आग ओकत उडणारे ड्रॅगन्स खरे असू शकतात का? विज्ञानाचं थक्क करणारं उत्तर वाचा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आजवर तुम्ही अनेक वेळा ड्रॅगन या काल्पनिक महाकाय प्राण्यांबद्दल ऐकलं असेल. एक असा प्राणी जो नाकावाटे अग्निचे उत्सर्जन करतो व हवेत उडू शकतो.
हे सत्य आहे की आजवर आगीचे उत्सर्जन करणारा, कोणताही ड्रॅगन किंवा त्याचा अवशेष सापडू शकला नाही, पण हवेत उडू शकणाऱ्या व तशी क्षमता बाळगणाऱ्या अनेक जीवांचे अवशेष मिळाले आहेत. काही प्राणी आज देखील जंगलात आढळतात.
जेव्हा आपण उडण्याऱ्या प्राण्यांच्या विज्ञानावर आणि त्यांचा जीवनतंत्रावर नजर टाकतो तेव्हा आपल्याला कळून चुकते की आग ओकणाऱ्या ड्रॅगनचं देखील अस्तित्व असू शकतं.
ड्रॅगन किती मोठा असू शकतो ?
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आजचे पक्षी हे एकेकाळी अस्तित्वात असलेल्या उडणाऱ्या डायनासोर पासून विकसित झाले आहेत. प्रश्न हा आहे की ते एवढे मोठे असू शकतात का?, की ते मोठमोठाले पशू आणि माणसाचं भक्षण करू शकत असतील?
आज अस्तित्वात नसलेला Pterosaur Quetzlcoatuls northopoi हा पृथ्वीवर अस्तित्वात असलेला सर्वात मोठा उडणारा प्राणी म्हणून गणला जातो.
अनेक पुरातत्व संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार व उपलब्ध अवशेषांवरून या महाकाय जिवाच्या पंखांचा पसारा ११ मीटरपर्यंत होता आणि त्याचं वजन २०० ते २५० किलो इतकं, म्हणजेच आजच्या वाघाच्या वजनाइतकं होतं.
हा प्राणी अगदी सहजरित्या एखाद्या पशुचा वध करू शकत होता.
आज अश्या अनेक थेअरीज अस्तित्वात आहेत ज्यांचा म्हणण्यानुसार आज अस्तित्वात असलेले पक्षी का प्राचीन काळी अस्तित्वात असलेल्या डायनासोर व इतर पशूंसारखे मोठे नाहीत.
काही शास्त्रज्ञ मानतात की पंखांच्या देखभालीसाठी खर्च होणारी ऊर्जा त्यांचा आकार ठरवते. काहींच्या म्हणण्यानुसार पृथ्वी व त्यावर होणाऱ्या वातावरण बदलांमुळे त्यांचं आकारमान कमी झालंअसावं.
प्राचीन ड्रॅगन एवढे मोठे होते की ते अगदी सहजरित्या एखाद्या माणसाला उचलू शकले असते.
परंतु आज अस्तित्वात असलेले ड्रॅगनशी साधर्म्य दाखवणारे प्राणी लहान पक्षी, कीटक किंवा लहान स्तनधारी जीवांची शिकार करून खातात.
हे आधुनिक ड्रॅगन इगवनियन या पालीच्या प्रजातीचे असून, आगामीडे या फॅमिलीत येतात. ह्या फॅमिलीत पाळीव ड्रॅगन, चायनीज वॉटर ड्रॅगन आणि जंगली प्रजाती ड्रेकोचा समावेश होतो.
ड्रेको प्रजातीला उडणारे ड्रॅगन देखील म्हटले जाते. ड्रेको प्रजाती उंच उडी मारण्यात पटाईत असतात. ड्रेको ६० मीटरपर्यंत उंच लांब उडी मारू शकतात. यासाठी ते त्यांचा शेपटीचा आणि मानेच्या पेशींचा वापर करतात.
दक्षिण आशियातील काही जंगलात ड्रेकोचे अस्तित्व आहे. ह्या ड्रेको जास्तीत जास्त २० सेंटीमीटर पर्यंत वाढू शकतात.
