पोटॅशिअमची गरज भागते. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी हा रामबाण उपाय आहे.

४. ऍपल सिडर व्हिनेगर :

 

healthline.com

 

हे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य राखण्यासाठी आणि रक्तदाब सुरळीत राहावा यासाठी मदत करते. अनपाश्चराईज्ड ACV चं सेवन करणं हे अत्यंत आरोग्यदायी मानलं जातं. पण डायल्यूट न केलेलं ACV हे ऍसिडीक असून आपली अन्ननलिका जाळू शकतं. त्यामुळे असे सांगण्यात येते की, एक टेबलस्पून ACV एक कप कोमट पाण्यात मधासोबत घ्यावे.

५. मॅग्नेशियम :

 

२०११ मध्ये, संशोधकांच्या अभ्यासनुसार, Journal of the Indian medical association मध्ये असे मांडण्यात आले की, मॅग्नेशियम हे रक्तदाबाच्या बाबतीत मदतगार ठरू शकते. त्यामुळे गरोदर बाईने ज्यातून मॅग्नेशिअम अधिक प्रमाणातून मिळू शकते असे टोफू, ऍव्होकॅडो, केळी, बदाम, आणि सोया मिल्क हे पदार्थ आहारात ठेवावेत.

कारण मॅग्नेशियम फक्त रक्तदाब योग्य ठेवण्यात सहाय्य करत नाही तर गर्भाशयाची सुरक्षितता राखतो आणि ते वेळेआधी आकुंचन पावण्यापासून रोखतो.

६. ताण घेऊ नका :

 

oudersvannu.nl

जेव्हा तुम्ही गरोदर असता, तेव्हा चिडचिड, उदासी आणि ताण येणं या गोष्टी साहजिकपणे घडत असतात. या गोष्टीसुद्धा उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरतात. त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टींमुळे प्रसन्न वाटेल, तुम्ही आनंदी राहाल अशा गोष्टी करा. गरोदर स्त्रीने दिवसातून तीनदा ३० मिनिटे संगीत ऐकणे, योगासने अशा गोष्टी जरूर कराव्यात. शक्यतोवर शांत गाणी ऐकावीत ज्यामुळे तुमचे मन शांत राहण्यास मदत होईल.

७. अल्कोहोलचे सेवन टाळा :

 

अल्कोहोलच्या सेवनामुळे होणारे परिणाम हे अत्यंत गुंतागुंतीचे असतात. अल्कोहोलच्या सेवनामुळे तुमची प्रसूतीदेखील गुंतागुंतीची होऊ शकते. प्रसूतीदरम्यान अडचणी येऊ शकतात. त्यामुळे डॉक्टर तुम्हाला संपूर्ण गर्भारपणात अल्कोहोलचे सेवन न करण्याचाच सल्ला देतात. अल्कोहोलच्या सेवनामुळे होणाऱ्या अनेक परिणामांपैकी उच्च रक्तदाब हा एक.

८. सिगरेट ओढू नका :

 

careguru.in

अल्कोहोलप्रमाणेच धुम्रपानाचे सुद्धा खूप दुष्परिणाम होतात. तुम्ही गरोदर नसाल तेव्हासुद्धा धूम्रपानामुळे कॅन्सरचा धोका वाढतो, वजन वाढते, तणाव वाढतो, औदासिन्य येते, आणि उच्च रक्तदाबाचा धोका संभवतो. त्यामुळे धूम्रपान टाळणे योग्य.

९. कॅफिनचे सेवन टाळा :

 

huffingtonpost.com

कॅफिन हे उच्च रक्तदाबाचे महत्त्वाचे कारण आहे. ते देखील गरोदरपणात टाळलेले उत्तम.

१०. जंक फूड टाळा :

 

livestrong.com

सध्याचा काळ हा जंक फूडचा काळ आहे. जंक फूडमध्ये बहुतेकदा रासायनिक परिरक्षके (preservatives) वापरली गेलेली असतात आणि ती आरोग्याला अत्यंत अपायकारक असतात. ती तुमची भूक उत्तेजित करतात पण त्यातून पोषक घटक शरीराला मिळत नाहीत. शिवाय नको असलेले घटक अतिप्रमाणात खाल्ले गेल्याने रक्तदाब वाढतो. त्यामुळे जंक फूड टाळावे.

या दहा घरगुती उपायांनी उच्च रक्तदाबाचा त्रास टाळता येऊ शकतो. मात्र ज्यांना आनुवंशिक रक्तदाब आहे त्यांच्यासाठी फक्त हे उपाय तितके परिणामकारक ठरत नाहीत. जर तुमच्या डॉक्टरांना तुम्हाला औषधाची सुद्धा गरज आहे असे वाटले तर वर सांगितलेले उपाय हे त्यांच्या औषधांच्या जोडीने पूरक उपचारासारखे करता येऊ शकतात.

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version