Happy Birthday to रफ़ी साहब! – रफींच्या काही आठवणी आणि काही गाणी
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
आज, २४ डिसेंबर २०१५ – सर्वांच्या लाडक्या मोहम्मद रफी साहेबांचा ९१वा वाढदिवस.
ह्या निमित्ताने, त्यांच्या काही निवडक आठवणी आणि गाण्यांचं संकलन केलेली ही पोस्ट.
१ – रफी साहेबांनी तब्बल २६,००० गाणी गायली आहेत असं मानलं जातं. पण संगीत प्रेमींना आत्तापर्यंत ७,४०५ गाणीच track करता आली आहेत.
२ – सर्वात जास्त भाषांमध्ये गाणी म्हणण्याचा विक्रम रफींच्या नावावर आहे. रफींनी ४ परदेशी आणि १४ भारतीय भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत. त्यांनी १६२ गाणी हिंदी शिवाय इतर भारतीय भाषांत म्हटली आहेत. प्रामुख्याने मराठी, कोंकणी, असामी, भोजपुरी, उडिया, पंजाबी, बंगाली, सिंधी, कन्नड, गुजराती, तेलगु आणि उर्दूमध्ये त्यांनी गाणी म्हटली आहेत.
३ – रफींना पाहिलं performance करण्याची संधी वयाच्या १३ व्या वर्षी मिळाली. त्यांनी सैगलजींच्या concert मध्ये गायन केलं होतं.
४ – रफींनी किशोर कुमारला आवाज दिला होता! शरारत (१९५६) आणि रागिनी (१९५८) ह्या चित्रपटांमध्ये किशोर कुमारजींनी acting केली होती आणि त्यांना रफींनी आवाज दिला होता.
५ – रफी विरुद्ध किशोर कुमार !
रफी आणि किशोर कुमार ह्यांनी स्वतःच्या नकळत एकमेकांना आव्हान दिलं होतं – thanks to R. D. Burman!
झालं असं की “प्यार का मौसम” ह्या चित्रपटासाठी ‘तुम बिन जाऊ कहा’ हे गाणं दोन प्रसंगी, दोन वेगळी पात्रं गायला हवी होती. त्यामुळे बर्मन साहेबांनी रफी आणि किशोर कुमार, दोघांकडून ही गाणी रेकॉर्ड करून घेतली. किशोर कुमारांचा आवाज भारत भूषणसाठी वापरला गेला आणि रफींचा शशी कपूरसाठी. रफींचं गाणं जास्त गाजलं.
https://www.youtube.com/watch?v=zinGtBlbhtc
६ – रफी साहेब आणि किशोर कुमारजींमध्ये हेल्दी कॉम्पिटीशन होती. रफींच्या मृत्यूच्या दिवशी, किशोर कुमार कितीतरी वेळ रडत होते.
७ – रफी साहेबांनी एकूण ५१७ पात्रांना आवाज दिला आहे!
===
रफींच्या जन्मदिनाच्या निमित्ताने, त्यांच्या उत्तम गाण्यांचं हे कलेक्शन enjoy करा!
1 –
2 –
3 –
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi