Site icon InMarathi

परफ्युम लावताय? थांबा! त्याआधी ही काळजी घ्या.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

उन्हाळ्यात अति उष्णतेमुळे घामाचा दुर्गंध येणे हे साहजिक आहे. अश्यात मग आपल्याकडे परफ्युम लावण्याशिवाय काही पर्यायच उरत नाही. भारतीयांसाठी परफ्युम हा केवळ स्टेटसचा पर्याय नसून, गरजेची वस्तू आहे, असे म्हणता येईल.

अर्थात, या परफ्युमचा वापर इतरांवर छाप पाडण्यासाठी सुद्धा केला जातोच…

कधीकधी आपण परफ्युम वापरण्यात काही क्षुल्लक चुका करतो. कधी कधी कुठला परफ्युम कसा आणि कधी वापरायला हवा ह्यात आपली गफलत होते. फ्रेश वाटायच्या ऐवजी आपल्याला अधिकच विचित्र वाटू लागते.

परफ्युम असा वापरायला हवा, ज्याचा सुगंध आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसा आणि पूरक असायला हवा. पण खरेतर आपण जो परफ्युम लावतो तो वापरताना आपण व्यक्तिमत्वाचा विचार करतच नाही.

यामुळे काहीवेळा आपला परफ्युम चांगला असूनही त्याचा योग्य तो परिणाम होत नाही. आपल्याला ताजेतवाने वाटत नाहीच, शिवाय इतरांवर छाप पाडणे सुद्धा आपल्याला जमत नाही.

 

 

जर तुम्ही अंघोळीसाठी सुगंधित साबण वापरत असाल तर ह्यासोबतच तुमच्या शरीरावर एक सुगंधित लेयर बनायला सुरवात होते. ह्यानंतर सेकंड लेयर असते ती बॉडी लोशनची आणि मग त्यानंतर परफ्युम.

जर तुम्ही ह्याप्रकारे सुगंधित द्रव्य वापरत असाल, तरच तुम्ही शरीर उत्तम आणि सुगंधी राहण्यासाठी योग्यप्रकारे मेहनत घेताय असे म्हणता येईल. ही पद्धत वापरून परफ्युमचा प्रभाव दिवसभर राहण्यास मदत होते.

 

 

जर तुम्हाला तुमचा परफ्युम हा “लॉंग लास्टिंग” हवा असे वाटत असेल, तर हा उपाय सुद्धा करता येईल.

हेवी सेंट म्हणजेच अधिक सुवासिक परफ्युम आधी लावा. जेणेकरून कमी सुवासिक असणाऱ्या परफ्युमवर त्याचा परिणाम होणार नाही. आधी हेवी सेंट लावावा, त्यानंतर काही काळ जाऊ द्यावा आणि त्यानंतर त्यावर साध्या सुगंधाचा परफ्युम लावावा.

एक किंवा त्याहून अधिक परफ्युम्स वापरत असाल, तर अशाप्रकारे मिश्रण करावे की, नंतर येणारा सुगंध हा जास्त उग्र वाटू नये.

 

 

जर तुम्हाला सिंगल बेस परफ्युम हवा असेल तर तुम्ही एक सारख्या परफ्युम्सचा वापर करू शकता. म्हणजेच, त्यांचा सुवास एकसारखा असायला हवा. फ्लोरल, वूडी, सायट्रस, ओरिएन्टल वगैरे सुगंध यासाठी उत्तम ठरू शकतील.

 

 

आणि जर तुम्हाला काही वेगळा प्रयोग करायचा असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे परफ्युम्स एकत्र करून तुम्ही तुमचं खास परफ्युम तयार करू शकता. रोज आणि वॅनिला हे दोन सुगंध एकत्र करणे, हा छान पर्याय ठरू शकतो.

अशाप्रकारे वेगवेगळे प्रयोग करून तुम्ही तुमचे एखादे खास परफ्युम तयार करू शकता. ती तुमची वेगळी ओळख ठरण्यास मदत होईल. अर्थात, हे करत असताना परफ्युमचा गंध उग्र किंवा विचित्र ठरणार नाही, याची काळजी घ्या.

कारण परफ्युमचा सुवास आणि तुमच्या आजूबाजूचे वातावरण यांचा मेळ साधणे सुद्धा अत्यंत आवश्यक असते. त्यातच तुमची आवड जपण्याची इच्छा सुद्धा तुम्हाला नक्कीच असेल.

 

 

जर तुम्हाला फ्रेश वाटण्यासाठी परफ्युम वापरायचे असेल, तर सायट्रस फॅमिलीचे परफ्युम्स आणि डीओ यांचा वापर करू शकता. जर तुम्हाला थोडा मोहक सुगंध आवडत असेल तर तुम्ही फुलांचा सुगंध असलेले परफ्युम्स ट्राय करू शकता.

 

 

जर तुम्हाला हार्ड परफ्युम आवडत असेल तर तुम्ही चंदनच्या सुगंधाचे परफ्युम्स नक्कीच वापरू शकता.

काय मग मंडळी, परफ्युम कसे वापरायचे आणि स्वतःची छाप पाडण्यासाठी त्यांचा वापर कसा करायचा हे नेमके कळले असेल ना!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version