पेट्रोल, डिझेल स्वस्त दरात भरून घेण्यासाठी ‘ह्या’ ४ युक्त्या आजमावून बघाच!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
भारताची अर्थव्यवस्था सद्यस्थितीत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. आपल्या अर्थव्यवस्थेला कच्च्या तेलाचे भाव आणि त्यामुळे होणारा खर्च, हा सर्वात मोठा खर्च आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात असलेल्या भाजपा सरकारने, सामान्य माणसाला विकल्या जाणाऱ्या डिझेल पेट्रोलच्या किमती आता दर पंधरा दिवसांना बदलत ठेवण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला.
हे बदलणारे भाव आपल्या देशासाठी ही अत्यंत आवश्यक आहेत, परंतु तुम्हा-आम्हा सारख्या सामान्य जनतेला मात्र या सतत चढ-उतार होणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या भावांनी मात्र हैराण केले आहे..
गेल्या ३ महिन्यांपासून कोरोनाचा कहर सगळीकडेच वाढतो आहे, भारतापासून कित्येक बलाढ्य देश आणि त्यांचं अर्थचक्र लॉकडाऊन मध्ये आहे!
भारतात आता अनलॉक म्हणजेच हळू हळू अर्थचक्राला चालना द्यायला सुरुवात झाली आहे, याचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या किमतीवर सुद्धा झालेला आपल्याला दिसतोय!
पहिले २ लॉकडाऊन सामान्य नागरिकांना पेट्रोल डिझेल मिळतही नव्हते, आता ते सामान्य लोकांना मिळायला लागले आहे पण त्यातच पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्याचे कानावर आले आहे!
सध्या मुंबईत पेट्रोलचा भाव ७८.६१ रुपये आहे. तर राजधानी दिल्लीत ७१.८१ रुपये आहे.
जर तुम्हाला या वाढत्या किंमती पासून होणारा त्रास सुसह्य करायचा असेल तर तुम्हाला खालील कृतींचा अवलंब करावा लागेल. या कृतींचा अवलंब केल्यावर तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळू शकतो.
अर्थातच तो जास्त नसला तरी समाधानकारक तरी आहे.
१) तेल वितरण कंपनीच्या ऑफर :
जर तुम्ही रोज पेट्रोल डिझेल गाडीत टाकत असाल अथवा तुमच्या वाहनांमुळे इंधनाचा जास्त खप होत असेल तर तुम्ही तेलवितरण कंपनीच्या ऑफर्स वर लक्ष ठेवलं पाहिजे.
इंडियन ऑइल कंपनी अतिरिक्त रिवार्डसच्या नावाने लॉयल्टी प्रोग्राम चालवत आहे. यातून पेट्रोलियम फ्लिट ऑनर्स ला रिवार्ड दिला जाणार आहे.
या ऑफर्स बद्दल अधिक माहिती घेऊन तुम्ही फायदा उचलू शकतात.
२ ) डेबिट आणि क्रेडिट कार्ड चा वापर :
सध्या पंतप्रधान आणि त्यांचे सरकार एका शब्दावर नेहमीच भर देताना तुम्हाला दिसतील तो म्हणजे ‘कॅशलेस’! म्हणजेच कार्ड पेमेंट!
कार्ड ने पैसे भरण केंव्हाही सोईचं असून उगाचच नको तितकी कॅश बाळगण्यापासून मुक्तता झाली!
डेबिट आणि क्रेडीट कार्ड चा वापर करून इंधनावर सवलत मिळवता येऊ शकते. फ्युएल सरचार्जच्या रुपात त्याला सूट दिली आहे.
याव्यतिरिक्त अनेक बँकांमध्ये इंधन खरेदीसाठी स्पेशल कार्डस सादर करण्यात आले आहेत.
यांचा वापरावर डिस्काउंट देखील मिळत आहे. तब्बल ०.७५ पैश्याचा डिस्काउंट मिळणार आहे. पण यासाठी कॅशलेस व्यवहार करणे आवश्यक आहे.
३ ) मोबाइल वॉलेटचा वापर करू शकतो :
पेटीएम करो ही टॅग लाइन तुम्ही बऱ्याच जाहिरातींमध्ये तसेच टीव्ही वर ऐकली असेल, पेटीएम हे आजवरच सर्वात सोप्पं मोबाइल वॉलेट असून त्याचा वापर अगदी कोणालाही करता येतो!
ह्या पेटीएम मधून पेमेंट केल्याने तुम्हाला बऱ्याचदा कॅशबॅक सुद्धा मिळते तसेच तरतऱ्हेची सूट, डिसकाऊंट कूपन वगैरे यावरून तुम्हाला मिळू शकतं!
एका अर्थी ह्या मार्गाने पैसे भरणं म्हणजे एक प्रकारे पैसे कमावणेच आहे!
आपल्या माहितीसाठी मोबीक्विक मोबाईल वॉलेटच्या वापर केल्यावर पेट्रोल डिझेल वर १०% ची घसघशीत सूट तुम्ही मिळवू शकतात. ही सूट सुपर कॅशचा स्वरूपात मिळणार आहे.
यामध्ये कमीतकमी ५० रुपयाचा पेट्रोलची खरेदी अनिवार्य आहे. सुपर कॅश मधल्या ५% चा वापर इंधन खरेदी साठी करू शकतात.
४ ) भीम अँप :
फोन वॉलेटचाच आणखीन एक प्रकार म्हणजे भीम यूपिआय.. ह्याच्या मदतीने अगदी भीम, गुगल पे, फोन पे अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून तसेच त्यांच्या स्वतंत्र वॉलेट मधून तुम्ही पेमेंट करू शकता!
भीम अँप प्रत्येक महिन्याला ७५० रुपयांपर्यंत कॅशबॅक देते. जास्तीतजास्त transaction साठी प्रोहोत्सहित करण्यासाठी ही योजना आहे.
हे अँप डाउनलोड केल्यावर पहिल्या वेळच्या पेट्रोल खरेदीवर ५१ रुपये कॅशबॅक मिळते.
तर या काही क्लुप्त्या वापरून तुम्ही पेट्रोल व डिझेल भाववाढीच्या भडक्या पासून काही प्रमाणात का होईना स्वतःला वाचवू शकतात. या साध्या सोप्या युक्त्या तुम्ही स्वतःही वापरा आणि तुमच्या खूप खर्च करणाऱ्या मित्रांना तर नक्की सांगा.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.