Site icon InMarathi

या प्रथितयश कंपन्यांच्या लोगोमध्ये सुद्धा त्यांच्या यशाचं रहस्य दडलंय !

amazon-logo-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एखाद्या मोठ्या कंपनीची ओळख असतो त्या कंपनीचा लोगो… त्या कंपनीचं मानचिन्ह आणि त्या कंपनीचं ब्रीदवाक्य, कंपनीच्या लोगोला व टॅग लाईनला मार्केटिंग क्षेत्रात प्रचंड महत्त्व आहे.

एखाद्या कंपनीचा ब्रँड होण्यासाठी लोगोची गरज असतेच. जर आपण एखादी कार खरेदी करायला गेलो तर त्या कारवर असलेल्या कंपनीच्या लोगोवरून त्या कारचे मूल्य ठरते. त्या लोगोवरून त्या कारच्या कंपनीचा व त्या कंपनीच्या विश्वासहार्यतेची कल्पना येते.

आज आम्ही तुम्हाला या मोठंमोठाल्या ब्रँड्सच्या लोगोजच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहोत.

१. Amazon –

अमेझॉन जगातील सर्वात मोठी ऑनलाइन बाजारपेठ आहे. अमेझॉन ही प्रचंड मोठी आर्थिक ताकद असलेली व कोटीचे share स्वतःच्या नावावर असलेली कंपनी आहे. Amazon चा लोगो देखील नावाप्रमाणेच आकर्षक आहे.

A आणि Z मध्ये असलेला Arrow दर्शवतो की अमेझॉनवर जगातील A पासून Z पर्यंत सर्व गोष्टी उपलब्ध आहेत.

 

 

२)Baskins Robbins –

Baskins Robbins हे जगप्रसिद्ध केकशॉप आहे. ज्याठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे केक, पेस्ट्रीज आणि आईस्क्रीम उपलब्ध असतात.

जर आपण Baskin Robbins च्या BR मधल्या डार्क पिंक सर्कलला लक्ष देऊन बघितलं तर आपल्याला ३१ हा अंक त्यात दिसतो. तर ३१ हा अंक दर्शवतो की Baskins Robbins मध्ये ३१ प्रकारचे आईस्क्रीम फ्लेवर्स उपलब्ध आहेत.

 

 

३)Goodwill –

Goodwill ही अमेरिका स्थित एक ‘ना फायदा ना तोटा’ या तत्वावर काम करणारी एक संस्था आहे. जी लोकांना नोकरी आणि काम देते. Goodwill मध्ये गरीब व अशिक्षित लोकांना स्वतःची कमाई करण्याची संधी भेटत असते.

Goodwill चा लोगो देखील तिच्या कामाप्रमाणेच आहे. जर आपण लोगो मधील G कडे लक्षपूर्वक बघितलं तर आपल्याला स्मितहास्य करणारा स्माईली फेस दिसेल. जो Goodwill कडून लाखो लोकांच्या चेहऱ्यावर नोकरी देऊन स्मितहास्य आणण्याचे प्रतिक आहे.

 

 

४) Hope For African Children Initiative –

ही एक सामाजिक संघटना असून आफ्रिकेतील मुलांच्या कल्याणासाठी कार्य करते व त्या मुलांना चांगले आरोग्य, शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करते. यांचा Logo मध्ये आफ्रिकन माहाद्वीपाची प्रतिकृती दिसते.

याबरोबरच हा लोगो जर अजून बारकाईने बघितला, तर या लोगोमध्ये डाव्याबाजूला एक लहान मुलगा आणि उजव्या बाजूला एका वयस्कर माणसाचं ओझरतं रूप दिसेल.

 

 

५) Pinterest –

Pinterest ही एक वेबसाईट आहे ज्यावर आपल्याला हवी ती माहिती उपलब्ध आहे. Pinterest च्या लोगोकडे जर लक्षपूर्वक बघितलं तर त्यातील P हा एका बोर्ड पिन प्रमाणे दिसतो ज्याचा अर्थ होतो की इथे तुम्हाला हवं ते उपलब्ध आहे.

 

 

६) Spartan Golf Club –

नावाप्रमाणेच Spartan Golf Club हे खूप मोठं Golf Club असून जगात त्याचा विविध शाखा आहेत . Golf या प्रसिद्ध खेळासाठी ते सुयोग्य ग्राउंड तयार करतात व तिथे अनेक लोक गोल्फची तयारी करतात.

तर आपण जेव्हा Spartan Golf Club च्या लोगो कडे बारकाईने बघतो तेव्हा त्यात एका “ग्रीक स्पार्टन” सैनिकाची प्रतिकृती दिसून येते.

 

 

७) Sony VAIO –

Sony VAIO हा Sony कंपनीचा लॅपटॉप क्षेत्रातील ब्रँड असून, VAIO सिरीजच्या लॅपटॉपला जगभर मागणी आहे. Sony VAIO च्या लोगोमध्ये पण एक वैशिष्ट्य आहे. यात Sony VAIO मध्ये VA हे इनलोग वेव्ह चे तर IO मध्ये डिजिटल वेव्ह चे दर्शक आहेत.

 

 

अश्याप्रकारे आज आपण विविध कंपनी व संस्था आणि त्यांचा लोगोचे महत्व जाणून घेतले, जर तुम्हाला आजून कुठल्या लोगोची माहीती असेल तर ती नक्की कंमेंट बॉक्समध्ये द्या.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version