आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
आयपीएलचा यंदाचा सिझन तसा त्याचा मागील इतर सिझन्स पेक्षा जास्त रंजक होता. सर्व संघ यावेळी प्रचंड फॉर्म मध्ये होते. सर्व संघांनी एकमेकांना काटे की टक्कर दिली. यंदाच्या आयपीएल मध्ये केन विल्यम्सन, अब्राहम डिव्हीलियर्स, के एल राहुल, रिषभ पंत, रायडु यासारखे खेळाडू एकीकडे रन्सचे डोंगर उभारत असताना काही फलंदाज मात्र अपयशी ठरले आहेत. गोलंदाजांच्या बाबतीत देखील हीच परिस्थिती आहे.
११ वर्षांपासून आयपीएल एक धनवान वार्षिक स्पर्धा ठरली आहे. प्रत्येक शॉट, प्रत्येक कॅच, प्रत्येक शतक, प्रत्येक अर्धशतक यावर करोडोंचा अवॉर्डसची नुसती खैरात वाटली जात आहे. अनेक खेळाडू यामुळे प्रचंड मालामाल झाले आहेत.
आता आयपीएलचा यंदाचा सिझन संपण्याच्या वाटेवर आहे. तर आज आपण जाणून घेऊयात त्या खेळाडूंबद्दल ज्यांनी यंदाच्या आयपीएल मध्ये प्रत्येक शॉट, कॅच, विकेटवर लाखो रुपयांची बक्कळ कमाई केली असून ते गर्भश्रीमंत झाले आहेत. यातील काही नावं तुमच्यासाठी अनपेक्षित असतील.
ह्या यादीत भारतीय तसेच विदेशी खेळाडूंचा देखील समावेश आहे. गुणांकन तक्त्यात तळाला असलेल्या संघातील खेळाडूंचा देखील या यादीत समावेश करण्यात आला आहे . तर चला जाणून घेऊ यंदाचा आयपीएल मध्ये कोणावर लक्ष्मीची कृपादृष्टी पडली आहे.
१ ) ग्लेन मॅक्सवेल
संघ :- दिल्ली डेअरडेविल्स
कामगिरी :- १२ सामन्यात ५ विकेट्स, १६९ रन्स
कमाई – ९ कोटी रुपये
ग्लेन मॅक्सवेल ला जर त्याचा प्रत्येक विकेटमागे २० रन्स दिले तर calculations अनुसार त्याची प्रत्येक रन्स मागची कमाई ३,३४,५७२ रुपये आहे. जेव्हा ग्लेनच्या सुमार कामगिरी बद्दल दिल्लीचे कोच रिकी पॉंटिंग यांना विचारणा करण्यात आली, तेव्हा प्रतिक्रिया देताना ते म्हटले की त्यांना सर्वाधिक वाईट ऋषभ पंत व त्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वाटलं.
आज दिल्ली गुणांकन तक्त्यात तळाला असण्याचं कारण संघाचं ढिसाळ नियोजन आहे. ज्याप्रकारे गौतम गंभीरची उचलबांगडी करण्यात आली आणि त्याला ग्लेन मॅक्सवेल विरोधात संधी देखील देण्यात आली नाही ज्याने पहिली मॅच फक्त आरोन फिंचच्या लग्नासाठी बुडवली होती आणि व्यवसायिकतेचे दर्शन घडवले होते.
२ ) वॉशिंग्टन सुंदर
संघ :- रॉयल चालेंजर बंगलोर
कमाई – 3.2 कोटी रुपये
कामगिरी – ७ सामन्यात ४ विकेट, ६५ रन्स
त्याचा प्रत्येक विकेट मागे त्याला 20 रन्स दिल्यास त्याची प्रत्येक रन मागची कमाई 2,20,689 रुपये आहे. भारताकडून बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात केलेल्या कामगिरीवरून त्याचाकडून खूप अपेक्षा संघांकडून ठेवण्यात आल्या होत्या पण त्या अपेक्षांची पूर्तता करण्यास तो पूर्णपणे असमर्थ ठरला आहे.
