' ‘गुगल’च्या निर्मितीसाठी या भारतीय व्यक्तीने दिलेलं योगदान कुणालाच ठाऊक नाही! – InMarathi

‘गुगल’च्या निर्मितीसाठी या भारतीय व्यक्तीने दिलेलं योगदान कुणालाच ठाऊक नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – विशाल दळवी

===

गुगल हे सर्च इंजिन जगासमोर आलं आणि जगात क्रांतीचं नवं पर्व सुरु झालं. कोणतीही गोष्ट सर्च करा गुगल तुम्हाला कधीही निराश करणार नाही. आज प्रत्येक घडीला गुगल कामी येतं, पूर्वी काहीही अडचण आली की थोरा मोठ्यांचा सल्ला घ्यावा लागायचा, पण सध्या त्यांची जागा गुगलने घेतलीये.

फक्त नाव टाईप करायची खोटी की गुगलने  suggestions द्यायला सुरुवात केलीच समजा. माहितीचं प्रचंड मोठं विश्व आपल्यासमोर उभं करणाऱ्या या गुगलच्या स्थापनेमध्ये एका भारतीयाचा देखील समावेश आहे ही गोष्ट मात्र फारच कमी लोकांना ठावूक आहे.

आजवर जगात जेवढे शोध लागले वा जेवढ्या ऐतिहासिक क्रांत्या झाल्या (मनुष्याच्या भल्यासाठीच!) त्यापैकी बहुतांश गोष्टींमध्ये कोठे ना कोठे तरी एखाद्या भारतीयाचा हात आहेच. गुगलने तंत्रज्ञान क्षेत्रात घडवलेल्या सर्वात मोठ्या क्रांतीमध्ये देखील एखाद्या भारतीयाचे अस्तित्व नसेल तर नवलंच!

 

google-inmarathi

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट खरी आहे की ‘राम श्रीराम’ हा व्यक्ती नसता तर गुगल तयारच झाले नसते!

गुगल स्थापन करणारी जोडगोळी म्हणजेच ‘लेरी पेज आणि सर्जी बिन’ यांच्या मनात काहीतरी नवं करण्याचा विचार सुरु होता. अवघ्या २० वर्षांच्या या पोरांना जगामध्ये धमाका करेल अशी काहीतरी गोष्ट निर्माण करायची होती. तेव्हा त्यांना संकल्पना गवसली एक सर्च इंजिन निर्माण करण्याची..!

हे ही वाचा Googleच्या CEO सुंदर पिचैंनी सांगितले यशाचे ५ मंत्र

या सर्च इंजिनवरून लोकांना जगातील प्रत्येक माहिती बसल्या जागेवर मिळवून द्यायची असे त्यांचे उद्दिष्ट होते. त्यांनी ही कल्पना आपल्या प्रोफेसरला दाखवली ज्यांनी या दोघांचा बिझनेस प्लान काही इन्व्हेस्टर्ससमोर सादर केला.

 

Ram_Shriram_3 InMarathi

 

नवीन परंतु बेभरवश्याच्या असणाऱ्या प्लानमध्ये पैसे गुंतवण्यासाठी मात्र बहुतांश इन्व्हेस्टर्सनी नकारच दिला. पण दोघांनी प्रयत्न काही सोडले नाहीत.

दरम्यान त्यांची भेट ‘राम श्रीराम’ यांच्याशी झाली. ‘राम श्रीराम’ यांना देखील त्यांच्या बिझनेस प्लानमध्ये तितका दम वाटला नाही, पण दोन्ही तरुणांचे passion पाहून त्यांनी या प्लानमध्ये पैसे गुंतवण्याचे ठरवले.

 

Ram_Shriram_1 InMarathi

 

‘राम श्रीराम’ यांनी गुगल कंपनीची सुरुवात करण्यासाठी लेरी पेज आणि सर्जी बिन’ यांना ५००,००० डॉलर्सचा चेक दिला. बस्स! मगं काय, दोघा पोरांनी मेहनत घेतली आणि आपण पाहतोच आहोत की गुगल आज भल्यामोठ्या साम्राज्याच्या रुपात उभं आहे.

‘राम श्रीराम’ हे गुगलच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर देखील होते, जेव्हा गुगलचा बिझनेस वाढला तेव्हा निश्चितच त्याचा फायदा ‘राम श्रीराम’ यांना झाला आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचे नाव घेतले जाऊ लागले. आज गुगलचे तब्बल २.८ दशलक्ष शेअर्स त्यांच्या मालकीचे आहेत.

 

ram-shriram-google-founder-marathipizza02

या व्यक्तीबद्दल अजून सांगायचे झाल्यास, या माणसाने ‘जंगली’ कंपनीसाठी देखील कार्यभार सांभाळला होता ही कंपनी पुढे एमेझोनने विकत घेतली. एमेझोनचा कस्टमर बेस ३ दशलक्ष वरून ११ दशलक्ष पर्यंत नेण्यात या व्यक्तीचा मोठा हातभार आहे. त्यांच्या साध्या राहणीमानामुळे ते कधीही प्रसिद्धीच्या झोतात नसतात.

 

Ram_Shriram_2 InMarathi

 

सुंदर पिचाई जेव्हा गुगलचे सीईओ झाले तेव्हा ती बातमी काहीच मिनिटांत संपूर्ण जगभर पसरली होती, परंतु गुगल ज्याच्यामुळे सुरु झाली तो माणूस इतक्या वर्षानंतरही अज्ञात आहे, याच गोष्टीवरून ‘राम श्रीराम’ यांच्या साधेपणाची आणि नम्रपणाची कल्पना येते.

आज ते भारतातील विविध सामाजिक समस्यांसाठी काम करत आहे, विशेषत: शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर त्यांचे सामाजिक कार्य सुरु आहे.

आपल्या भारतीयांची मान अभिमानाने उंचावणारा अजून एक अज्ञात अवलिया

===

हे ही वाचा नक्की वापरुन बघा, सहसा कोणालाही माहित नसलेल्या गुगलच्या या ‘१०’ मजेशीर ट्रिक्स..

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?