Site icon InMarathi

या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या सुविधा पाहून डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं असतं की, जिथे ते नोकरी करतात त्या कंपनीने पगारासोबतच त्यांना काही सुविधाही पुरवाव्यात जसे की, ट्रॅव्हलिंग अलाउंस, हेल्थ इन्शुरन्स, सुट्ट्या इत्यादी.

पण जर आम्ही तुम्हाला हे सांगितलं की जगात अश्याही काही कंपनीज आहेत ज्या ह्या सुविधांसोबतच आणखी काही सुविधा देतात ज्या ऐकून तुमचे डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. हे वाचून तुम्हालाही ह्या कंपन्यांमध्ये काम करण्याची इच्छा होईल.

नेटफ्लिक्सः एका वर्षाची पेड मॅटरनिटी आणि पॅटरनिटी लीव

 

filmjunk.com

 

आई-वडील होण्याची इच्छा असलेल्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेची नेटफ्लिक्स ही कंपनी म्हणजे कुठल्या स्वर्गाहून कमी नाही. नवीन पालकत्व स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही कंपनी पूर्ण वर्षभरासाठी पेड मॅटरनिटी आणि पॅटरनिटी लीव देते.

एवढचं नाही तर नोकरी परत जॉईन केल्यावर ही कंपनी कर्मचाऱ्यांना पार्ट टाईम किंवा फुल टाईम नोकरी करण्याची मुभा देखील देते.

एयरबीएनबीः दरवर्षी फिरायला पैसे देते

 

topyaps.com

 

ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना फिरायला जाण्यासाठी दरवर्षी २ हजार डॉलर देते.

गूगलः मृत्यू नंतर त्याच्या साथीदाराला सुविधा आणि मोफत जेवण

 

korea.googleblog.com

 

गुगल ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना मफत जेवण देते आणि कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या साथीदाराला अर्धा पगार पुढील दहा वर्षांपर्यंत देते.

फेसबुकः वॅले पार्किंग आणि बेबी कॅश

 

money.cnn.com

 

फेसबुक मेनलो पार्क येथील आपल्या मुख्यालयात कर्मचाऱ्यांना वॅले पार्किंगची सुविधा देते तसेच तेथील इलेक्ट्रिक कार्स साठी मोफत चार्जिंग स्टेशन देखील आहे.

एवढचं नाही तर नव्याने आई-वडील होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी ४ हजार डॉलर देते, ज्याला बेबी कॅश असे म्हणतात.

टेस्लाः लोनवर कार

 

greencarreports.com

 

टेस्लाच्या कारपूल कार्यक्रमानुसार ते आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनीची कार घरी घेऊन जाण्याची मुभा देते. हे कारला कर्मचारी विकेंडला देखील ठेवू शकतात.

स्पॉटिफाईः एग फ्रीजिंग

 

digiday.com

 

ही कंपनी ६ महिन्यांची पेड पॅरेंटल लीव देते, त्यासोबतच एक महिना नव्याने आई-वडील झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुविधेनुसार काम करण्याची मुभा देखील देते. तसेच कंपनी एग फिजिंग आणि फर्टीलीटीमध्ये मदत म्हणून खर्च देखील उचलते.

वॉल्ट डिजनीः मोफत पार्क प्रवेश

 

orlandoemployeediscounts.com

 

ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना आपले मित्र आणि कुटुंबांसोबत मोफत डीजनी पार्कमध्ये फिरण्याची मुभा देते. सोबत असलेल्यांना हॉटेल वगैरेमध्ये देखील सूट दिली जाते.

ट्विटरः एक्यूपंचर आणि इंप्रो क्लासेस

 

thejournal.ie

 

ट्विटर ही आपल्या कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा देते. ज्यात तीन वेळेचं जेवण आणि त्यासोबतच लॉन्ड्री आणि ड्राईक्लिनची देखील सुविधा देते. ह्याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना एक्यूपंचर आणि इंप्रो क्लासेसची सुविधा देखील देते.

इन अॅन आउटः मोफत बर्गर आणि फ्राईज

 

topyaps.com

 

ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक शिफ्टमध्ये दोन बर्गर आणि फ्राईजमोफत दिल्या जाते. काम करण्याच्या सर्वात चांगल्या ठिकाणांच्या यादीत ही कंपनी चवथ्या स्थानावर आहे.

जेनेनटेक : हेयरकट, स्पा ट्रीटमेंट आणि कार धुणे

 

greatplacetowork.com

 

सॅनफ्रांसिस्को येथील बायोटेक्नोलॉजी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना मोफत हेअरकट, स्पा ट्रीटमेंट आणि कार वॉशची सुविधा पुरवते. ह्याव्यतिरिक्त मेडिकल आणि डेंटल ट्रीटमेंटची सुविधा देखील पुरवते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version