Site icon InMarathi

इतिहासात असं एक गाणं होऊन गेल जे ऐकून, लोक चक्क आत्महत्या करायचे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गाणी ऐकायला आपल्याला सर्वांनाच आवडतात. ते आपला मूड फ्रेश करतात आपल्याला आनंदी ठेवतात. काही गाणी अशी असतात जी आपली अगदी फेवरेट झालेली असतात. ती आपण नेहेमी ऐकत असतो.

पण तुम्ही कधी अश्या कुठल्या गाण्याबद्दल ऐकले आहे का जे ऐकून लोक आत्महत्या करतात? तुम्हाला वाटेल की असं थोडी ना होतं. म्हणजे कुठलं गाण ऐकून कोणी आत्महत्या का करेल.

तुमच्या म्हणण्यानुसार आत्महत्या करणारी व्यक्ती ही पुर्णपणे नैराश्यग्रस्त असते, अनेक समस्यांशी सामना करून हार पत्करलेली व्यक्तीच आत्महत्या करते. मग गाणी ऐकणारा, एन्जॉय करणारा माणूस अचानक आत्महत्या कशी करेल?

तुम्हाला असे असंख्य प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, पण त्याची उत्तरं मिळवायची असतील तर इतिहासात डोकावणं गरजेचं आहे.

इतिहासात एक असं गाणं होवून गेलं ज्याने अनेकांच जीव घेतला. थोडं विचित्र वाटत असलं तरीही हे खरं आहे.असं एक गाणं आहे ज्यावर मागील ६३ वर्षांपासून बॅन आहे. कारण हे गाण ऐकून लोक आश्चर्यकारक पद्धतीने आत्महत्या करायला लागले.

 

हे ही वाचा – एका शिक्षकाने ‘अवघ्या काही तासात’ लिहिलं गाणं: जे भारताला ‘स्वच्छतेची’ सवय लावतंय

अर्थात यापैकी कोणत्याही व्यक्तीने गाण्याच्या गायकाला, संगीतकाराला प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं, तरीही त्या गाण्याने त्यांना आत्महत्या करायला भाग पाडलं.

हे असं कोणतं गाणं आहे? त्याने लोकांवर काय जादु केली? पाहुयात…

‘Rezso Seress’ जे हंगेरी येथे राहणारे होते. ह्यांनी १९३३ साली ‘सॅड सण्डे’ नावाचं एक गाण बनवलं. ह्या गाण्यात एवढी दयनीयता, एवढे दुख होते की, ह्या गाण्याला जो एकदा ऐकेल त्याला त्याच्या आयुष्यातील सर्व दुख आठवायला लागतात.त्यामुळे हे गाण एकूण अनेक लोक आत्महत्या करायला लागते.

 

 

हे गाण जसं रिलीज तसं ते लोकांनी डोक्यावर घेतलं. हे गाण लोकांच्या खूप पसंतीस पडलं. हे एक दुखी गाण होतं. म्हणूनच ह्या गाण्याला ‘सर्वात दुखी’ गाण म्हटल्या गेलं.

 

 

ह्या गाण्याला ऐकल्यावर आत्महत्या करणाचा सर्वात पहिली केस ही बर्लिनमध्ये समोर आला. जेव्हा एका मुलाने हे गाण ऐकल्यावर स्वतःला गोळीमारून घेतली.

ह्याव्यतिरिक्त न्युयॉर्क मध्येदेखील एका वृद्धाने ७ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. तर हंगेरी येथील १७ वर्षीय एका मुलीने हे गाण ऐकून पाण्यात बुडून आपले जीवन संपवले.

ह्या गाण्याचे लिरिक्स एवढे दुखद आहेत जो कोणी हे गाण ऐकेल तो दुखी होऊन जाईल, भावूक होऊन जाईल.

तर बघितलत एक गाण काय काय करू शकते. म्हणून नेहेमी मनोरंजनाला मनोरंजा प्रमाणेच घ्यावे. जेणेकरून असे अपघात होण्यापासून टाळले जातात.

===

हे ही वाचा – रात्रीच्या वेळेस जुहू बीचवर सिगरेट बॉक्सवर लिहिलं गेलं देव आनंदच “ते” सुप्रसिद्ध गाणं

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version