' या पाच पत्रकारांनी आपल्या लेखणीने स्वातंत्र्यसंग्रामात ब्रिटीश सरकारच्या नाकी नऊ आणले होते….! – InMarathi

या पाच पत्रकारांनी आपल्या लेखणीने स्वातंत्र्यसंग्रामात ब्रिटीश सरकारच्या नाकी नऊ आणले होते….!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

ब्रिटिश सरकारने भारतीय वृत्तपत्रांना असलेले अधिकार काढून घेण्यासाठी आणि त्यातून मांडल्या जाणाऱ्या ब्रिटिशविरोधी भावना मोडून काढण्यासाठी भारतात देशी वृत्तपत्र कायदा पारित केला होता. भारतीयांची मुस्कटदाबी करण्याच्या प्रयत्नांचाच हा एक भाग.

“फक्त रस्त्यावर लावलेला दिवा आणि चौकीदाराच्या रस्त्यांवरील फेऱ्या जसे रस्त्यावर काही चुकीचे अथवा अप्रिय घडत असल्याचे निदर्शनास आणून देतात त्याप्रमाणे संपादकांची लेखणी ही प्रशासनातील चुका आणि अन्याय जनतेसमोर आणू शकते.”

असे वाक्य हे केसरीच्या पहिल्या साप्ताहिक पत्रात मांडून टिळकांनी या अन्यायाला वाचा फोडली. केसरी हे १८८१ मध्ये बाळ गंगाधर टिळक यांनी चालू केलेले साप्ताहिक होते.

 त्यांनी केवळ ब्रिटीशांचा क्रोधच पणाला लावला नाही तर स्वतःचे आयुष्याही पणाला लावले आणि तरीही ते आणि त्यांच्यासारखी माणसं देशभक्तीचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यात कमी पडली नाहीत.

अशा माणसांनी कशाचीही तमा न बाळगता आपल्या हातात लेखणी घेतली आणि देशभक्तीची प्रेरणा आपल्या लिखाणातून अनेक लोकांमध्ये संक्रमित केली.

 

keasri-inmarathi
globalgujaratnews.in

 

त्यांनी आपल्या लिखाणातून स्वराज्याच्या मागणीचा पुनःपुन्हा उच्चार केला. ब्रिटिश सरकारला उघडपणाने विरोध केला आणि लोकांना सरकारविरोधात रस्त्यावर उतरायला प्रवृत्त केले.

कित्येकांचे आवाज दडपले गेले, पण तरीही त्यांनी हार मानली नाही. आपली लेखणी कधी म्यान होऊ दिली नाही.

पुढे वर्णन केलेल्या पाच पत्रकारांनी हे सिद्ध केलं की लेखणी ही कधीकधी शस्त्रापेक्षाही धारदार असू शकते आणि शस्त्रापेक्षा खोलवर आणि जीवघेणा वार करू शकते.

 

१. बाळ गंगाधर टिळक

 

महात्मा गांधींच्या आधीचा काळ हा बाळ गंगाधर टिळक यांचा काळ मानला जातो. ते भारतीय स्वातंत्र्यचळवळीचे आद्य प्रणेते मानले जातात. केसरी आणि मराठा ही दोन त्यांची प्रकाशने.

मराठीत केसरी आणि इंग्रजीमध्ये मराठा..

त्यांनी गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्याबरोबर वर्तमानपत्र चालू केले.

ते दोघेही स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी होते. दोन्ही वर्तमानपत्रे नियमितपणे देशभक्तीपर सदरे प्रसिद्ध करत आणि ब्रिटिश सरकारवर टीका करत.

 

tilak-writing-inmarathi
pinterest.co.kr

 

जेव्हा ब्रिटिशांनी सहावा शिवाजी, कोल्हापूरचा राजा याला वेडे ठरवले तेव्हा केसरी आणि मराठा  यातून टिळकांनी शिवाजी राजे यांची बाजू मांडण्यासाठी लेख प्रकाशित केले.

ब्रिटिश एका मोठ्या षडयंत्राचा भाग म्हणून या अफवा पसरवत असल्याचेही ते म्हणाले.

कालांतराने, ब्रिटिशांनी टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. त्यांच्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी टिळक इतकंच म्हणाले :

“न्यायाधीशांच्या निकालानंतर सुद्धा मी स्वतःला निरपराध असल्याचे मानतो. अजून अशा काही शक्ती अस्तित्वात आहेत ज्या माणसाचे आणि देशाचे भविष्य निर्धारित करतात.

