आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
३० मे ला गोवेकर आपला स्थापना दिवस साजरा करतात कारण ३० मे १९८७ ला गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून १४ वर्षापर्यंत गोवा पोर्तुगीजांचा अधिपत्याखाली होतं.
१९ डिसेंबर १९६१ ला गोव्याला पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यात आले. त्यामुळे १९ डिसेंबरला गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो. तर जाणून घेऊया गोव्याला स्वातंत्र्य कसं मिळालं ते गोवा राज्य कसं स्थापन झाले याची गोष्ट….
गोवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे आणि लोकसंख्येचा दृष्टीने चौथे सर्वात लहान राज्य आहे. जगभरात गोवा आपल्या सुंदर अशा सागरी किनाऱ्यासाठी व तटासाठी प्रसिद्ध आहे.
गोवा पोर्तुगीजांची वसाहत होती. पोर्तुगीजांनी गोव्यावर तब्बल ४५० वर्ष राज्य केलं आणि डिसेंबर १९६१ साली भारताच्या ताब्यात दिले.
गोवा मुक्ती संग्रामाची सुरुवात १९२८ साली झाली जेव्हा काही राष्ट्रवादी विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन मुंबईला “गोवा काँग्रेस कमिटी” ची स्थापना केली.
गोवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी डॉ टी बी कुन्हा होते. डॉ टी बी कुन्हा यांना गोव्यातील राष्ट्रवादी विचारांचे जनक म्हटले जाते. पहिले दोन दशक गोव्याचा स्वतंत्रता संग्राम अत्यंत मंद गतींने सुरू होता.
१९४६ मध्ये स्वतंत्रता सेनेचे प्रमुख आणि समाजवादी नेता राममनोहर लोहियांनी गोव्याला पोहचून आंदोलनाला दिशा दिली.
नागरिकांच्या सामान्य अधिकारांची होणारी पायमल्ली आणि त्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि गोव्यात जाहीर सभा भरवण्याची घोषणा केली. परंतु त्यांचा विरोध दाबण्यासाठी गोवा पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.
भारतीय सेनेची तयारी :
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांच्या वारंवार आग्रहानंतरदेखील पोर्तुगीज गोवा सोडायला तयार नव्हते. त्यावेळी मुंबईजवळ असलेले दिव-दमण सुद्धा गोव्याचा भाग होते.
जेव्हा पोर्तुगीजांना नेहरूंनी केलेल्या लाख आग्रहांनंतरदेखील पोर्तुगीज गोवा मुक्त न करण्याचा भूमिकेवर ठाम राहिले तेव्हा भारतीय सैन्याचा वापर हा एकमेव उपाय तत्कालीन सरकारकडे उरला होता.
१९५४ साली गोव्याच्या राष्ट्रवादी गटाने दादरा आणि नगर हवेलीच्या वस्त्यांवर कब्जा मिळवला आणि भारत समर्थक प्रशासनाची स्थापना केली.
१९६१ मध्ये भारतीय सेनेच्या तिन्ही दलांना युद्धसज्जतेचे आदेश देण्यात आले. मेजर जनरल के. पी. कैडेंथ यांना “१७ लाईट इन्फटरी डिव्हिजन” आणि ” ५० पॅरा ब्रिगेड” चा ताबा मिळाला.
भारतीय सेनेच्या तयारीनंतरदेखील पोर्तुगाली मागे हटायला तयार नव्हते. भारतीय वायुसेनेजवळ त्यावेळी सहा हंटर स्क्वाड्रन आणि चार कैनबेरा स्क्वाड्रन होते.
गोवा मुक्ती अभियान :
गोवा मुक्ती अभियानात वायुदलाची जबाबदारी एअर व्हाईस मार्शल ऐरलीक पिंटो यांचावर होती. भारतीय सेनेने २ डिसेंबरला गोवा मुक्ती अभियान सुरू केलं गेलं.
वायू सेनेने ८ व ९ डिसेंबरला पोर्तुगीजांच्या ठिकाणांवर अचूक बॉम्बहल्ले केले. भारतीय भुदल आणि वायू सेनेच्या हल्ल्यांनी पोर्तुगिज हताश झाले आणि अश्याप्रकारे १९ डिसेंबर १९६१ रोजी तत्कालीन पोर्तुगाली गव्हर्नर मैन्यू वासलो डिसिल्वाने समर्पण प्रस्तावावर स्वाक्षरी केली.
अश्याप्रकारे गोवा आणि दमण-दिव यांना मुक्त करण्यात आले आणि ४५१ वर्षांचं पोर्तुगिजांचं शासन नष्ट झालं. पोर्तुगीजांना जेव्हा भारतीय सेनेचा हल्ल्यांचा सामना करावा लागत होता त्याच वेळी गोव्यातील लोकांच्या तीव्र प्रतिकरांचा देखील सामना करावा लागला.
त्यानंतर गोव्यात २० डिसेंबर १९६२ रोजी निवडणुका झाल्या आणि श्री दयानंद भांडारकर गोव्याचे पहिले नवनिर्वाचित मुख्यमंत्री झाले. गोव्याला महाराष्ट्रात विलीन करण्याचा देखील चर्चा त्यावेळी सुरू होत्या कारण महाराष्ट्र गोव्याचा जास्त जवळ होता.
वर्ष १९६७ मध्ये जनमत चाचणी घेण्यात आली आणि गोव्याचा लोकांनी केंद्रशासित प्रदेश म्हणून राहणे पसंत केले. नंतर ३० मे १९८७ रोजी गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला आणि गोवा भारतातील २५ वं राज्य म्हणून नावारूपाला आलं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.