तुमच्या त्वचेच्या सौंदर्याला घातक ठरणारी वस्तू तुम्ही सोबत घेऊन फिरत आहात! कोणती? जाणून घ्या…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
सर्वांनाच आपली त्वचा सुंदर दिसावी असं वाटत असतं आणि त्यासाठी आपण अनेक प्रयोगही करत असतो. स्वतःच्या त्वचेची काळजी ही घेतलीच पाहिजे, पण नोकरी करणाऱ्या स्त्रियांना स्वतःची काळजी घ्यायला किंवा स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ कमी असतो.
पण तुम्हाला माहित आहे का, की तुमच्या सुंदर त्वचेला घातक ठरणारी एक वस्तू तुम्ही नेहेमी स्वतःसोबत घेऊन फिरत असता? तो म्हणजे तुमचा मोबाईल.
तुम्ही कितीही थकलेल्या असाल तरी जर तुम्ही झोपण्याआधी तुम्ही तुमचा फोन चेक करत असाल तर तुमची झोप उडून जाईल. कारण फोनच्या लाईटने झोप उडून जाते. त्यामुळे फोन बंद केल्यावर देखील तुम्हाला झोप येत नाही. आणि कमी झोप झाल्यामुळे तुमची त्वचा ही डल वाटू लागते.
जर तुम्हाला नेहमी फोन चेक करण्याची सवय असेलं तर हे देखील तुमच्या त्वचेसाठी खूप घातक ठरू शकते. फोनवर नेहमी कुठलं ना कुठलं नोटिफिकेशन येत असतं. कधी फोनची चार्जिंग संपून जाते तर कधी इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित नसल्याने आपण स्ट्रेस मध्ये जातो.
हा स्ट्रेस आपल्या चेहऱ्यावरही जाणवतो. एवढचं नाही तर फोनच्या हिटमुळे तुमच्या चेहऱ्यावरील चमक कमी होते आणि काळे डाग पडू लागतात.
तुम्ही कधी लक्ष दिले आहे का की, जेव्हा तुम्ही तुमच्या फोनवर कुठला मेसेज किंवा टेक्स्ट वाचत असता तेव्हा तुमच्या भुवया जवळ येतात. ह्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागतात. आणि तुमचं वय जास्त दिसायला लागतं.
नेहेमी फोनवर असल्याने थकवा येतो आणि त्वचा डल वाटू लागते. मोबाईलची स्क्रीन बघण्यासाठी तुम्ही नेहेमी आपली मान खाली वाकवता. त्याने मानेची त्वचा फाटू लागते. ह्यापासून वाचण्यासाठी एका प्रॉपर पॉस्चरमध्ये राहा. स्क्रीन बघण्यासाठी मान वाकवू नका तर सरळच ठेवा आणि मानेवर नेहेमी मॉइश्चराइजर लावत राहा.
तुमचा मोबाईल हा बॅक्टेरियाने युक्त असतो आणि प्रत्येक फोन कॉल सोबत ते बॅक्टेरिया तुमच्या चेहऱ्यावर देखील येतात. ह्यामुळे पिंपल्सचा प्रॉब्लेम वाढू शकतो.
त्यामुळे गरज असेल तेव्हाचं मोबाईलचा वापर करा.. कारण ह्याचा अतिवापर केल्याने त्याचा प्रभाव तुमच्या सुंदरतेवर नक्कीच होईल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.