Site icon InMarathi

ही पद्धत फॉलो केलीत तर अशक्य वाटणारा प्लॅस्टिक कचऱ्याचा प्रश्नही अगदी सहज सुटेल

Plastic-Pollution 5 InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कार्बन हा मुख्य घटक असलेला पदार्थ म्हणजे प्लास्टिक. जमिनीच्या पोटातून किंवा समुद्रातून मिळणारे तेल प्रथम शुद्ध करून घ्यावे लागते. त्यासाठी ते तापवून वेगवेगळ्या तापमानाला उकळणारे भाग वेगळे केले जातात. त्यापासूनच बहुतेक सगळ्या प्लास्टिकची निर्मिती होते.

शास्त्रज्ञांनी न गंजणारी, वजनाने हलकी आणि टिकाऊ वस्तू म्हणून ‘प्लास्टिक’ हा पदार्थ बनवला खरा; पण तो टाकाऊ झाल्यावर त्याचा जिवाणूंमुळे र्‍हास होत नसल्याने तो नष्ट करता येत नाही. त्यामुळे प्रदूषण होते.

परत वापरात न आणता येणारे प्लास्टिकचे पदार्थ टाकायचे कुठे आणि त्यांची विल्हेवाट लावायची कशी, ही समस्या जगभर चर्चिली जात आहे.

जगभरात एकंदरीतच प्रदूषणाने हैदोस घातलाय… यात प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषण सगळ्यात जास्त आहे आणि ते पाण्यापासून हवेपर्यंत वातावरणातील घटक प्रदूषित करत चाललंय.

जगभरात प्लास्टिकच्या बाटल्यांचा खप सगळ्यात जास्त आहे आणि म्हणूनच प्लास्टिकच्या विघटनाची समस्या ही वैश्विक पातळीवर चर्चिल्या जाणाऱ्या प्रमुख समस्यांपैकी एक आहे. यासंदर्भात नवनवीन शोधही लावले जात आहेत.

 

youtube.com

वैज्ञानिकांनी असे एक विकर (एंझाईम) निर्माण केले आहे जे प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे विघटन करू शकते. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, पर्यावरणात होणारे प्रदूषण पाहता, हा शोध पर्यावरण क्षेत्रात एक क्रांती घडवून आणू शकतो. हा शोध जगभरातील प्लॅस्टिकच्या समस्येवर तोडगा काढायला उपयोगी पडेल.

हा शोध २०१६ मध्ये जपानमध्ये लागलेल्या एका जिवाणूच्या शोधापासून प्रेरित आहे. हा जिवाणू जपानमध्ये डम्पिंग ग्राऊंडवरील प्लॅस्टिक खाण्यासाठी शोधला गेला होता. वैज्ञानिकांनी आता यातील विकरांच्या विस्तृत रचनेचा शोध लावला आहे.

यूनिवर्सिटी ऑफ पोस्टमाउथ, यू.के मधील संशोधक प्रोफेसर जॉन मैक्गेहन यांनी सांगितले की, उत्परिवर्तक विकरे (mutent enzimes) प्लास्टिकच्या बाटल्यांचे विघटन करायला समुद्रापेक्षा कित्येक पटीने कमी वेळ घेतात.

आम्ही याचा वापर करून प्लॅस्टिकचे विघटन त्याच्या मूळ घटकांत करण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून याचा पुनर्वापर करणे शक्य होईल. जवळजवळ १० लाख प्लास्टिकच्या बाटल्या जगभरात प्रत्येक मिनिटाला विकल्या जातात.

यातील केवळ १४% बाटल्यांचाच पुनर्वापर केला जातो आणि उर्वरित सगळ्या समुद्रात फेकल्या जातात. त्यांच्यामुळे होणारे प्रदूषण समुद्रातील जीवसृष्टीला नुकसान पोहोचवते.

त्याचबरोबर समुद्री प्राणी खाणारे इतर सजीवही यांच्या विळख्यात सापडतात आणि त्यांनाही संकटाला सामोरे जावे लागते.

 

anthropocenemagazine.org

यशस्वी चाचणी :

प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या परिक्षणादरम्यान या विकाराने पॉलीइथाइनील टेरेपथेलेट (पीईटी) मध्ये रासायनिक बदल घडवून त्याला त्याच्या मूळ घटकांमध्ये परिवर्तित केले. हे प्लास्टिक खाद्य व पेय पदार्थांसाठी सर्वाधिक वापरले जाते.

प्लास्टिक प्रदूषणाला असा आळा घातला जाणार :

● हल्ली प्लास्टिकच्या रिसायकलिंग नंतर त्यापासून चटईसारख्या कमी गुणवत्ता असलेल्या गोष्टी बनवल्या जातात. सध्या दोन प्रकारचे पीईटी प्लास्टिक बाजारात मिळते. वर्जिन ग्रेड आणि आर पीईटी म्हणजेच रिसायकल केलेले पीईटी.

 

 

● वर्जिन ग्रेड प्लॅस्टिक बनविण्यासाठी क्रूड ऑइल वापरले जाते. या प्लास्टिकपासून बॉटल्सबरोबरच इतर उच्च गुणवत्तेची उत्पादने घेतली जातात. रिसायकल केलेल्या पीईटी म्हणजेच पॉलीइथाइनील टेरेपथेलेटपासून उत्तम उत्पादन बनवले गेल्याचे ऐकिवात नाही. कारण तसे करण्याची पद्धत अजूनपर्यंत अस्तिवात नाही.

 

 

● आजच्या कंपन्या वर्जिन ग्रेड पीईटी निर्माण करतात. यात मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो आणि जगातील प्लॅस्टिक वाढते. या संशोधनातूनस पीईटी बॉटल्स रिसायकल करून चांगल्या गुणवत्तेच्या बाटल्या आणि इतर उत्पादन घेता येईल. यात असलेल्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. आणि त्यातून नवीन प्लॅस्टिक निर्माण करण्याला आळा घातला जाऊ शकतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version