Site icon InMarathi

मुलींचे हे कॉमन “फॅशन ट्रेंड्स” मुलांना अजिबात आवडत नाहीत

varun-dhavan-inmarathi

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

मुलींना नटायला खूप आवडतं. त्यामुळे त्या आणखी चांगलं आणि सुंदर दिसण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयोग करत असतात. कोणी एकदम मस्त कपडे घालणार तर कोणी मेकअपने स्वतःची सुंदरता वाढविण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी त्या दर दिवसाला काहीना काही करत असतात, सेलिब्रिटीजच्या फॅशन फॉलो करत असतात. पण हे सर्व करत असताना त्या कधीकधी हे विसरून जातात की आपण कशी फॅशन करायला हवी.

तसेच जर तुम्हाला मुलांना इम्प्रेस करायचं असेल तर त्यांची आवड-निवड ही माहिती असायला नको? कारण मुली तर त्यांच्या हिशोबाने फॅशन करत असतात.

पण त्यांना जरी तो चांगला वाटत असला तरी तुमच्या साथीदाराला किंवा तुमच्या क्रशला ते आवडेलच असं नाही. त्यामुळे मुलांना मुलींची कुठली फॅशन आवडते आणि कुठली आवडत नाही हे माहित करून घेणे खूप गरजेचं आहे.

फ्लोरल प्रिंट :

 

dhgate.com

फ्लोरल प्रिंट चा ड्रेस घातला की, मुलांना ती गार्डन वाली फिलिंग येते. पण ह्याने इम्प्रेस होत नाही. भलेही मुलींमध्ये हा ट्रेण्ड खूप प्रचलित असला तरी मुलांना तो चादर आणि पडद्या ह्याहून जास्त काहीही वाटत नाही.

अतिमेकअप :

 

intothegloss.com

आजकाल मेकअप हा मुलींचा जीव की प्राण असा झाला आहे. मेकअप केल्याशिवाय ह्या घराच्या बाहेर पायही टाकत नाही. पण अति मेकअप करणे हे देखील तुमच काम बिघडवू शकतात. अति मेकअप कधीच मुलांना आवडत नाही.

हाय वेस्ट जीन्स :

 

thegloss.com

आजकाल हाय वेस्ट जीन्सचा देखील ट्रेण्ड आहे. मुलींनाही हाय वेस्ट जीन्स खूप आवडतात. पण मुलांना ही फॅशन अजिबात आवडत नाही कारण त्याने तुमचा लुक बिघडतो. हेच नाही तर वेस्ट शॉर्ट्स आणि स्कर्ट्स देखील तुमचा लुक खराब करतात.

मोठे सनग्लासेस :

 

tangorest.ru

सनग्लासेस घालण्यात काहीही वाईट नाही पण काही मुली एवढे मोठे सनग्लासेस वापरतात की त्याने त्यांचा चेहराच पूर्ण झाकून जातो. त्यामुळे ते असे दिसायला जरी चांगले वाटत असले तरी ते चेहऱ्यावर सूट करेलच असं नाही.

हिल्स :

 

smosh.com

हाय हिल्स घालणे हे तर आजकाल फॅशन झालं आहे. पण काही मुली हिल्सच्या नावावर काहीही घालतात, त्यांना जरी त्यांच्या हिल्स ह्या फॅशनेबल आणि आकर्षक वाटत असल्या तरी त्या मुलांना विचित्र वाटतात.

खूप साऱ्या बांगड्या :

 

tazenews.com

मेरे हाथो में नौ नौ चुडिया है… हे गाण तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण ह्या नौ-नौ म्हणजे नऊ-नऊ बांगड्या हातात असल्या तर चांगल्या दिसतात. पण काही मुलींना उगीचच अति बांगड्या घालायची हाउस असते. पण बांगड्या किंवा ब्रेसलेट घालताना त्या खूप भारी किंवा अति आवाज करणाऱ्या नसतील ह्याकडे लक्ष द्या.

खोटी नखे :

 

allaboutfashion.net

मुलींना नखे वाढवायला खूप आवडतात. ते त्यांना छानही दिसतं. म्हणजे सुंदर असे वाढलेली नखे सर्वांनाच आवडतात. पण मग त्यावर नेलपेंट, मग त्यात आर्ट हे मुलांच्या डोक्यावरून जाते. आणि त्यातच जर तुम्ही मोठ-मोठे खोटी नखे लावली तर समोरची व्यक्ती कधीही इम्प्रेस होणारं नाही. त्यामुळे नखे नैसर्गिकरीत्या वाढू द्या.

बँडेज ड्रेस :

 

rebelliousfashion.co.uk

जसं आपल्याला काही लागलं की आपण बँडेज लावतो, तशीच एक बँडेज ड्रेस देखील असते. हो असाही एक ड्रेस असतो. ज्यामध्ये त्या ड्रेसवर अनेक ठिकाणी भोकं असतात. शोर्ट ड्रेसेस घालणे हे जरी मुलांना आवडत असले तरी त्यांना असा ड्रेस आवडलेच असे नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version