Site icon InMarathi

बलाढ्य अमेरिकेच्याही छातीत धडकी भरवतोय इराणचा मिसाईल कार्यक्रम !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

इराणच्या लांब पल्ल्याच्या मिसाईल शोध कार्यक्रमाची आशा त्याचवेळी धुळीला मिळाली, जेव्हा सन २०११ मध्ये एक स्फोट झाला आणि यावर काम करणाऱ्या सैन्यातील वैज्ञानिकाला ठार मारलं गेलं. कित्येक पश्चिमी विश्लेषकांनी हा तेहरानच्या तांत्रिक विकासाचा विनाश असल्याचे भाकीत केले. तेव्हापासून असे तर्क केले जात होते की इराण क्षेपणास्त्रांच्या तंत्रावर काम करत आहे.

पण त्याच वेळी इराणी नेत्यांचं असं म्हणणं होतं की त्यांची क्षेपणास्त्र बनवण्याची काही योजना नाही.

परंतु जेव्हा कॅलिफोर्नियामध्ये स्थित असलेल्या शास्त्र शोधपथकाने गेल्या वर्षी ईराणी स्टेट टीव्हीवरील कार्यक्रम पहिला तेव्हा त्यात एका सैन्य वैज्ञानिकाचा महिमा वर्णन केला जात होता. जो शोधपथकासाठी एक ऐतिहासिक धडा होता. त्यांनी असा निष्कर्ष काढला की त्या वैज्ञानिकाच्या मृत्यूपूर्वी जनरल हसन तेहरानी यांनी ईराणच्या वाळवंटात गुप्तपणे एक आण्विक कार्यक्रम पार पाडला होता.

 

presstv.com

शोधपथकाने या शोधाबद्दल अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी या तांत्रिक कार्यक्रमाचे सॅटेलाईट फुटेज मिळवले. त्यानुसार, इराणने एका ठिकाणी ऍडव्हान्स रॉकेट इंजिन आणि रॉकेटच्या इंधनावर काम केले होतेे. इथे जास्तकरून रात्रीच्या वेळी काम करण्यात आले होते. त्यांच्या मिळालेल्या माहितीवरून तिथे मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनवली जाऊ शकतात असा अंदाज बांधण्यात आला आहे.

वास्तविक पाहता, शोधकर्त्यांच्या स्ट्रक्चर आणि ग्राउंड मार्किंगमध्ये एकरूपता दिसून आली नाही. त्यामुळे इराण लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या तंत्रावर काम करत आहे हे सिद्ध झाले नव्हते. यामुळे या तऱ्हेचा इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन केल्याच्या आरोपातून सुटला. इराणचे अशा पद्धतीने आरोपातून वाचणे नंतर इराणच्या आण्विक शस्त्रांच्या विकासासाठी कारणीभूत ठरले.

शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, ईराणचा आण्विक कार्यक्रम हा सरळसरळ यूरोपीयन यूनियन आणि अमेरिकेसाठी धोक्याचा आहे आणि म्हणूनच या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील तणाव वाढणे स्वाभाविक आहे.

पाच विशेषज्ञांच्या एका गटाने याकडे स्वतंत्रपणे पाहिलं आहे. त्यांचे यावर एकमत झाले की इराण लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रावर काम करत आहे. त्यांच्यापैकी इंटरनॅशनल इंस्टीट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज मधील एका मिसाइल एक्सपर्टनी, मिचेल इलिमन यांनी तपासणीतील काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले, जे वैज्ञानिकांना विचारात पडून कृती करायला लावायला पुरेसे होते.

 

.vosizneias.com

त्यांच्या म्हणण्यानुसार आणि हाती आलेल्या पुराव्यांवरून असे लक्षात आले की, तेहरान पाच ते दहा वर्षांपासून या कामात व्यस्त आहे. इराणमध्ये यूनायटेड नेशन मिशनच्या प्रेस अधिकाऱ्यांनी या बाबतीत काहीही बोलण्याचे टाळले. कारण असे करणे हे त्यांना मिलिटरीच्या कामात दखल देण्यासारखे वाटले.

कॅलिफोर्नियातील इंटरनॅशनल स्टडीजतर्फे करण्यात आलेल्या एका अभ्यासावरून असे समजते की, इराणमधील शाहरुद या शहरापासून २५ मैल दूर फॅसिलिटी सेंटर होते.

छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे, इथूनच मिसाईल टेस्ट केली गेली होती. या बाबतीत २०१७ मध्ये एक मोठे सत्य समोर आले जेव्हा इराणीयन जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे मुहद्दामच्या जवळील एक छायाचित्र सादर करण्यात आले. त्यात शाहरुद शहर दाखवण्यात आले होते. शाहरुद हे असे ठिकाण आहे जे २०१३ मध्ये झालेल्या क्षेपणास्त्र चाचणीच्या ठिकाणाहून ४० किलोमीटर दूर आहे.

