Site icon InMarathi

प्रेमभंगाचे हे भयंकर शारीरिक प्रभाव वाचून, प्रेमापासूनच जपून रहाण्याचा विचार येतो

after break up-inmarathi

youtube.com

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

जेव्हा कुणीतरी ब्रेक अप बाबत बोलत असतं तेव्हा आपल्या मनात एकच गोष्ट येते की, ज्या व्यक्तीसोबत हे घडलं आहे त्याचं मन किती दुखलं असेलं, त्याला किती त्रास झाला असेल. आपल्याला असं वाटत असतं की ज्या व्यक्तीचं ब्रेकअप होते त्याला केवळ भावनिक त्रासच होतं असेल, पण असं नसून त्याचा प्रभाव हा त्या व्यक्तीच्या शरीरावर देखील होतो. तुम्हाला वाटत असेल की, असं कसं होईल. पण जेव्हा तुम्हाला कुठला त्रास होत असेल तर त्याचा प्रभाव हा पूर्ण शरीरावर होत असतो.

मग जेव्हा तुम्हाला भावनिक आणि मानसिक त्रास होत असेलं तेव्हा देखील त्याचा प्रभाव हा तुमच्या शरीरावर होतो.

 

coach.nine.com

ब्रेकअपनंतर मनच नाही शरीरावर देखील त्याचे काही विपरीत परिणाम होतात जे आपण आज जाणून घेणार आहोत.

 

hornet.com

जेव्हा तुम्ही ब्रेकअप किंवा घटस्फोट सारख्या गंभीर गोष्टीने त्रस्त असता तेव्हा असं वाटत असतं की, तुम्हाला चक्कर येत आहे, किंवा तुमच्या हृदयापर्यंत हवा पूर्णपणे पोहोचत नाहीय. इमोशनल पेनमुळे तुमच्या हृदयात फिजिकल पेन देखील होऊ शकतं, आणि असं वाटू शकतं की कोणी तुमच्या छातीवर जोराने पंच करतंय.

 

newyorkdatinglife.com

ब्रेकअप किंवा आपल्या आप्तजनांना गमावल्याची तुलना एक्स्पर्ट्सने मेंदूमध्ये होणाऱ्या वेदनेशी केली आहे. एक्सपर्टच्या मते आपल्या मेंदूवर प्रेमात मिळालेल्या अस्वीकृतीचा प्रभाव तसाच होतो जसा एखाद्याला कोकेनची सवय असल्यावर जर ती नाही मिळाली तेव्हा होतो.

 

lovelifejourney.com

ब्रेकअप झाल्यावर जेव्हा व्यक्तीला दुखः होतं, तेव्हा ती व्यक्ती अनेक दिवस रडत बसते, झोपत न झाल्याने त्याच्या डोळ्यांना सूज येते. एरवी रडणे आणि भावनिक होऊन रडणे ह्यात देखील फरक असतो. भावनिक होऊन जेव्हा आपण रडतो तेव्हा डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये पाणी आणि मिठाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे डोळ्यांना जास्त सूज येते.

 

rd.com

ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या शरीरात जे बदल होतात त्यामुळे शरीरातील कॉर्टिसोल सप्लाय डायवर्ट होऊन जाते आणि त्याचा प्रभाव आपल्या पाचन तंत्रावर होते, ह्यामुळे भूक नष्ट होते. तसेच डायरिया आणि क्रॅम्प्स सारख्या समस्या देखील उद्भवू लागतात. हावर्ड मेडिकल स्कूलच्या एका स्टडीमध्ये असे दिसून आले की, जेव्हा तुम्ही ब्रेकअपचा त्रास सहन करत असता ह्या दरम्यान तुमची भूक नष्ट करणारे हार्मोन्स जास्त निर्माण होतात.

 

aljarida.com

जर तुम्ही स्ट्रेस मध्ये असाल तर तुमचं वजन वाढते. असं ह्यासाठी होतं कारण जेव्हा पण स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा आपल्या शरीरातील पेशी ह्या इंस्युलीन प्रती कमी संवेदनशील असतात ज्यामुळे आपले शरीर अधिकप्रमाणात इंस्युलीन तयार करते. ह्यामुळे आपलं वजन वाढायला लागतं. म्हणून ह्या दरम्यान आपल्याला साखर किंवा काही गोड खायची इच्छा जास्त होते.

 

everydayknow.com

कार्डियॉल्जिस्ट्सच्या मते जर कुठली व्यक्ती ब्रेकअप नंतर भावनिक स्ट्रेस मधून जात असेलं तर त्याला हृदया संबंधी कुठली समस्या तसेच हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढून जाते. शरीरातील ऐड्रनलिन लेव्हल वाढल्यामुळे ही समस्या उद्भवते.

त्यामुळे ब्रेकअप झाल्यानंतर जेवढा मानसिक आधार आवश्यक असतो तेवढेच आरोग्याकडे लक्ष देणेही गरजेचे असते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version