Site icon InMarathi

औरंगाबादला डीएड चा विद्यार्थी ते “मोस्ट वॉन्टेड” दहशतवादी, एक धक्कादायक प्रवास…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

तो जगभरातील आतंकवादी संघटनांत अतिरेक्यांची भरती करणारा यशस्वी “रिकृटर” होता. पाकिस्तानच्या आयएसआय या महत्वपूर्ण संघटनेचा माणूस होता.

आणि भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार हा तोच होता –

ज्याने २००८ च्या मुंबईवरील आतंकवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार अबू जुंदालला प्रशिक्षित केलं होतं.

फैयाज कागजी असं त्याचं नाव, मूळचा महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातला.

२०११ पासून तब्बल ५ वर्ष तो इंटरपोलच्या रडारवर नव्हता. पण ४ जुलै २०१६ ला जेदाह येथील अमेरिकन दूतावासाबाहेर घडवलेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर त्याचं नाव पुन्हा चर्चेत आलं.

भारतीय तपासयंत्रणा आता म्हणतात की, तो आत्मघातकी हल्लेखोर कागजीच होता, जो आपल्या मृत्यूचा वेळीं ४० वर्षाचा होता, आणि त्याने इसिसच्या सांगण्यावरून हा हल्ला घडवला होता.

 

indianexpress.com

 

DNA Profiling च्या तथाकथित रिपोर्टस नुसार या हल्ल्यामागे बीड जिल्ह्यातील एक व्यक्ती आहे. त्याची ओळख DNA नमुन्यांचा आधारावर करण्यात आली आहे, हे नमुने ऑक्टोबर २०१७ मध्ये महाराष्ट्र ATS ने त्याचा घरच्यांकडून एकत्र केले होते.

कागजीने वाणिज्य दूतावासासमोर असलेल्या एका मशिदीसमोर आपली गाडी पार्क करून आपल्या डिव्हाईसच्या मदतीने स्फोट घडवला. सौदी अरेबियामध्ये परदेशातल्या नागरिकांना लक्ष करण्यासाठी घडवला गेलेला हा पहिला हल्ला होता.

 

 

एका विद्यार्थ्यांपासून ते लष्कर ऐ तैयबाचा प्रमुख भर्तीकर्त्यापर्यंत…

२००३ मध्ये औरंगाबादच्या मौलाना आजाद कॉलेजमध्ये बी.एड चा अभ्यास करत असताना त्याला नशा करण्याची सवय लागली व तो तसं करणाऱ्या युवकांसोबत राहू लागला. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार कागजीचा वापर लष्कर ऐ तैयबाने आपला मुखवटा म्हणून केला.

तो बीडला बीएससी करत असतानाच आतंकवादी संघटनेच्या संपर्कात आला होता.

 

औरंगाबादमध्ये आपल्या प्रवासादरम्यान त्याने ३०० रुपये प्रति महिना या भाड्यावर एक खोली विकत घेतली. तिथे त्याने पुस्तकालय सुरू केले. लोकांकडून मिळणाऱ्या पैशात तो पुस्तक घेत होता. असं करत त्याने तरुणांची मने जिंकायला सुरुवात केली.

तपासाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, यावेळीच कागजी जुंदाल ला भेटला होता आणि LeT च्या प्रमुख नेत्यांशी त्याची भेट घालून दिली होती.

एका सूत्राच्या माहिती नुसार २००२ च्या बळी गेलेल्या मुसलमानांच्या हत्यांचा बदला घेण्यासाठी कागजी ने जंदालला कट्टरपंथी इस्लाममध्ये येण्यासाठी उकसवलं होतं.

“गुजरात के जलते रात दिन” नावाचं पुस्तक त्याने त्याला वाचायला दिल होत आणि त्याला दंग्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ दाखवले होते.

कागजीला एक कोड नेम होतं – “अर सलान”. आणि रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधण्याची जबाबदारी त्याला दिली होती.

 

indianexpress.com

 

प्रशिक्षण आणि पतन

भारतीय तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार २००६ च्या काही वर्षांआधी कागजी पाकिस्तानला जाऊन प्रशिक्षण घेऊन आला होता. यावेळी घरी मात्र दुबईला नोकरी करत असल्याची बतावणी केली होती.

आपल्या हँडलर्सला प्रभावीत करण्यासाठी त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी १९ फेब्रुवारी २००६ रोजी मुंबई-अहमदाबाद कर्णवती एक्सप्रेसच्या एससी-१ मध्ये स्फोटक ठेवले होते.

