Site icon InMarathi

मुलींना इम्प्रेस करण्याच्या नादात होणाऱ्या या ५ चुका टाळा, मित्रालाही सांगा!

amey-mithila-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मुलींना इम्प्रेस करायचं म्हटलं तर मुलं काहीही करायला तयार असतात. काही त्यांना स्पेशल फील व्हावं यासाठी त्यांच्यासाठी सरप्राईज देतात, तर काही वेगवेगळ्या पद्धतींनी आपलं प्रेम व्यक्त करत असतात. ते नेहमी मुलींना इम्प्रेस करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात.

पण अश्यातच काही मुलं चुकतात आणि आपल्या क्रशला किंवा डेटला इम्प्रेस करण्याच्या नादात नको तेही करून बसतात. म्हणजे खोटं बोलणं, उगीचच स्वतःला अति दाखविण्याचा प्रयत्न करणं वगैरे.

चला तर, जाणून घेऊया की मुलींना इम्प्रेस करण्यासाठी मुलं काय काय करतात ज्यावर विश्वास ठेवणं अवघड असू शकतं.

१. उगीच प्रशंसा करणं :

 

 

जर कोणाची तारीफ योग्य पद्धतीने केली तर कोणाचाही दिवस सहज चांगला जातो. कोणाचंही लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा हा सर्वात उत्तम पर्याय आहे. म्हणून जर तुम्हाला कुठल्या मुलीला इम्प्रेस करायचं असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरू शकता.

पण जो खोटी प्रशंसा करणारी मंडळी कोणालाही आवडत नाहीत. असे लोक प्रत्येक गोष्टीवर तुमची प्रशंसा करत बसतात जे कधीकधी अगदीच नकोसं वाटायला लागतं.

 

२. आवड-निवड एकसारखी आहे असं भासवणं :

 

 

जर पहिल्याच भेटीत तुम्ही हे बघून आनंदी आहात की, तुमची आवड-निवड खूपच एकसारखी आहे, तर मुलींनो जरा सावध व्हा. कारण अनेक पुरुष आपल्या डेटला खुश करण्यासाठी अश्याप्रकारे खोटं बोलतात.

अर्थात, यामुळे पुढील काळात मुलांचं नुकसानच होत असतं.

त्यामुळे जर कोणासोबत तुमची अगदीच आवड-निवड जुळत असेल तर त्यांना एकदा त्याबाबत डिटेलमध्ये विचारून बघा. मग ते खरं बोलत आहेत की खोटं हे तुम्हाला कळून जाईल.

 

३. एक्स किती वाईट होती हे सांगणं :

 

 

काही लोक स्वतःला डिफेंड करण्यासाठी मी किती बरोबर आणि दुसरे किती चुकीचे आहेत हे दाखविण्यासाठी आपल्या एक्स गर्लफ्रेंड किंवा परीस्थितींना दोष देऊन मोकळे होतात.

त्यांच्या भूतकाळाची दुःखद कहाणी सांगतात, जेणेकरून त्यांना मुलीची सहानुभूती मिळेल. अर्थात, ही गोष्ट नेहमीच फायद्याची ठरू शकत नाही. उलट अनेकदा याचा नकारात्मक परिणाम झालेला दिसतो.

 

४. स्वतः जे नाही ते दाखवणे :

 

 

खोटं बोलण्याची सवय अनेकांना असते. आपल्या पगाराबाबत खोटं बोलणं किंवा स्वतःला एकदम हायफाय दाखवणं हे खूप कॉमन आहे.

आताच्या जगात सर्वच जण फक्त श्रीमंत आणि हायफाय असल्याचा आभास निर्माण करत असतात. पण हा आभास खूप काळ टिकवून ठेवणं शक्य नाही. काही दिवसांनी त्याचं पितळ उघडं पडतं आणि त्यांचा खोटेपणा सर्वांसमोर येतो.

 

५. गर्लफ्रेंडचे मित्र-मैत्रीण न आवडणं :

 

 

अनेकांना आपल्या प्रेयसीचे मित्र-मैत्रीण आवडत नसतात. भलेही ते तुमच्यासमोर त्यांच्याशी चांगलं वागतील किंवा चांगलं बोलतील पण मनातून त्यांना त्या मित्र-मैत्रिणींबद्दल रोष असतो, जो ते दाखवत नाहीत. ह्यातही ते खोटं वागू शकतात.

अशावेळी मुलं तिच्या ग्रुपमध्ये मनापासून, मिळूनमिसळून राहू शकत नाहीत. याचा परिणाम कळत-नकळतपणे नात्यावर होऊ लागतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version