' समुद्रमंथनात वापरला गेलेला “मंदराचल पर्वत” सापडला गुजरातजवळील समुद्रात! – InMarathi

समुद्रमंथनात वापरला गेलेला “मंदराचल पर्वत” सापडला गुजरातजवळील समुद्रात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पुराणकथा हे धर्माचे एक महत्त्वाचे अंग असल्यामुळे आणि विशिष्ट समाजाचे धार्मिक विचार हे त्या त्या धर्माच्या पुराणकथांतून व्यक्त होत असल्यामुळे, पुराणकथांचा धर्माशी अत्यंत निकटचा संबंध आहे.

पुराणकथा स्वतः धर्मभावनेतून जन्मलेल्या असतात आणि त्या धर्मभावनेला पुष्टीही जोडतात.

त्याचप्रमाणे, पुराणकथा हा आजपर्यंतच्या विज्ञानयुगपूर्व मानवी संस्कृतीचा एक मूलभूत व अविभाज्य घटक असून त्यांच्या अभ्यासामुळे मानवी संस्कृतीचा इतिहास समजायला मदत होते.

 

shiv puran katha InMarathi

 

वेळोवेळी आपल्याला असे काही पुरावे मिळतात की पौराणिक कथा या काल्पनिक नसून खऱ्या असाव्यात या विचाराला पुष्टी मिळते.

अशाच पुराणकथांपैकी एक म्हणजे महाभारतामध्ये आलेली समुद्रमंथनाची कथा. ती तेथे जनमेजय राजाने वैशंपायन ऋषींना सांगितली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ही कथा ‘अमृतमंथन’ या नावाने इंडोनेशियातल्या जावा बेटात लिहिल्या गेलेल्या ‘हरिविजय’ या काव्यग्रंथात आणि भागवत पुराणातल्या अष्टम स्कंधातील सातव्या अध्यायात आहे.

 

samudra-manthan-inmarathi

 

मेरू नावाच्या एका तेजस्वी पर्वताच्या एका शिखरावर देवतागण एकत्र होऊन अमृतप्राप्तीसाठी चर्चा करत होते. तेव्हा भगवान नारायणांनी देवांना सांगितले,” देवांनी आणि दैत्यांनी (दानवांनी) समुद्रमंथन करावे, त्या मंथनातून अमृतप्राप्ती होईल.”

तेव्हा देवांनी नारायणांच्या सल्ल्यानुसार अकरा सहस्र योजने उंच आणि खोल असलेला मंदार पर्वत उपटून काढण्याचा प्रयत्‍न केला, पण ते शक्य झाले नाही.

तेव्हा देवगण परत भगवान नारायण आणि भगवान ब्रह्मदेवाकडे गेले. आणि तेव्हा त्यांनी शेषनागाला मंदराचल उपटण्यासाठी सांगितले. महाबली शेषनागाने मंदराचल उपटला. सर्व देवगण मंदाराचलासह समुद्रकिनारी गेले.

 

samudramanthan InMarathi

 

समुद्रकिनारी गेल्यावर त्यांनी समुद्रदेवाला सांगितले की,

“आम्ही तुझे मंथन करणार आहोत.”

तेव्हा समुद्रदेव म्हणाले,

“जर तुम्ही मलापण अमृतातील हिस्सा द्याल तरच मी मंथनाचे कष्ट सहन करीन.”

तेव्हा भगवान नारायणांनी कूर्मावतार घेतला आणि मंदार पर्वताला आपल्या पाठीवर घेऊन समुद्रमंथन सुरू झाले. आणि पुढची सुर-असुरांची अमृत आणि विषाची कथा तर सर्वश्रुतच आहे.

samudra-mantha-inmarathi

 

तर सांगायची गोष्ट अशी की, दक्षिण गुजरातच्या समुद्रात समुद्रमंथनाच्या वेळी वापरला गेलेला मंदार पर्वत सापडला आहे आणि वैज्ञानिक पातळ्यांवर त्याच्या सत्यतेबद्दल शोधही घेऊन झालाय.

पिंजरत गावानजीकच्या समुद्रात मिळालेल्या पर्वताचा भाग हा बिहारमधील भागलपुरमध्ये विराजित असलेल्या मूळ मंदार पर्वतासारखा आहे. दोन्ही पर्वतांमधील खडकांत ग्रेनाइटचे अधिक्य आढळले.

सर्वसामान्यपणे समुद्राच्या उदरात सापडणारे पर्वत असे नसतात. सूरतचे पुरातत्वशास्त्रज्ञ मितुल त्रिवेदी यांनी केलेल्या कार्बन चाचणीच्या परिक्षणानंतर हा निष्कर्ष काढला आहे की हा मंदार पर्वताचा भाग आहे.

याला पुष्टी देणारे पुरावेदेखील आता हाती लागत आहेत. समुद्रशास्त्र विभागाने आपल्या वेबसाइटवर ही माहिती सत्य असल्याचे पुरावेदेखील दिले आहेत.

 

द्वारकानगरीचा शोध घेताना मिळाले मंदार शिखर:

सूरतच्या ओलपाडला लागून असलेल्या पिंजरत गावातील समुद्रात १९८८ मध्ये प्राचीन द्वारकानगरीचे अवशेष मिळाले होते. डॉ. एस. आर.राव या ठिकाणी शोधकार्य करत होते.

सूरतचे मितुल त्रिवेदी हे सुद्धा त्यांच्या सोबत होते. विशेष कॅप्सूलमध्ये डॉ. राव यांच्या सोबत मितुल त्रिवेदी सुद्धा समुद्राच्या आत ८०० मीटर इतक्या खोलवर गेले होते. तेव्हा समुद्राच्या उदरात त्यांना एक पर्वत सापडला. या पर्वतावर घासले गेल्याच्या खुणा दिसत होत्या.

समुद्रशास्त्र विभागाने या पर्वताचा बारकाईने अभ्यास करण्यास सुरुवात केली. तेंव्हा पहिल्यांदा असे वाटले की घासल्या गेल्याच्या खुणा या जलतरंगांच्या असू शकतात. विशेष कार्बन टेस्ट केल्यानंतर असे लक्षात आले की, हा पर्वत म्हणजेच मंदार पर्वत आहे.

पुराणकाळात जो पर्वत समुद्र मंथनासाठी देवादानवांमध्ये वापरला गेला तोच हा पर्वत. ही बातमी समोर येऊन पाच सहा वर्षे झाली. त्यांनंतर याला पुष्टी देणारे मुद्दे समोर यायला लागले.

Samudra-manthn-inmarathi

 

अशी करून घेण्यात आली खात्री, केल्या गेल्या या टेस्ट :

ऑर्कियोलॉजी डिपार्टमेंटने सर्वांत आधी वेगवेगळ्या प्रकारे त्या अवशेषांचे आणि पर्वताचे परीक्षण केले.

त्यावरून एक गोष्ट निश्चित केली गेली की पर्वतावर दिसत असलेल्या घासल्या गेल्याच्या खूणा या जलतरंगांमुळे पडलेल्या नव्हत्या.

त्यानंतर absolute method, Relative method, Return Markers, AE’s equivalent straightgraphic markers आणि straightigraphic Relationships method या सर्व पद्धतींचा वापर त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी केला गेला.

तसेच साहित्यातील दाखले आणि संदर्भ यांचा ही आधार घेण्यात आला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?