ग्राउंड स्कार्स –

कित्येक प्रकारची मिलिट्री टेकनिक्स सुरुवातीच्या काळात विकसित करण्यात आली होती. इनडोअर, बॅलेस्टिक लॅब, विन्ड टनेल आणि एनरिचमेंट सुविधा या एकतर बिल्डिंगमध्ये झाकून ठेवल्या गेल्या असाव्यात किंवा या सर्व अंडरग्राउंड केल्या गेल्या असाव्यात. क्षेपणास्त्र हे याला अपवाद आहे. त्याचे इंजिन उभारणे आणि त्याच्या चाचण्या घेणे हे खूप कठीण काम आहे जे सर्वसाधारणपणे मोकळ्या जागेत केले जाते आणि स्फोटानंतर जमिनीवर जळल्याच्या खुणा राहतात.

 

dailymail.co.uk

शोध पथकाने शाहरुदच्या आसपासच्या प्रदेशांची सॅटेलाइट छायाचित्रे घेतली. त्यामध्ये शाहरुदपासून काही किलोमीटर अंतरावर एक क्रिएटर त्यांच्या नजरेस पडला जो अजूनपर्यंत विशेषज्ञांना माहिती नव्हता.

ही जागा सुद्धा स्पेस सेंटरसाठी वापरण्यात आलेली जागा असल्याचे सिद्ध झाले आहे. इथल्या जमिनीमध्ये दोन खोलवर खुणा दिसून आल्या आहेत. अशी छायाचित्रे सन २०१६ आणि २०१७ मध्ये पाहायला मिळाली. शोध पथकाने टेस्ट स्टँडची तपासणी केली. त्यांच्या अंदाजानुसार शाहरुदमधील सन २०१७ च्या चाचणीत ३७० टन वजनाच्या मशीनचा वापर करण्यात आला ज्यापैकी इंजिनाचे वजनच ६२ ते ९३ टन होते, जे एका इंटरकाँटिनेंटल बॅलेस्टिक मिशनसाठी योग्य असते. आत्तापर्यंत दोन वापरण्यात न आलेले स्टँड प्राप्त करण्यात आले आहेत.

अशा प्रकारे शाहरुद मध्ये मिसाइल परीक्षणाचा एक पुरावा मिळाला. तिथे तीन हाउस पिट उध्वस्त केले गेले जे रॉकेट कॉम्पोनेन्ट आणण्यासाठी आणि ठेवण्यासाठी वापरले जात असत.

यातील एक पिट 5.5 मीटर व्यासाचे होते, जे इराणच्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या चाचणीसाठी गरजेचे असल्याचे मानले जाते. शोधपथकाचे असे म्हणणे आहे की सॅटेलाइट इमेजची प्रत सुधारली जाऊ शकेल अशी सुविधा अस्तित्त्वात आहे. ही सुविधा वापरून बिल्डिंगच्या आत आणि गर्दीच्या ठिकाणी वस्तू ओळखता येऊ शकतात. कॅलिफोर्नियाचे संशोधक डेव्हिड यांच्या मते, जुन्या सॅटेलाईटमध्ये अशी सोय आहे.

अनुत्तरित प्रश्न :

कॅलिफोर्निया स्थित रिसर्च टीमचे प्रमुख जेफरी लुईस यांचे म्हणणे आहे की आम्ही इराणच्या आण्विक कार्यक्रमाबद्दल गाफील राहिलो. त्यांच्या मते, इराणने आजपर्यंत मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचे एक अधिक प्रगत संस्करण विकसित केले असावे आणि ते स्पेस रॉकेट असल्याचे सांगून लपवले जाऊ शकते.

 

roix.com

हेजिंग बेट्स :

सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजच्या इराणी विभागाच्या एक्सपर्ट डीना यांच्या मते, इराण लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र तयार करण्यात पुढे गेलेले वाटत नाही. मात्र गरज पडली तर ती वापरता यावीत यासाठी ती तयार ठेवण्याकडे त्यांचा कल असल्याचा अंदाज आहे. मात्र जर अमेरिकेकडून अधिक दबाव टाकण्यात आला तर कदाचित इराण आपला आण्विक कार्यक्रम थांबवू शकते. तशीदेखील इराणच्या आण्विक कार्यक्रमाची माहिती कोणाला नाही.

त्यामुळे नॉर्थ कोरियाच्या आण्विक क्षमतेला संशयाचा फायदा घेता येईल. याआधी सुद्धा कोरियाची आण्विक क्षमता गृहीत न धरल्यामुळे नॉर्थ कोरियाच्या परमाणू कार्यक्रमाने जोर धरला होता.

२०१७ मध्ये आमिर अली हाजिद्दाहच्या रिव्हॉल्यूशनरी गार्ड ऑफिसरने टिप्पणी करून सैन्याची तक्रार करताना म्हटले होते की, सरकारमध्ये सामील असलेले काही लोक स्पेस लाँच रॉकेट वर काम करत आहेत जे लाँचिंगसाठी तयार आहे. मात्र ते अमेरिकेच्या भीतीने स्टोअरमध्ये लपवून ठेवले आहे. त्यावर तेव्हा आम्ही विश्वास ठेवला नाही.

मात्र ट्रंप आण्विक करारातून बाहेर पडल्यानंतर जेद्दाह सारखे हार्डलाइनर हा आण्विक कार्यक्रम पुन्हा चालू करण्यात यावा यासाठी दबाव आणू शकतात आणि तशीही परिस्थिती बदलली आहे, करण आता इराणवर कसलाही प्रतिबंध राहिलेला नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version