“गाणी ऐकण्याचे” हे फायदे तुम्हाला एकदम फिट राहण्यास मदत करतील..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आजकालचं जीवन आणि जीवनशैली ही अतिशय जलद आणि तेवढीच आधुनिक झाली आहे. म्हणूनच ती अनेकांना आवडते देखील, कारण ह्यामुळे आपल्याला अधिक चांगल्या सुख-सोयी उपलब्ध झाल्या आहेत.
पण ह्या जीवनशैलीचे जेवढे फायदे आहेत तेवढेच नुकसानही आहे. आपल्याही नकळत अनके छोट्या गोष्टींचा ताण आपल्यावर येत असतो. या ताणाचे योग्य नियोजन करण्यासाठी आपल्या शांततेची गरज असते. जर, या ताणतणावाचे आपण योग्य नियोजन केले नाही तर, आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागु शकतो.
अशात मग थोडं बरं वाटावं म्हणून लोक वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. ताणावर मात करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळा छंद निवडतो. पण महागड्या खर्चिक उपायांपेक्षा एका क्लिकवर उपलब्ध होणारे संगीत ऐकणं केव्हाही चांगलचं, कारण तुमच्या मनावरील ताण घालविणारं हे संगीत तुम्हाला शारिरीक, मानसिकदृष्ट्याही फिट राहखण्यास मदत करत आहे.

तुम्हाला माहीत नसेल पण संगीत हे एका हिलिंग एजंट प्रमाणे काम करतं. कुठलही संगीत ऐकल्यावर आपल्याला एका वेगळ्याच प्रकारची संतुष्टी मिळते. पण हेच संगीत तुमच्या शरीरासाठी देखील तेवढंच फायद्याचं ठरू शकतं. कसं ते आम्ही सांगतो…
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
संगीत आपला मूड फ्रेश करतं :

आपलं आवडतं संगीत ऐकल की आपल्याला छान वाटत. आतून आपण फ्रेश आणि आनंदी असतो. हे तणाव कमी करण्यासाठी देखील खूप फायद्याचं ठरते. पण मूड फ्रेश करण्यासाठी त्याप्रकारच संगीत ऐकणे गरजेचं असते.
अमेरिकेच्या कंसास मेडिकल सेंटरने एका संशोधनादरम्यान असं समोर आले की, संगीतामुळे मन आणि मेंदू ह्यावर खूप सकारात्मक प्रभाव टाकतो.
–
- या ५ गोष्टी दाखवून देतात, तुम्ही मानसिकरित्या एकदम फिट आहात!
- एकदम झकास-फिट राहण्याचा, जगातला “एक नंबर”चा, अतिशय सोपा उपाय…
–
ब्लडप्रेशरला नियंत्रित करतं :

अमेरिकन सोसायटी ऑफ हायपरटेन्शननुसार जर हायब्लडप्रेशर असलेली व्यक्ती रोज सकाळ-सायंकाळ संगीत ऐकत असेल तर त्यांच ब्लडप्रेशर सामान्य होऊन जाईल.
हृदयाला स्वस्थ ठेवण्याचं काम करतं :

गोड संगीत हे हृदयाचा ठोके सामान्य करण्याचं काम करतात. ह्याने श्वसनासंबंधी असलेले आजार देखील बरे होऊ शकतात. त्यासोबत अर्थरायटिस, ऑस्टियोपरोसिस सारख्या आजारात जरा मदत होते. संगीत ऐकल्याने शरीरात एंडोर्फिन हार्मोन्सची उत्पत्ती होते ज्यामुळे त्रास कमी होण्यास मदत होते.
मेंदूसाठी फायद्याचं आहे :

