Site icon InMarathi

आयफोनने चक्क कॉपी केलेत अँड्रॉइड स्मार्टफोनचे हे पाच फीचर्स..!

apple inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

कितीतरी वेळेस आयफोन यूजर्स असं म्हणतात की, आयफोनचे फीचर्स सगळ्यात भारी असतात. एकदा आयफोन वापरला की दुसरा फोन हातात घ्यावसाच वाटत नाही, पण तुम्ही आपले अँड्रॉइड फोन वापरत असता. त्यामुळे तुम्हाला काहीच बोलता येत नाही.

पण तुम्हाला माहितीये का की, आयफोनचे पुढे सांगितलेले पाच फीचर्स हे मुळात आयफोनचे नसून ते ऍपल आयफोनने अँड्रॉइड स्मार्ट फोनकडून कालांतराने adopt केलेत.

चकित झालात ना ? आयफोन आणि कॉपी ? कसं शक्य आहे असं तुम्हाला वाटत असेल. पण OLED डिस्प्ले, फुल व्ह्यू डिस्प्ले, वॉटर रेझिस्टन्स असे काही फीचर्स ऍप्पलने अँड्रॉइड स्मार्टफोनच्या नंतर आपल्या मोबाईलमध्ये वापरण्यास सुरुवात केली. पाहूयात कोणते आहेत हे adopted फीचर्स !

 

9to5google.com

 

OLED डिस्प्ले :

ऍपलने इतर कंपन्यांच्या तुलनेत OLED डिस्प्लेचा वापर उशीराने चालू केला. यामुळे ऍपलचे डिव्हाइस तुलनेने महाग असत. साल २०१० मध्ये OLED डिस्प्लेचा उपयोग करायची सुरुवात सॅमसंग कंपनीने केली होती. तब्बल आठ वर्षानंतर हल्लीच ऍपलने OLED डिस्प्लेचा वापर आपल्या मोबाईलमध्ये करण्यास सुरुवात केली आहे.

 

androidauthority.com

 

आजच्या काळात बहुतेक सगळ्याच कंपन्या OLED डिस्प्ले वापरत आहेत.पण याचा सर्वप्रथम उपयोग वन प्लस, एलजी, एचटीसी, गूगल नेक्सस आणि सॅमसंग यांसारख्या अँड्रॉइड कंपन्यांनी करायला सुरुवात केली होती.

 

वायरलेस चार्जिंग :

ओलेड डिस्प्लेसारखाच वायरलेस चार्जिंगचा वापर करायला सुद्धा ऍपलने खूप नंतर सुरुवात केली. वायरलेस चार्जिंगचा उपयोग सर्वप्रथम ‘नेक्सस 4’ या स्मार्टफोनमध्ये केला गेला होता. त्यानंतर सॅमसंगच्या सर्व फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंग दिले जाऊ लागले.

 

thedroidguy.com

 

वॉटर रेसिस्टंट :

सोनी ही सगळ्यात पहिली स्मार्टफोन कंपनी होती ज्यात वॉटर रेसिस्टंट आणि डस्टप्रुफ ही फीचर्स देण्यात आली होती. सॅमसंगने २०१४ सालापासून आपल्या फ्लॅगशिप फोनमध्ये हे फीचर देण्यास सुरुवात केली. वॉटर रेसिस्टंट हे एक असं फीचर होतं ज्याची आयफोनच्या यूजर्सनी सगळ्यात जास्त मागणी केली होती.

 

cultofandroid.com

 

साल २०१६ मध्ये अखेर ऍपलच्या आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस मध्ये वॉटर रेसिस्टंट हे फीचर घेण्यात आले.

 

फूल व्ह्यू डिस्प्ले :

आयफोन एक्स च्या आधी आयफोन आपल्या फोनमध्ये बेजल-लेस डिस्प्ले देत नसे. बेजल लेस डिस्प्ले याचा अर्थ असा की हा डिस्प्ले स्मार्टफोनच्या फ्रंट बाजूला पुर्णपणे व्यापून टाकतो. ज्यामुळे स्मार्टफोनला एक अट्रॅक्टिव लुक मिळतो.

फोनच्या बॉर्डर्स कमी होतात. आणि मोबाईलचा आकार न वाढता मोठ्या स्क्रीनचा लाभ घेता येतो.

 

pocketnow.com

 

आयफोन 6 आणि 6 प्लस पासून आयफोन 8 और आयफोन 8 प्लस पर्यंत कंपनीने बेजल लेस डिस्प्लेचा वापर केला आहे. शाओमी ही पहिली अशी कंपनी होती जिने २०१६ साली आपल्या मी मिक्स फोनमध्ये एज-टू-एज डिस्प्लेचा वापर सर्वप्रथम केला होता.

 

Hey Siri व्हॉइस असिस्टंट :

आयफोनचा Hey Siri सर्वांत लोकप्रिय फीचर्सपैकी एक आहे. युजर्स फक्त एका व्हॉइस कमांडद्वारा फोन हातात न घेता कित्येक कामे करू शकतात. हे फीचर २०१३ साली ‘मोटो एक्स’ या फोनमध्ये सर्वप्रथम वापरण्यात आले.

 

xda-developers.com

 

हा पहिला असा फोन होता जो Ok Google Now असे म्हटल्यावर तुमचा आवाज ओळखू शकत असे आणि तुमच्या सूचनांचे पालन करीत असे.

त्यामुळे तुम्ही अँड्रॉइड फोन वापरता म्हणून अजिबात खट्टू होऊ नका. कारण काही बाबतीत तुमचा अँड्रॉइड फोन ऍपलचा बाप आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version