अहमदाबादच्या कालपूर स्टेशनवर बॉम्बस्फोट झाला आणि १४ पेक्षा जास्त लोक जखमी झाले.

जुंदालने तपास यंत्रणेला दिलेल्या माहितीनुसार कागजीला या बॉम्बब्लास्ट साठी शाबासकी मिळाली होती आणि त्याची रवानगी पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील एका सुरक्षित घरात करण्यात आली.

 

 

थोडे महिने शांत राहिल्यानंतर त्याने परत जिहादि वेबसाईटवर काम करण्यास सुरुवात केली.

एका सूत्राने म्हटल्याप्रमाणे ,

“फेसबुकवर प्रोपागंडा व्हिडीओज आणि पेजेस च्या माध्यमातून युवकांना संघटनेसाठी रिक्रुट करत होता.”

यावेळी मुंबई हल्ल्याची योजना आखायला सुरुवात झाली होती. कागजीने जुंदालला आणि आपल्या शहरातील मसूद अजहरला एक प्रमुख हँडलर्स बनण्यासाठी सांगितलं आणि प्रशिक्षण दिलं. त्याने हे काम मराठी भाषेचा वापर करून केलं.

 

analisidifesa.it

 

आत्मघाती कारवाईत मसूदला घेणं कागजीला मंजूर नव्हतं, जर मसूद पकडला गेला असता तर त्याची उपस्थिती पोलिसांना बीडच्या दिशेने घेऊन गेली असती.

त्याला हीच भीती होती की, जर मसूद पकडला गेला तर तपासयंत्रणा मसुदच्या परिवाराला त्रास देणं चालू करतील.

त्याला ही भीती सुद्धा होती की, तपास यंत्रणा शेवटी त्याचा परिवारापर्यंत पोहचून त्याचा घरच्यांची चौकशी करायला सुरुवात करेल.

मसूदला बाहेर ठेवण्यासाठी कागजीने खालिदची भेट घेतली परंतु मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जाकीर-उर- रहमान-लखवी ने आधीच आदेश देऊन टाकले होते.

ह्यासंदर्भात तो जेव्हा लखवीला भेटला तेव्हा तो खूप नाराज झाला. ज्यामुळे लखवी आणि कागजीत बाचाबाची झाली आणि त्यानंतर लखवीने एकाही भारतीयाला मुंबईच्या मिशनवर न पाठवण्याची घोषणा केली. यानंतर कागजीने पाकिस्तान सोडला.

सौदीत पलायन आणि इसिसशी संबंध

गुप्तचर संस्थांनी दिलेल्या रिपोर्टनुसार अंतत इसिसने कागजीला पाकिस्तानाबाहेर काढून सौदीत पोहचवलं.

असा कुठलाच रस्ता नव्हता ज्याचा मदतीने तो स्वतःहून पाकिस्तान सोडणार होता. लखवी सोबत झालेल्या भांडणामुळे तो पाकिस्तानात सुरक्षित नव्हता.

देश सोडण्यासाठी इसिसने मदत केली आणि नंतर त्याचा वापर करून घेतला.

 

globalvillagespace.com

 

सौदीत कागजीने एका मदरस्यात शिकवायला सुरुवात केली आणि एका पाकिस्तानी महिलेशी विवाह केला. तो गुप्तचर यंत्रणेचा हाताबाहेर होता. जुंदाल २०११ ला कागजी कडे गेला होता. तेव्हा तो गुप्तचर संघटनांच्या नजरेत आला.

जुंदालला सौदीतच अटक करण्यात आली होती आणि त्याला भारतात पाठवले होते.

इसिसने भारतीय मुस्लिमांची भरती वाढवण्यासाठी कागजीचा वापर केला आणि त्याने विविध साईट्सच्या माध्यमातून असंख्य मुस्लिम तरुण जाळ्यात ओढले आणि इसिसच्या भरतीला मदत केली. नंतर त्याने स्वतःचा जीवही दिला.

कागजी एक जिहादी मानसिकतेने प्रेरित झालेला अतिरेकी होता, २०११ मध्ये कागजीला भारताकडे सोपवण्यास सौदीने नकार दिला होता. प्रत्यक्षात असं म्हणतात की इसिसने त्याला सौदीच्या सरकारमधील बळ वापरून वाचवलं होत. २०११ नंतर कागजी इंटरपोलच्या नजरेआड झाला होता.

DNA Reports ने दिलेल्या पुष्टी नुसार तो कागजीच होता ज्याने जेदाह मध्ये स्वतःला उडवलं होतं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version