आपण एवढ्याश्या थंडीने गारठतो, विचार करा पृथ्वीवरील सर्वात थंड गाव वर्षभर कसं जगत असेल?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
रशिया मधील ओयीमायाकोन (Oymyakon) हे गाव जगातील सर्वात थंड गाव म्हणून ओळखलं जातं.
हे गाव Pole Of Cold म्हणून प्रसिद्ध आहे. याला कारण देखील तसचं आहे, पहिलं कारण म्हणजे या गावापासून आर्टिक्ट हिमखंड अगदी काहीच मैलांच्या अंतरावर आहे आणि दुसरं कारण म्हणजे हिवाळ्यात या गावाचं सरासरी तापमान उणे ५८ अंश सेल्सिअसच्या आसपास असतं.
फेब्रुवारी २०१३ मध्ये या गावाचं तापमान तब्बल उणे ७१ अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेलं होत आणि आजवरचे सर्वात निच्चांकी (lowest) तापमान म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली.
हिवाळ्यात ओयीमायाकोन गावामध्ये सूर्याचं दर्शन तसं दुर्मिळचं! दिवसभर सगळीकडे केवळ काळाकुकट्ट अंधार पहायला मिळतो.
आपल्याकडे १० अंशाच्या खाली तापमान गेलं की आपले दात वाजायला लागतात, मग या गावात संपूर्ण शरीर गोठवणाऱ्या थंडीत मनुष्य राहूच कसा शकतो, हा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे.
पण आता येथील लोकांना याची सवयच पडली आहे. प्रत्येक नवा दिवस त्यांच्यासाठी नव्या समस्या घेऊन येतो परंतु न डगमगता ते प्रत्येक दिवस हसत हसत घालवतात हे विशेष!
या गावात राहणे तसे एक प्रकारचे दिव्यच आहे. गावाची लोकसंख्या अत्यंत तुरळक असते! गावात फक्त दोनच दुकाने आहेत एक म्हणजे दैनंदिन गोष्टी पुरवणारं किराणा मालाचं दुकान आणि दुसरं म्हणजे पेट्रोल पंप !
कमी तापमानामुळे विजेची समस्या तर रोजचीच आहे. येथे जेवढ्या लोकांकडे गाड्या आहेत त्यांनी गाड्या ठेवण्यासाठी खास प्रकारचं heated garage तयार केलं आहे, कारण अतिशय कमी तापमानामुळे गाडीचं इंजिन आणि बॅटरी गोठून निकामी होऊन जातं. जर गाडी बाहेरच पार्क केली असेल तर मात्र ती सतत सुरु ठेवण्यावाचून पर्याय नसतो.
काहीबाही शक्कल लढवून घर सतत गरम ठेवणं भाग असतं, नाहीतर अख्ख घर गोठतं.
जर कोणाचंही निधन झालं तर त्याला काही दिवसांनंतर पुरले जाते. कारण ज्या ठिकाणी त्याला दफन करायचे असते ती जागा सहज खोदता येत नाही त्यासाठी जवळपास ३-४ दिवस त्या जागी मोठी आग करून बर्फ वितळायला लागतो. तेव्हा कुठे कबर खोदून मेलेल्या माणसावर अंत्यविधी केला जातो.
येथे शेती केली जात नाही. फळ, भाजीपाला कधीतरी पाहायला मिळतो. इकडचं जेवण देखील थंडचं !! जर गरम केलं तर काही मिनिटातचं ते पुन्हा थंड होऊन जातं.
या लोकांचा मुख्य आहार आहे रेनडियरचं अथवा घोड्याचं मांस, मासे आणि पाळीव जनावरांकडून मिळणार दुध!
मासे पकडण्यासाठी संपूर्ण दिवस खर्ची घातल्यावर जेवणाची सोय होते. काही लोकांचा मासेमारी हा मुख्य धंदा आहे, गोठवणाऱ्या तापमानात दिवसभर बाहेर राहून मासे विकण म्हणजे जीवावर बेतणारचं काम!
प्राण्यांच्या कातडीपासून आणि लोकरीपासून बनणारं स्वेटर दिवसाचे २४ तास अंगावर चढवलेले हवे, तेव्हा कुठे शरीर गरम राहतं. रेनडियरच्या कातडीपासून बनलेले बूट येथे फारच प्रसिद्ध आहेत.
उन्हाळ्यात मात्र याच ओयीमायाकोन गावाचं सौंदर्य पाहण्यासारखं आहे. उन्हाळ्यात येथील तापमान सरासरी उणे १० अंश सेल्सिअसच्या आसपास असतं. ट्रेकिंग आणि टुरिस्ट डेस्टिनेश म्हणून सध्या या प्रदेशाचा नावलौकिक वाढतो आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.