आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
दूरचा प्रवास असेलं तर आजकाल लोक जास्तकरून विमानाला पसंती देतात. आता तर लोक आधीपेक्षा मोठ्या प्रमाणात विमान प्रवास करायला लागले आहेत. त्यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार एकावेळी जवळपास दहा लाख लोक विमानाने प्रवास करत असतात.
विमान प्रवास हा इतर प्रवासांच्या साधनांच्या तुलनेत जरी थोडा महाग असला तरी तिथे जास्त चांगल्या सुविधा मिळतात म्हणून लोक विमान प्रवासाला अधिक पसंती मिळतात. पण ज्या विमानात तुम्हाला एवढ्या सर्व सुख-सोयी आणि सुविधा दिल्या जातात त्याचं विमानाचे काही असे सिक्रेट देखील आहेत जे अजूनही आपल्याला माहित नाहीत.
विमानात प्रवासादरम्यान यात्रेकरूंना दिल्या जाणाऱ्या उश्या आणि चादरी ज्या आपल्याला स्वच्छ वाटतात. ते तेवढे स्वच्छ राहत नाहीत. खरेतर अनेकदा त्या उश्या आणि चादरी यात्रेकरूंना रीयुज करायला दिल्या जातात. यात्रेदरम्यान स्वच्छ उश्या आणि चादरी प्रवाश्यांना देणे आवश्यक असतात.
विमानात तुम्हाला तुमचे समान लॉक करण्याची सुविधा नसते. कारण तुमच्या सामानाच्या चेकिंगनंतर त्याला टीएसए लॉक करून दिले जाते. पण ह्याच्या सुरक्षिततेची काहीही शाश्वती नसते. कारण ते लॉक कोणीही उघडू शकतो.
जर तुम्हाला असं वाटतं असेलं की, विमानात सिल्क प्लास्टिकच्या पाकिटात मिळणारे हेडफोन हे अगदी नवीन वाटतात आपल्याला, पण तसं नसून ते देखील वापरलेले असतात. म्हणजे जर हे हेडफोन्स कुठल्या त्वचारोग असलेल्या व्यक्तीने वापरलेले असेलं तर ते आपल्यासाठी किती धोकादायक ठरू शकते. ह्याशिवाय एका व्यक्तीने वापरलेलं हेडफोन्स ह्यामध्ये किती घाण असते ते आपल्याला खूप चांग्ल्याने माहित आहे.
हे तर सर्वांनाच माहित आहे की, बाहेर ज्या वस्तू कमी किमतीत मिळतात त्या विमानात अतिशय महाग किमतीत विकल्या जातात.
विमानात मिळणारी कॉफी बनविण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी हे आपण पिण्यासाठी वापरतो त्या पाण्याएवढही स्वच्छ नसते.
पावसाळ्याच्या दिवसांत पायलट मुद्दाम कठीण लॅंडिंगचा धोका पत्करतात. असे केल्याने रनवेच्या कोटवर गुळगुळीत पृष्ठभागावर लॅंडिंग करणे सोपे होते.
जर तुम्ही फ्लाईट अटेंडेटला टिप दिली तर विमानातील कुठल्याही क्लासमध्ये तुम्हाला फर्स्ट क्लास सारख्या सुविधा मिळू शकतात.
काही पायलट हे उड्डाणादरम्यान झोपतात देखील. कारण विमानाला ऑटो पायलट मोड वर टाकून असं केले जाऊ शकते.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.