३ ) ब्रेंडन मॅक्युलम
संघ: रॉयल चालेंजर बंगलोर
कमाई:- 3.6 कोटी रुपये
प्रत्येक रन मागे कमाई:- 2,83,464 रुपये
न्यूझीलंडचा माजी सलामीवीर मागच्या सर्व आयपीएलमध्ये खेळला आहे आणि 109 सामन्यात 2881 रन्स 28 च्या ऐवरेज ने बनवले आहेत. पण यंदाच्या आयपीएल सिझन मध्ये त्याचा ऐवरेज फक्त 21 रन्सचा राहिला असून हा त्याचा सर्वात वाईट कामगिरी असलेला सिझन ठरला आहे.
४ ) ख्रिस वोक्स
संघ: रॉयल चॅलेंजर बंगलोर
कमाई :- 7.4 कोटी रुपये
कामगिरी :- 5 सामन्यात 8 विकेट, 17 रन्स
जर तुम्ही 20 रन्स मागे त्याने घेतलेल्या प्रत्येक विकेटचा हिशोब लावला तर त्याचा पारड्यात प्रत्येक रना मागे :- 4,18, 079 रुपये इतकी कमाई झाली आहे. 2017 च्या आयपीएलमध्ये 8.77 ची इकॉनॉमी असलेला हा भिडू यंदा आश्चर्यकारकरित्या 10.36 च्या इकॉनॉमी पर्यंत पोहचला. त्यानंतर त्याचा जागी टीम साऊथी ला संधी देण्यात आली होती.
५ ) बेन स्ट्रोक्स
संघ : राजस्थान रॉयल्स
कमाई:- 12.5 कोटी रुपये
कामगिरी:-13 सामन्यात 8 विकेट्स , 196 रन्स
प्रत्येक रन मागची कमाई :- 5,24,475 रुपये
जर प्रत्येकी 20 रन्स मागे त्याने घेतलेल्या विकेट्स चा हिशोब केला तर प्रति रन त्याचा मागे 3,51,123 रुपयांची कमाई झाली आहे. मागच्या सिझन मध्ये बेन स्ट्रोक्स हा सर्वात मौल्यवान खेळाडू ठरला होता ,त्यावेळी तो रायझिंग पुणे सुपर जायनट्स कडून खेळत होता. बेन त्याचा कडून ठेवण्यात आलेल्या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही.
६ ) रोहित शर्मा
संघ:- मुंबई इंडियन्स
कमाई:- 15 कोटी रुपये
कामगिरी :- 14 सामन्यात 0 विकेट्स , 286 रन्स
प्रत्येक रन मागची कमाई :- 5,24,475 रुपये
यावर्षी रोहितने 23.83 चा ऐवरेज कायम ठेवला आहे. तरी बंगलोर विरुद्धच्या सामन्यातील 94 रन्सची कामगिरी वगळता दुसरी कुठलीही मोठी उपलब्धी तो मिळवू शकलेला नाही आहे. त्याने 13 सामन्यात 17.45 ऐवरेज ने केवळ 192 रन्स बनवले असून त्याचा यावर्षीच्या मुंबईच्या कामगिरीवर गंभीर परिणाम झाला आहे.
यंदाची आयपीएल जरी रंजक असली, तरी संघमालकांना अनेक खेळाडूंकडून त्यांनी लावलेल्या पैश्याचा मोबदल्यात निराशा आली आहे. यामुळे प्लेयर्स जरी मालामाल झाले असले तरी संघाला याचं फार मोठं नुकसान झालं आहे. पुढच्या वेळी पैसे लावण्याआधी संघ मालक शंभर वेळा विचार करतील हे मात्र नक्की आणि प्लेयर्स ला देखील त्यांचा कामगिरीवर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.