असे ड्रॅगन जे पंखाविना देखील उडू शकतात :
युरोपियन ड्रॅगन आणि आशियाई ड्रॅगनमध्ये महत्वाचा फरक हा आहे की युरोपियन ड्रॅगन आकाराने मोठे असतात व आशियाई ड्रॅगनप्रमाणे ते पंखांशिवाय उडत नाहीत. परंतु अश्या सापाच्या प्रजाती देखील अस्तित्वात आहेत, ज्या हवेत तब्बल १०० मीटर पर्यंत झेपावू शकतात.
ह्या प्रजातील क्रयोसोपलिया प्रजाती म्हणतात. यासाठी ते त्यांचं शरीर अगदीच सपाट करतात आणि झेपावतात.
हे साप हवेत तरंगत असतात. ह्यासाठी ते त्यांचा शरीराला २५ डिग्रीमध्ये झुकवतात आणि वरच्या दिशेने डोकं ठेवून हवेत तरंगतात.
अगदी अश्याच प्रकारे आशियाई ड्रॅगन हवेत झेपावत असावेत असा शास्त्रज्ञांचा मानस आहे. जर त्यांनी आपले वजन हवेच्या वेगाला अनुसरून कमी केले तर ते अजून लांब अंतरापर्यंत झेप घेऊ शकतात.
ड्रॅगन नाकावाटे आग कशी ओकू शकतात?
आजवर कुठलाच आगीचे उत्सर्जन करणारा प्राणी आढळला नसून, कुठल्याही प्राण्याला आग ओकता येणं शक्य नाही.
बोंबर्डीयर बीटल या कॅर्बीडे फॅमिलीच्या किटकाच्या उदरात Hydroquinone’s आणि Hydrogen Peroxides चा साठा असतो ज्याचा वापर ते संकटसमयी करतात.
हे केमिकल जेव्हा हवेसोबत मिक्स होते तेव्हा ऊर्जेचे उत्सर्जन होते.
जर जास्त विचार केला तर कळून चुकते की प्रत्येक जीव हा अग्निप्रवण, रिऍक्टिव्ह पदार्थ उत्सर्जित करत असतात. जसं माणसं गरजेपेक्षा जास्त प्रमाणात ऑक्सिजन श्वसन प्रक्रियेतुन शरीरात घेत असतात आणि हायड्रोजन पेरॉक्सइड हे सामान्य बायप्रॉडक्ट तयार करत असतात.
ऍसिडचा उपयोग पचनप्रक्रियेसाठी केला जातो. मिथेन हे त्यातून निर्माण होणारे अग्निप्रवण बायप्रोडक्ट आहे.
ड्रॅगन केमिकल्स तोपर्यंत साठवू शकतो, जेव्हा त्याला ते वापरायचं असतात. ताकद लावून तो ते केमिकल्स बाहेर ओकत असतो. मेंकॅनिकल पद्धतीने पोटात असलेल्या पोटात असलेल्या Piezoelectric crystals च्या घर्षणाने अग्नी तयार करून त्याचे उत्सर्जन करत असतो.
अनेक प्राण्यांचा पोटात असे crystals आणि रसायनं आजही आढळतात. उदाहरणार्थ दातावरच इनामेल, दंतपंक्ती, हाड इत्यादी.
याचा अर्थ असा आहे की अग्नीचे उत्सर्जन शक्य आहे. जरी ते आज कुठल्याच प्रजातीत दिसून येत नसले, तरी असं शक्य आहे. मात्र तसे आवश्यक अवयव मुखात असतील तरच!
एक प्रचंड असा विशालकाय आग ओकणारा व उडणारा ड्रॅगन आज तरी अस्तित्वात नाही, ती एक कल्पनाच आहे. कारण एवढ्या वजनदार पंखासोबत तो उडुच शकत नाही.
परंतु लहान पंखांचा ड्रॅगन अस्तित्वात असू शकतो. पण तसे सबळ पुरावे नाहीत. शास्त्राकडे प्रत्येक प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. २००१ पर्यंत शास्त्रज्ञ मधमाश्या कश्या उडतात हे सिद्ध करू शकले नव्हते.
हे सर्व लक्षात घेता, ड्रॅगन आहे का? तो उडू शकतो का? माणसांची शिकार करू शकतो का? आग ओकू शकतो का? हे अजूनतरी सिद्ध होऊ शकलेलं नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.