' मक्काच्या गव्हर्नरची “बंदी” ते अनेकांच्या घटस्फोटास कारण : कॉफीचा अद्वितीय इतिहास – InMarathi

मक्काच्या गव्हर्नरची “बंदी” ते अनेकांच्या घटस्फोटास कारण : कॉफीचा अद्वितीय इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“कॉफीचा एक कप” हे फक्त एक पेय नसून अनेकांचं जीवन आहे, अनेक लोकांची झोप सकाळी कॉफी घेतल्याशिवाय जात नसते. काही लोकांना कॉफी हे त्याचा कृतिशीलतेचं कारण देखील वाटतं.

या जगात होनोरे दे बालझाक सारखे लोक होते जे दिवसाला 50 कप पर्यंत कॉफी प्यायचे आणि बिथोविन सारखे देखील होते, ज्यांनी 60 कॉफीबिन्स ( बिया) पासून बनलेली कॉफी प्यायलेली आहे, ना एक बिन कमी ना एक जास्त!

 

tarantino-pulp-fiction-inmarathi

 

कॉफीचा इतिहास आज जरी अपरिचित असला तरी कालदी, हा इथिओपिया मधला शेतकरी कॉफीच्या परिणामांचा व तत्वांच्या शोधाचा जनक मानला जातो. एका लोककथेनुसार, आठव्या शतकात कालदी ने मेंढ्यांना लाल रंगांचे द्राक्षांसारखे फळ खाल्यावर अधिक उत्साही होताना बघितलेे, इतक्या उत्साही की त्या रात्री झोपत देखील नव्हत्या !

एक दिवस कालदीने ते फळ स्वतः खाण्याचा निर्णय घेतला आणि त्याला देखील सारखेच परिणाम जाणवले. त्यानंतर त्याने गावाच्या प्रार्थनकेंद्रात ते फळ नेले. तिथे असलेल्या साधूंनी त्याला ते अनन्यसाधारण महत्व असलेलं फळ असल्याचं सांगितलं.

काही दिवसांतच उत्साहवर्धक फळाची माहिती सर्वदूर पसरू लागली. इथिओपियाच्या स्थानिक गाला जमातीच्या लोकांचे या फळावर लक्ष गेले आणि त्यांनी एक “पावर बार” त्या फळांचा मदतीने बनवला. तो बार पुढे जाऊन इतका प्रसिद्ध झाला की योद्धे त्या पावर बार ला खाऊन युद्धाला जायचे. सिडमो आणि काफा याठिकाणी हे बार खाणे कॉमन आहेत.

परंतु कॉफीबाबत पहिले लिखित पुरावे १० व्या शतकातील आहेत. अरब व्यापाऱ्यांना कॉफी इथिओपियातुन आजच्या येमेन मध्ये न्यायला १०० वर्षे लागली. क्वाहा नावाचं पेय अरबांनी डार्क कॉफीपासून तयार केलं.

 

arabic-coffee-inmarathi

 

कॉफीबाबत आजून एक लोककथा सांगितली जाते.

१५ व्या शतकात शेख गेमालदीन अबू मुहम्मद बिन्सद या एडनच्या मुफ्तीने इथिओपियाला भेट दिली होती. तिथे तो आजारी पडला व त्याला उपचार म्हणून एक पेय देण्यात आले ज्यामुळे त्याचा शरीरात ऊर्जा संचारली व तो बरा झाला. त्यानंतर त्याने त्या बियांची खरेदी केली व येमेनमध्ये त्यांना रोवले व कॉफी विकण्यास सुरुवात केली.

काही दिवसांतच कॉफी येमेनमध्ये प्रसिद्ध झाली. काम करायला मिळणारी ऊर्जा यामुळे कॉफी सर्वदूर पसरली आणि प्रसिद्ध झाली.

१५ व्या शतकाच्या शेवटापर्यंत कॉफी पूर्वेतील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय पेय बनली होती. ऑटोमन तुर्कांनी कॉफी बनवण्याचा कलेत प्रभुत्व प्राप्त केले होते. त्यांनी सिनामोन, अनिसे, कार्डमोन आणि क्लोवस यांच्या मदतीने कॉफी बनवली आणि या मसाल्यांमुळे ती अधिक सुंदर बनली. तुर्कस्तानमध्ये आज देखील ही कॉफी उपलब्ध आहे.

कॉन्स्टिटीनोपलच्या अवती भवती कॉफी शॉप्स तयार झाले. लोक एकत्र येण्याची कॉफ़ी शॉप्स जागा बनले. याठिकाणी अनेक विषयांवर चर्चा, वाद- विवाद घडत होते. सर्व काही कॉफीच्या कपाभोवती घडत होते.

 

coffee in paper cup inmarathi

 

एखाद्या स्त्रीला जर नवरा पुरेशी कॉफी देत नसेल तिला नवऱ्यापासून फारकती घेण्याचा अधिकार देखील एका अश्याच “कॉफी पे चर्चे”तून बहाल करण्यात आला होता. हे ऐकायला विचित्र वाटतं पण त्याकाळी कॉफीची कीर्ती एवढी होती.

१६ व्या शतकाच्या सुरुवातीला काही काळापुरता कॉफीवर बंदी घालण्यात आली होती. कारण माहितीये?

मक्काच्या गव्हर्नर ने ही बंदी – “फक्त सर्व महत्वपूर्ण निर्णय व चर्चा कॉफ़ी शॉप मध्ये घडू लागल्या तर त्याचा शब्दाला मान उरणार नाही” म्हणून लादली होती…! त्याने सर्व कॉफी शॉप्स बंद केले होते. कैरोच्या सुलतानाने जर मध्यस्थी केली नसती तर “कॉफी क्रांती”चा इतिहास आपल्याला वाचवा लागला असता…!

कॉफी संस्कृती युरोपभर ऑटोमन साम्राज्याचा प्रसाराबरोबर पसरली. टर्किश कॉफी आजही बाल्कन मध्ये मिळते. नंतर युरोपात कॉफीची कला वृद्धिंगत झाली आणि आज आपण जे इस्प्रेसो, माचितो आणि कॅपाचीनो हे त्यातुन निर्माण झालेले आहेत. जेव्हा कॉफी पहिल्यांदा तुर्की व्यापाऱ्यांकडून सादर करण्यात आली तेव्हा शैतानाचं औषध देखील म्हटले गेले! पण पोप ने स्वीकृती दिल्यानंतर त्याला मान्यता मिळाली.

त्यानंतर ह्या ३ कॉफीवर बंदी आणायचे प्रयत्न देखील झाले पण ते फोल ठरले.

तर असं कॉफी हे असं अद्वितीय पेय – कालदीच्या मेंढ्यपासून ते पोपपर्यंत सर्वाना आवडणारं! – आणि असा हा कॉफीचा अद्वितीय इतिहास!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?