Site icon InMarathi

आपल्या मुलांबरोबर शाळेत शिकण्यासाठी जाणाऱ्या अपंग सुनीताची प्रेरणादायी कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अनेक लोक आयुष्यात अत्यंत प्रेरणादायी असं कार्य करतात, अत्यंत कठीण परिस्थिती, अनंत अडचणींचा सामना करत ही लोक यशोशिखर गाठतात आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान होऊन जातात.

असंच काहीसं प्रेरणादायी कार्य केलं आहे सुनीता नावाच्या स्त्रीने जी इतर स्त्रियांसाठी प्रेरणा बनली आहे. दोन मुलांची आई असलेल्या व शारीरिक दृष्ट्या दिव्यांग असलेल्या सुनीताने हरियाणा बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले होते.

आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं, की अभ्यासाच वय नसतं आणि शर्थीचे प्रयत्न केल्यास कुठल्याही क्षेत्रात यशप्राप्ती होतच असते.

गोरखपूर या अत्यंत छोटयाशा व कमी वस्तीच्या गावात राहणाऱ्या २७ वर्षीय दिव्यांग सुनीताने दोन मुलांचा सांभाळ करत बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. तिला बोर्डाच्या परीक्षेत ८५ % गुण मिळाले होते.

सुनीताचा नवरा हा एक मजूर आहे व घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे, अश्यातही मेहनतीच्या बळावर यशश्री मिळवली आहे. यासाठी तिच्या पतीने तिला साथ दिली आणि पाठबळ ही दिलं आहे.

 

सुनीताने ज्ञानार्जन त्याच शाळेत केलं ज्यात तिचे मुलं शिकताय. ती त्यांचासोबतच त्या शाळेत शिकायला जात होती. सुनीताच शालेय शिक्षण पूर्ण झालं असून आता ती महाविद्यालयात प्रवेश घेणार आहे. सुनीताच अध्यापिका व्हायचं स्वप्न आहे, ज्या साठी ती कठोर परिश्रम घेत आहे.

सुनीताचा मुलगा डेव्हिड तिसऱ्या इयत्तेत आहे आणि मुलगी जेविका सहावी ला आहे. सुनीता दिव्यांग असल्यामुळे दूरपर्यंत चालत जायला असमर्थ होती.

याबरोबरच घरकामाचा व्याप ही तिलाच करायचा होता. अश्यावेळी न डगमगता ती संघर्ष करत राहिली आणि आज तिने मिळवलेल्या यशाचे सर्वदूर कौतूक होत आहे.

सुनीता चालता येत नव्हते, शाळा घरापासून तीन किमी लांब होती. अश्यावेळी तिचा नवरा रामचंद्र दोन्ही मुलं आणि सुनीताला रोज शाळेत सोडायला जात होता आणि शाळा सुटल्यावर परत ही घेऊन यायचा.

 

रामचंद्रची आर्थिक स्तिथी खूप बेताची आहे, तो मजुरी करून आपलं आणि आपल्या परिवाराचे पोट भरतो आहे. त्याचाकडे असलेल्या एक एकर जमिनीवर तो स्वतःच पोट भरू शकेल इतकं धान्य तो पिकवतो. सुनीता ही शाळेनंतर घरकाम करायची आणि मुलांना देखील शिकवायची.

शाळेत असलेल्या कडक शिस्तीमुळे आणि नियमांमुळे व त्याच काटेकोर पालन करायचा असलेल्या कटाक्षामुळे सुनीताचे मुलं तिला शाळेत आई न म्हणता, नावाने हाक मारायचे. यामुळे शाळेतील इतर मुलांना नाही कळायचे की सुनीताचा आणि दोन्ही मुलांचा काय संबंध आहे.

 

सुनीता बालपणापासून हुशार होती परंतु तिच्या माहेरी तिच्या आकांक्षांचा बळी घेण्यात आला व तिला सातवीपर्यंतच शिकता आलं. तिने लग्न केल्यानंतर तिने आठवीपासून बारावीपर्यंतच शिक्षण घेतलं आहे.

आज ती प्राध्यापिका होण्याचा तिच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. या कामात तिचा पती तिला पुरेपूर मदत करत आहे.

या सुनीताच्या संघर्षावरून एक गोष्ट लक्षात येते की सुनीता ने जे हे यश मिळवले आहे तसं यश जिद्दीने व मेहनतीने समाजातील इतर स्त्रिया ही मिळवु शकतात. यासाठी कुटुंब आणि मुलंबाळं यांचा अडसर कधीच नसतो. फक्त मनात जिद्द हवी, कष्ट करण्याची तयारी हवी आणि प्रचंड आत्मविश्वास हवा.

 

अनेक महिलांकडे हा आत्मविश्वास आधीपासून असतो त्या महिला त्या आत्मविश्वासाचा बळावर कुठलंही शिखर पदाक्रांत करू शकतात. फक्त त्यांना गरज असते पाठिंब्याची, एका खंबीर पाठिंब्याची.

आज सुनीताला तिचा पती रामचंद्राने दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनांमुळे तिची वाट सुकर झाली आहे. जर समाजातील प्रत्येक पुरुषाने आपले आदिम विचार त्यागून आपल्या अर्धांगिनीला समान दर्जा देण्याचा व तिच्या आकांशाना पाठबळ देण्याचा प्रयत्न केला तर महिला यशाच्या आकाशात उंच भरारी घेऊ शकतात.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version