अशी ईश्वराची इच्छा असेल की ज्या कारणासाठी माझा लढा चालू आहे तो लढा माझ्या लेखणीपेक्षा अधिक माझ्या तुरुंगवासामुळे यशस्वीतेकडेे लवकर जाईल.”

केसरी हे टिळकानंतर सुद्धा त्यांच्या पुढील पिढ्यांनी केसरी मराठा ट्रस्टच्या मदतीने चालू ठेवले. ते आजतागायत चालू आहे.

 

२. जी. सुब्रमण्यम अय्यर

 

हे स्वातंत्र्य सेनानी आणि सामाजिक बदलाचे प्रणेते होते. त्यांनी आपल्या लेखणीतून ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी दोन वर्तमानपत्रे चालू केली.

द हिंदू (जे आजही आपल्या देशातील एक आघाडीचे वर्तमानपत्र म्हणून पाहिले जाते) आणि स्वदेसमित्रं (सुरुवातीच्या तमिळ वृत्तपत्रांपैकी एक)

 

Subramania_Iyer-inmarathi
en.wikipedia.org

 

सुब्रमण्यम अय्यर हे इंग्रजीत अधिक सहजपणे, उत्स्फूर्तपणे लिहीत. त्यांनी स्वदेसमित्रं हे वर्तमानपत्र हिंदू नंतर चार वर्षांनी चालू केले.

 

the hindu inmarathi
the hindu

 

यात त्यांनी भारतीय स्वातंत्र्य युद्धाचे सुरुवातीपासून वर्णन केले. यामुळे तमिळ लोकांमध्ये देशभक्ती जागृत व्हावी आणि त्यांनी स्वातंत्र्य युद्धात सहभागी व्हावे अशी त्यांची इच्छा होती.

भारताच्या भाविष्याबद्दलचा विचार जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचा त्यांनी निर्धार केला होता. त्यांनी त्यांचे वर्तमानपत्र हे सामाजिक बदलाचे साधन म्हणून वापरायचे ठरवले होते.

मात्र अशा प्रक्षोभक लिखाणामुळे ते मानहानीच्या खटल्यांमध्ये बरेचदा अडकत. ते वृत्तपत्राचे संपादक असताना १९०८ मध्ये, त्यांच्यावर खटला भरण्यात आला आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला.

अशा लिखाणामुळे त्यांना हलाखीच्या परिस्थितीला अनेकदा तोंड द्यावे लागे.

 

३. शिशिरकुमार घोष आणि मोतीलाल घोष :

 

शिशिरकुमार घोष आणि मोतीलाल घोष हे बंधू. यांनी अमृत बझार पत्रिका हे दैनंदिन वर्तमानपत्र चालू केले. हे सुरुवातीला बंगाली भाषेत छापले जाई नंतर ते इंग्रजीत छापले जाऊ लागले.

पत्रिकेत छापली जाणारी सदरे ही उघडउघड ब्रिटिश सरकारच्या विरोधात असत आणि स्वातंत्र्यलढ्याला पूरक असत.

याच्या पत्रकारांनी लॉर्ड लान्सडाउनच्या कचऱ्यातील तुकडे गोळा करून काश्मीर ताब्यात घेण्यासाठी चालू असलेल्या त्याच्या प्रयत्नांचा पर्दाफाश केला.

जेव्हा हे वर्तमानपत्रात पुराव्यानिशी छापू आल्याचे वाचले तेव्हा काश्मीरचे महाराज लंडनला आपल्या स्वातंत्र्यासाठी मदत मागायला गेले.

जेव्हा लोकमान्य टिळक राजद्रोहाच्या आरोपाखाली इसवी सन १८९७ मध्ये जेव्हा तुरुंगात गेले तेव्हा त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवणाऱ्या न्यायाधीशांविरुद्ध एक सनसनाटी संपादकीय या वृत्तपत्रात लिहिण्यात आले.

 

sisir & motilal-inmarathi
radhikaranjan.blogspot.com

 

शिशिरकुमार यांनी भारतीयांनी प्रशासनात सामील होण्याचे गरज ही वेळोवेळी आपल्या पत्रिकेतून मांडली. त्यांच्या लिखाणातून भारतीयांनी आर्थिक शोषणातून बाहेर पडण्यासाठी ठोस पावले उचलायला हवीत हे त्यांनी वारंवार अधोरेखित केले.

या पत्रिकेत छापून आलेल्या बातमीमुळे सुभाषचंद्र बोस आणि त्यांचे सहकारी विद्यार्थी यांना प्रेसिडेन्सी कॉलेजमधून काढून टाकल्यावर पुन्हा कॉलेजमध्ये घेण्यात आले.

या पेपरमध्ये तेव्हाच्या व्हाईसरॉय असलेल्या लॉर्ड कर्झनबद्दलही काही गोष्टी मांडण्यात आल्या होत्या.

लॉर्ड कर्झन हा तरुण आणि थोडा नखरेबाज असल्याचे यात लिहिले गेले होते. तसेच तो प्रशिक्षण न घेतलेला आणि तरीही हातात अनिर्बंध सत्ता असलेला असा सत्ताधारी आहे असेही म्हटले होते.

जेव्हा दोन्ही बंधू निवर्तले तेव्हा त्यानंतर शिशिरकुमार यांचा मुलगा तुषार कांती घोष याने काही काळ वर्तमानपत्राची धुरा सांभाळली.

 

४. के. रामकृष्ण पिल्लई :

 

त्यांचे नाव हे स्वदेशाभिमानी या शब्दाशी समानार्थी आहे. ज्याचा अर्थ देशभक्त असा होतो. द पॅट्रिऑट हे मल्याळम पब्लिकेशन होते जे त्यातील ब्रिटिशविरोधी सदरांमुळे त्रावणकोरमध्ये प्रसिद्ध झाले.

द पॅट्रिऑट हे नियतकालिक अब्दुल खादर मौलवी यांचे नियतकालिक. १९०६ पासून पिल्लई हे संपादित करत. त्यांना त्यात काय छापायचे हे ठरवण्याचा संपूर्ण हक्क देण्यात आला होता.

त्यांचे लेख हे सामाजिक परिवर्तनाचे एक साधन होते. ते आपल्या लेखातून खुलेपणे पी. राजगोपालाचारी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवत.

 

Ramakrishnapillai-inmarathi
mywordsnthoughts.com

 

पी राजगोपालाचारी हे तेव्हा त्रावणकोरचे दिवाण होते आणि त्रावणकोरच्या माणसांनी स्वसत्ता मिळवावी म्हणून ते प्रयत्नशील होते. त्यांनी आपल्या राज्यातील भ्रष्टाचाराविरुद्ध आपल्या लेखणीतून आवाज उठवला होता.

१९१० मध्ये त्यांच्या वर्तमानपत्रावर ब्रिटिशांनी बंदी घातली आणि पिल्लई यांना अटक करण्यात आली. त्यांना तिरुनेलवेली ला पाठवण्यात आले. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य तिरुनेलवेलीमध्ये लिखाण आणि नागरी हक्कांच्या मागणीसाठी अर्पण केले.

पॅट्रिऑटचे १९२० च्या सुरुवातीला पुनरुत्थान करण्यात आले आणि रामकृष्ण पिल्लई यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या हेतूने, ते काही अंशी पुन्हा नव्याने चालू करण्यात आले.

 

५. पंडित मदन मोहन मालवीय :

 

जरी मालवीय हे बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक म्हणून सर्वांना ज्ञात असतील तरी पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांचे असलेले योगदान लक्षणीय आहे.

जेव्हा ब्रिटिश शासनाने १९०८ साली प्रेस कायदा आणि वृत्तपत्र कायदा पास केला, तेव्हा मदन मोहन मालवीयांनी, मोतीलाल नेहरूंसोबत लीडर नावाचे इंग्रजी दैनिक सुरू केले. हे वृत्तपत्र कायमच राजकारणाभिमुख होते.

त्यांनी महात्मा गांधींनी अनेक कार्ये प्रसिद्ध केली आणि महत्त्वाची भूमिका बजावली.

 

pandit madan mohan malviya inmarathi

 

मालवीय हे हिंदुस्तान टाइम्सला खाईत जाण्यापासून वाचवणाऱ्या महत्त्वाच्या सदस्यांपैकी एक होते. यासाठी त्यांनी ५०००० रुपये उभे केले होते.

असे हे भारतीय स्वातंत्रालढ्यात पत्रकारितेची धुरा नेटाने वाहणारे तडफदार नेतृत्त्व. वृत्तपत्रासारख्या माध्यमांचा वापर अधिक जबाबदारीने आणि देशहितासाठी करणारे आपले सुजाण नेते! यांनी इंग्रजांच्या तोंडचे पाणी पळवले नसते तरच नवल!

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?