Site icon InMarathi

लिफ्टमध्ये आरसा बसवण्यामागचे रंजक कारण! जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जेव्हापासून लिफ्टचा शोध लागला आहे तेव्हापासून लोक पायऱ्यांचा वापर फक्त आपत्कालीन परिस्थितीतच करताना दिसतात. साध्या दुसऱ्या तिसऱ्या माळ्यावर जरी जायचं असेल तरी लोकांना लिफ्ट हवी असते.

जर एखाद्या दिवशी लिफ्ट खराब असल्याने पायऱ्या चढाव्या लागल्या तरी काहींची चिडचिड होते. ह्या लिफ्ट ने माणसांचा वेळ आणि उर्जा वाचवून त्यांचं आयुष्य काहीप्रमाणात सोयीस्कर केले आहे.

 

mini-facts.com

लिफ्ट मध्ये गेल्यावर आपण पहिली कुठली गोष्ट करत असू तर ती लिफ्ट मधल्या आरश्यात स्वतःला बघणे. लिफ्टमध्ये गेल्यागेल्या आपण तिथल्या आरश्यात बघून आपले केस नीट करतो, टाय व्यवस्थित करतो, लिपस्टिक निघाली असेल तर लिपस्टिक लावतो.

असे लोक आपाआपल्या परीने स्वतःला सावरत असतो. पण काय तुम्ही कधी हा विचार केला आहे की लिफ्टमध्ये आरसा का लावल्या जात असेल?

म्हणजे आरसा लावल्याने किंवा न लावल्याने लिफ्टमध्ये तर काहीच फरक पडत नाही मग तरी लिफ्टमध्ये आरसा का लावला जातो?

 

news.com.au

ह्यासाठी आपल्याला त्या काळात जावे लागेल जेव्हा लिफ्टचा शोध लागला. १८५३ ह्या साली लिफ्टचा शोध लागला. जेव्हा ह्या लिफ्टचा शोध लावला गेला तेव्हा ह्यात आरसे नव्हते. मग अचानक असे काय झाले की ह्यात आरसे बसवावे लागले. तर जेव्हा पहिल्यांदा लिफ्टचा वापर करण्यात आला तेव्हा लोकांनी पायऱ्यांऐवजी लिफ्टमध्ये जाण्यास सुरवात केली.

तेव्हा त्यांना असे वाटले की, लिफ्टमध्ये पायऱ्यांच्या तुलनेत जास्त वेळ लागतो. आणि लिफ्ट ही त्यांच्या काहीही कामाची नाही. ज्यानंतर लिफ्टचा वापर करणाऱ्यांनी लिफ्ट बनविणाऱ्या कंपनीकडे ह्याची तक्रार केली. ज्यानंतर कंपनीन्या देखील ह्या समस्येवर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात लागल्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

memuk.org

तर काही कंपन्यानी ह्याच्या डिझाईन आणि स्पीडवर फोकस केला. पण हे सर्व खूप खर्चिक होतं. त्यातच लिफ्ट संबंधी लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होऊ लागला होता. तेव्हा एक इंजिनिअर म्हणाला की, ‘मला वाटतं की एलीवेटरची स्पीड व्यवस्थित आहे, लोक पागल आहेत.’

ह्यानंतर वैज्ञानिकांनी लिफ्ट नाही तर लोकांकडे आपला फोकस वळवला. ह्यामध्ये असे दिसून आले की लोकांना लिफ्टची स्पीड ह्यासाठी कमी वाटते कारण त्यावेळी त्यांच्याकडे करायला काहीही नसते.

 

japanesestation.com

ह्यावर एक तोडगा काढण्यात आला तो म्हणजे लिफ्टमध्ये आरसे लावावे. ज्याने लोकांचे लक्ष लिफ्टच्या स्पीडवर नाही तर आरश्यावर असेलं. ह्यादरम्यान अनेकांचा वेळ हा स्वतःला आवरण्यात जाईल आणि त्यांचे लक्ष हे लिफ्टच्या स्पीडवर नसेल. आणि तसेच झाले. लिफ्टमध्ये आरसे लावल्यानंतर लोकांच्या स्पीड बाबत तक्रारी येणं बंद झाल्या. ह्यानंतर एक सर्व्हे देखील करण्यात आला आणि लोकांना विचारण्यात आले की, आता लिफ्टच्या वेगात काही फरक पडला का? ह्या प्रश्नावर लोकांनी होकारार्थी उत्तर दिले. लोकांच्या मते आधीपेक्षा आता लिफ्ट जास्त गतिमान झाली आहे. खरंतर असं काहीही नसून फक्त हा केवळ आरश्याचा होता.

 

म्हणजेच वैज्ञानिक आणि कंपन्यांनी मिळून लोकांना मूर्ख बनवले. त्यांनी केवळ लोकांच लक्ष विचलित करण्यासाठी लिफ्टमध्ये आरसे लावले जेणेकरून लोक व्यस्त  राहतील आणि त्यांचे लक्ष हे लिफ्टच्या वेगावर जाणारच नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version