स्मरणशक्ती वाढते :
कितीही वेळा वाचलं तरी काही गोष्टी लक्षातच राहत नाही असं तुमच्याबाबतीत होतं का? ही स्वाभाविक गोष्ट आहे. पुस्तकापेक्षा एखादं गाणं आपल्या चटकन लक्षात राहतं.
संशोधनाने ही गोष्ट सिद्ध झाली आहे की, संगीतामुळे आपली स्मरणशक्ती वाढते.
संगीत हे सर्वात जास्त मेंदूसाठी फायदेशीर असते. संशोधन सांगतं की, स्ट्रोक आल्यावर क्लासिकल संगीत ऐकल्यावर लोक लवकर रिकव्हर होतात. ह्यामुळे मेंदू अधिक गतीने चालायला लागतो आणि स्थिती सुधारायला लागते. ह्यामुळे मायग्रेनच्या त्रासात देखील फायदेशीर ठरू शकते. त्यासोबतच तणावातून मुक्त होण्यासाठी देखील तुम्ही संगीत ऐकू शकता.
रहा फिट :
तासनतास जीममध्ये व्यायम करत त्यानंतर डाएट करूनही अनेकांचे वजन आटोक्यात येत नाही. स्थुलत्व असो वा रक्तदाबासारखा आजार, डॉक्टरांकडून व्यायमाचा सल्ला हल्ली सर्वांनाच दिला जातो.
अशावेळी घाम गाळणारा व्यायाम अनेकांना कष्टाचा वाटतो. मात्र या व्यायामाला संगीताची जोड दिली तर मजा येईल का ?
गाण्याच्या ठेक्यावर थिरकणं ही नैसर्गिक क्रिया आपोआपच होते, नृत्य हा प्रभावी आणि सोपा फिटनेस मार्ग आहे, त्यामुळे घरात संगीताच्या ठेक्यावर मनसोक्त नृत्य करत असाल, तर नैराश्य दुर होईलचं पण आपोआप व्यायामही साधला जाईल.

–
- लिंबू-पाणी प्यायल्याने खरंच एकदम झकास फिट होता येतं? यामागचं तथ्य जाणून घ्या!
- केळीच्या सालीचे ‘हे’ १० फायदे वाचल्यावर तुम्ही साल कधीही फेकणार नाही!
–
सकारात्मकता वाढते :
मन चंगा तो कटोती मे गंगा असं म्हटलं जातं. तुमचा मुड फ्रेश असेल, मनात उत्साह असेल, तुमचं कोणतही काम अपय़शी होणार नाही.
तुमच्यातील ही सकारात्मकता वाढवायला संगीत मदत करतं. दररोज सकाळी अथवा रात्री झोपताना काही काळासाठी तुम्हाला आवडणारा संगीताचा कोणताही प्रकार ऐकला तर मन उत्साही झाल्याचा अनुभव तुम्हाला हमखास घेता येईल.
मॉर्निंग वॉकला जाताना अथवा रात्री शतपावली करताना किंवा प्रवासादरम्यानही संगीत ऐकलंत तर निश्चितच पुढील अनेक तास तुम्ही ताजेतवाने असाल.
गरोदर माता तसेच लहान मुले यांनाही संगीत ऐकविल्यास त्यांचीही प्रकृती सुदृढ राहते, तसेच मुडही फ्रेश राहतो.

त्यामुळे दिवसभरात कितीही अडचणी आल्या, निराशा, ताण यांनी घेराव घातला, तरी संगीतामुळे फ्रेश झालेले तुमचे मन तुम्हाला त्यातून मार्ग काढण्याची उर्जा नक्कीचं देईल.
शांत झोप येईल :
झोप येत नसल्याची तक्रार अनेकांकडून केली जाते. काही वर्षापुर्वीपर्यंत ही समस्या केवळ ज्येष्ठ नागरिकांकडून मांडली जात असली तरी आता मात्र सगळ्याच वयोगटांतील व्यक्ती अपु-या झोपेचे दुःख मांडतात.
तुम्हालाही वेळेत झोप येत नाही ? अपु-या झोपेमुळे पुढील दिवस कंटाळवाणा वाटतो ? मग रात्री झोपण्यापुर्वी सॉफ्ट म्युझिक ऐकाचं.

मनोरंजन म्हणून ऐकले जाणारे हे संगीत आरोग्यासाठी किती महत्वाचे असते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे झोप.
शास्त्रिय , उपशास्त्रिय किंवा इतरं कोणत्याही प्रकारचं सॉफ्ट म्युझिक ऐकण्याची सवय ही कोणत्याही औषधापेक्षा निश्चित सोपी आहे.
त्यामुळे संगीत ऐकत राहा आणि तणावातून, आजारातून मुक्तता मिळवा.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.